Shefali Jariwala Mother Crying Inconsolably For Daughter Video
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आणि ‘बिग बॉस १३’ फेम शेफाली जरीवालाच्या निधनानं बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. शेफाली हिचं वयाच्या ४२ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. अभिनेत्रीच्या अचानक एक्झिटने तिच्या कुटुंबीयांसह सेलिब्रिटी मित्रांवरही आणि चाहत्यांवरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पती पराग त्यागी याने शेफालीला रात्री उशिरा अंधेरीतल्या बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेलं. परंतु तो पर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती. तिला तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले.
बाल जगदंबेसमोर नव्या संकटाची चाहूल, मायाचा अंगाचा थरकाप उडवणारा वार!
शेफालीच्या निधनाचे वृत्त कळताच तिच्या कुटुंबीयांनी रुग्णालय गाठलं. सध्या सोशल मीडियावर शेफालीचा पती आणि तिच्या आईसह तिचे इतर कुटुंबीयही रुग्णालयात पोहोचले. सध्या इन्स्टाग्रामवर शेफालीच्या आईचा भावनिक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. लेकीच्या निधनाचे वृत्त ऐकून शेफालीच्या आईवर मोठा आघात झालेला पाहायला मिळत आहे. काही तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर ‘इन्स्टंट बॉलिवूड’ने एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये शेफालीची आई आणि शेफालीच्या कुटुंबातील इतर सदस्य रडताना दिसत आहेत.
रुग्णालयाच्या परिसरामध्ये पापाराझींनी शेफालीच्या आईचा हा व्हिडिओ शूट केलेला आहे. शेफालीच्या जाण्याने तिची आई खूपच दु:खी झाली आहे. कारमध्ये बसून त्या रडताना दिसत आहे. हा हृदयद्रावक व्हिडिओ पाहून चाहते भावूक झालेले आहेत. सर्वांचेच डोळे पाणावले असून सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या निधनावर हळहळ व्यक्त केली जात आहे. यावेळी गाडीमध्ये बसलेले अन्य कुटुंबीय शेफालीच्या आईला धीर देताना दिसत आहे. दरम्यान, मध्यरात्री पासूनच शेफालीच्या राहत्या घरी मुंबई पोलिसांची आमि फॉरेन्सिक टीमची रेलचेल पाहायला मिळत आहे. सध्या पोलिस आणि फॉरेन्सिक टीम शेफालीच्या घरी संपूर्ण घटनेची चौकशी करत आहे.
इलियाना डिक्रुझ दुसऱ्यांदा झाली आई, ठेवलं युनिक नाव; फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद
सध्या पोलिस आणि फॉरेन्सिक टीम शेफालीचा पती परागची आणि त्यांच्या घरात काम करत असणाऱ्या कामगारांचीही ते चौकशी करीत आहे. पराग पोलिसांना शेफालीच्या मृत्यू प्रकरणात सहकार्य करताना दिसत आहे. शेफालीच्या मृत्यूचं कारण अस्पष्ट असून तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.