शेफाली जरीवालाच्या मृत्यूचं गुढ उकललं? डॉक्टरांनी सांगितलं कारण
‘कांटा लगा गर्ल’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचं निधनाने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने शेफालीने अखेरचा श्वास घेतला. शेफालीच्या मृत्यूचं कारण सुरुवातीला हृदयविकारंच स्पष्ट करण्यात आलं होतं. परंतु सध्या पोलिस शेफाली जरीवालाच्या निधनाचं गुढ उकलण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या पोलिस तिच्या मृत्यूमागे आणखी काही कारण आहे का हे देखील शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु मृत्यूच्या कारणाबाबतचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टचीही पोलिस वाट पाहत आहे. दरम्यान, शेफाली तरुण दिसण्यासाठी उपचार घेत असल्याचे आता समोर आले आहे.
गेल्या ५-६ वर्षांपासून शेफाली अँटी-एजिंग ट्रीटमेंट घेत असल्याची माहिती समोर आली आहे. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की अँटी-एजिंग म्हणजे तरुण दिसण्यासाठी केले जाणारे ट्रीटमेंट. यासाठी ती दोन औषधे घेत होती. शेफाली व्हिटॅमिन सी आणि ग्लुटाथिओन नावाची औषधे घेत होती. अशा परिस्थितीत, प्रश्न उद्भवतो की या औषधांचा तिच्या हृदयावर काही परिणाम झाला का? डॉक्टरांनीही या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. त्यांनी सांगितले की, औषधं हृदयावर परिणाम करत नाहीत तर फक्त त्वचेवर परिणाम करतात. ही औषधे त्वचेच्या गोरेपणासाठी घेतली जातात. या औषधांचा हृदयाशी काहीही संबंध नाही.
लेकीच्या निधनाने आई लागली धायमोकलून रडू, शेफालीचे कुटुंबीय शोकसागरात; Video Viral
शेफालीला सुमारे १५ वर्षांपासून epilepsy (आकडी) येण्याचाही त्रास होता, असेही समोर आले आहे. तथापि, तिच्या मृत्यूचे खरे कारण पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर आणि पोलिस तपास पूर्ण झाल्यानंतरच कळेल. शुक्रवारी रात्री उशिरा शेफालीच्या मृत्यूची बातमी समोर आली. पोलिसांना पहाटे १ वाजता माहिती मिळाली, त्यानंतर पोलीस तातडीने शेफालीच्या घरी पोहोचले. तिच्या कुटुंबातील सदस्यांची चौकशी करण्यात आली. तसेच, पोलिसांनी तिच्या स्वयंपाकी आणि मोलकरणीला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात नेले. शेफालीचा पती पराग त्यागीचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी परागसह चार जणांचे जबाब नोंदवले आहेत.