Actor And Director Hemant Dhome Slams Education Minister Dada Bhuse
राज्य मंडळाच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये यापुढे पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा शिकवली जाणार आहे. इतक्या लहान मुलांवर तीन- तीन भाषा शिकण्याची सक्ती का ? असा सवाल राज्य सरकारला सध्या राज्यातली जनता, विरोधी पक्षातले नेते मंडळी आणि यासोबतच कलाकार मंडळीही विचारताना दिसत आहे. राज्य सरकारच्या ह्या शिक्षण धोरणाला चहू बाजुंनी विरोध असताना शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या धोरणाबद्दल सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
लेकीच्या निधनाने आई लागली धायमोकलून रडू, शेफालीच्या कुटुंबीय शोकसागरात; Video Viral
पहिलीच्या आणि दुसरीच्या विद्यार्थांना शाळेमध्ये हिंदी भाषेचं शिक्षण ‘मौखिक’ शिक्षण म्हणून दिलं जाईल. तर तिसरीपासून पुढे हिंदी भाषा शिकवली जाईल, अशी प्रतिक्रिया शिक्षण मंत्री भुसे यांनी दिली. अद्याप या निर्णयाचा मंत्र्यांनी आदेश काढला नसून मंत्र्यांनी फक्त प्रतिक्रिया दिलेली आहे. शिक्षण मंत्र्यांच्या या प्रतिक्रियेवर प्रसिद्ध अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे याने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही प्रतिक्रिया दिली आहे.
यंदा इयत्ता पहिलीला तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा “मौखिक” असेल, पुस्तकं नसतील, पण मास्तर मुलांना तिसरी भाषा शिकवतील!!!
– माननीय शिक्षणमंत्री!!!
हे म्हणजे कसं झालं…
‘विचार मांडणाऱ्या आणि विरोध करणाऱ्या संगळ्यांना मौखिक चपराक’
हा सगळा एक हास्यास्पद फार्स चालू आहे…
सगळी कशी…— Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) June 27, 2025
मराठमोळा अभिनेता हेमंत ढोमे याने एक्सवर एक पोस्ट शेअर केलेली आहे. अभिनेत्याने शेअर केलेली उपरोधिक पोस्ट सर्वत्र कमालीची चर्चेत आली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेता हेमंत ढोमेने लिहिले की,
“यंदा इयत्ता पहिलीला तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा “मौखिक” असेल, पुस्तकं नसतील, पण मास्तर मुलांना तिसरी भाषा शिकवतील!!!
– माननीय शिक्षणमंत्री!!!
हे म्हणजे कसं झालं…
‘विचार मांडणाऱ्या आणि विरोध करणाऱ्या सगळ्यांना मौखिक चपराक’
हा सगळा एक हास्यास्पद फार्स चालू आहे…
सगळी कशी गंमाड्डी गंमत!!!
#आमचं_ठरलंय”
बाल जगदंबेसमोर नव्या संकटाची चाहूल, मायाचा अंगाचा थरकाप उडवणारा वार!
अभिनेत्याने यापूर्वी ही अनेकदा या शिक्षण धोरणावर एक्सच्या माध्यमातून सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.