Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकही पिक्चर नाही, तरीही शाहरूख खानचीच हवा; बिग बींना आणि सलमानला मागे टाकत झाला सर्वाधिक कर भरणारा सेलिब्रेटी

भाईजान, बिग बी बच्चन आणि खिलाडी कुमारसह इंडस्ट्रीतल्या दिग्गज कलाकारांना एका कारणात शाहरूख खानने मागे टाकलंय, नेमकं ते कारण काय जाणून घेऊया...

  • By चेतन बोडके
Updated On: Nov 29, 2024 | 07:53 PM
33 Years Of Shah Rukh Khan A Look At His Distinctive Honours

33 Years Of Shah Rukh Khan A Look At His Distinctive Honours

Follow Us
Close
Follow Us:

किंग खान म्हणजेच बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान… त्याची क्रेझ चाहत्यांमध्ये आजतागायत कायम आहे. त्याचं घर मुंबईतल्या बांद्रामध्ये आहे. त्याच्या मन्नत बंगल्यासमोर रोज हजारो फॅन्स येतात, फोटो काढतात आणि निघून जातात. त्यातले क्वचित काही फॅन्स असतील त्यांना किंग खानची झलक पाहायला मिळते. देशातल्या कानाकोपऱ्यात, जगभरात शाहरूख खानचा चाहतावर्ग आहे. किंग खानचा चित्रपट येणार म्हटल्यावर चाहत्यांसाठी तर त्यादिवशी खास दिवाळीच असते. त्याच्या घरासमोर आणि बंगल्यासमोर चाहत्यांचा तर नुसता जलवाच असतो. पण, शाहरूखचा यावर्षी एकही चित्रपट आला नाही. पण तरीही त्याने भाईजान, बिग बी बच्चन आणि खिलाडी कुमारसह इंडस्ट्रीतल्या दिग्गज कलाकारांना एका कारणात मागे टाकलंय, नेमकं ते कारण काय जाणून घेऊया…

“आई आणि बाबा रिटायर होत आहेत!”, स्टार प्रवाहवर प्रेक्षकांना नव्या मालिकेची मेजवानी

फॉर्च्यून इंडियाची सप्टेंबर २०२४ मध्ये सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्या सेलिब्रिटींची यादी जाहीर झाली. त्या यादीमध्ये, सलमान खान, अमिताभ बच्चन, विराट कोहली आणि शाहरुख खान यासारखे सुपरस्टार टॉप ५ मध्ये आहेत. पण सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्यांमध्ये बॉलिवूडचा बादशाह दस्तूर खुद्द शाहरूख खान पहिल्या क्रमांकावर आला आहे. एकही प्रोजेक्ट हातात नसतानाही इतका टॅक्स अभिनेत्याने भरल्यामुळे तो चर्चेत आला आहे. याच यादीनुसार शाहरुख खानने २०२३- २४ मध्ये तब्बल ९२ कोटी रुपयांचा कर भरला आहे.

कृष्ण कुमारच्या पत्नीचा लेक तिशा कुमारच्या निधनावर महत्वाचा खुलासा; म्हणाली, “माझ्या मुलीचा मृत्यू कॅन्सरने झाला नाही…”

शाहरुख खाननंतर तामिळ सुपरस्टार थलापती विजयच्या नावाचा समावेश होतो. त्याने या वर्षी तब्बल ८० कोटी रुपयांचा टॅक्स भरला आहे. तर सलमान खानने ७५ कोटी आणि बिग बी बच्चन यांनी ७१ कोटी रुपयांचा कर भरला आहे. सेलिब्रिटी करदात्यांमध्ये क्रिकेटर विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी यांचेही नाव यादीत आहे. विराट कोहलीने ६६ कोटी रुपयांचा कर भरला आहे. अजय देवगनने ४२ कोटी तर महेंद्रसिंह धोनी यांनी ३८ कोटी रुपयांचा कर भरला आहे.

समांथा रुथ प्रभूवर कोसळला दु:खाचा डोंगर, अभिनेत्रीच्या जवळच्या व्यक्तीचे निधन

शाहरुखचे २०२३ मध्ये पठान, जवान आणि डंकी हे सुपरहिट चित्रपट रिलीज झाले होते. पण २०२४ मध्ये त्याचा एकही चित्रपट रिलीज झाला नव्हता. असं असतानाही किंग खान सर्वाधिक कर भरणारा अभिनेता ठरला आहे. शाहरूखने जानेवारी २०२३ मध्ये रिलीज झालेल्या ‘पठान’च्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर जबरदस्त पुनरागमन केले. या तीनही चित्रपटांच्या माध्यमातून त्याने २५०० कोटींची जबरदस्त कमाई केली. ‘पठान’ आणि ‘जवान’ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई झाली होती, मात्र ‘डंकी’चित्रपट फारशी कमाई करू शकला नाही.

Web Title: Shah rukh khan surpasses virat kohli akshay kumar and salman khan to become biggest celebrity taxpayer in 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2024 | 07:53 PM

Topics:  

  • bollywod news
  • Shah Rukh Khan

संबंधित बातम्या

Aryan Khan: आर्यन खानच्या पहिल्या वेब सीरिजचा फर्स्ट लूक प्रदर्शित, दिग्दर्शकाच्या भूमिकेत गाजवणार बॉलिवूड
1

Aryan Khan: आर्यन खानच्या पहिल्या वेब सीरिजचा फर्स्ट लूक प्रदर्शित, दिग्दर्शकाच्या भूमिकेत गाजवणार बॉलिवूड

Nicholas Pooran: नाईट रायडर्सने कर्णधारपदी निकोलस पूरनची निवड; ड्वेन ब्राव्हो मुख्य प्रशिक्षक
2

Nicholas Pooran: नाईट रायडर्सने कर्णधारपदी निकोलस पूरनची निवड; ड्वेन ब्राव्हो मुख्य प्रशिक्षक

71th National Awards: शाहरूख खानला पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार, तर ‘12th Fail’ विक्रांत मेस्सीने मारली बाजी
3

71th National Awards: शाहरूख खानला पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार, तर ‘12th Fail’ विक्रांत मेस्सीने मारली बाजी

बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रीला ब्रेकअप सहनच नाही झाले, 38 व्या वर्षीही आहे सिंगल, म्हणते ‘मी कमनशिबी आहे…’
4

बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रीला ब्रेकअप सहनच नाही झाले, 38 व्या वर्षीही आहे सिंगल, म्हणते ‘मी कमनशिबी आहे…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.