नागपूरमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषदेत राज्य सरकार, निवडणूक आयोग तसेच भाजप सरकारवर जोरदार टीका केली. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या श्रेयवादावर भाष्य करताना त्यांनी “छगन भुजबळ तेल लावलेले पैलवान आहेत, गिरीश महाजन त्यांच्यासमोर बच्चे आहेत” असे वक्तव्य केले.यावेळी पटोले यांनी शेतकऱ्यांकडे सरकारने केलेले दुर्लक्ष, ओल्या दुष्काळाची न मिळालेली मदत, तसेच पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या यावर सरकारला जाब विचारला. निवडणूक आयोगावरही त्यांनी गंभीर आरोप करत “आयोगाने पारदर्शकता ठेवली नाही, त्यामुळे त्यांच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत” असे म्हटले आहे. फडणवीसांना दिल्लीत जबाबदारी देण्यामागे भाजपची वेगळी राजकीय तयारी आहे का असा सवालही पटोले यांनी उपस्थित केला. तसेच बावनकुळे यांच्या निर्णयावर, लाडकी बहीण योजनेवर, सिंचन घोटाळा प्रकरणावर आणि महामार्गाच्या मार्गाबाबत शेतकऱ्यांचा विरोध या अनेक मुद्यांवर पटोले यांनी सरकारला लक्ष्य केले आहे.