ACP प्रद्युम्न यांची CID मध्ये होणार दणक्यात एन्ट्री, चाहत्यांच्या आग्रहास्तव मेकर्सचा निर्णय
टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वाधिक लोकप्रिय आणि चर्चेत राहिलेल्या ‘सीआयडी’ (CID) या क्राईम थ्रिलर शोमध्ये लवकरच एक नवा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. गेल्या २० वर्षांपासून प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करणाऱ्या या शोला आता नवीन वळण मिळणार आहे. २०१८ साली बंद झालेला हा कॉमेडी थ्रिलर शो गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा एकदा नव्याने सुरु झाला. आता काही दिवसांतच या क्राईम थ्रिलर शोला नवीन वळण मिळालं आहे. सीआयडी शोला फार मोठा चाहतावर्ग मिळाला आहे. शोप्रमाणेच त्यातील कलाकारांचाही फार मोठा चाहतावर्ग आहे. आता मालिकेतील एका कलाकाराबद्दल महत्वाची बातमी समोर येत आहे.
जॅकलिन फर्नांडिसचे वडील भावुक, पत्नीच्या जाण्याने बुडाले शोकसागरात…
‘दया, दरवाजा तोड़ दो…’, ‘दया, कुछ तो गड़बड़ है’ हे डायलॉग ऐकले की, आपल्या नजरेसमोर येतात ते एसीपी प्रद्युम्न. सीआयडीमध्ये एसीपी प्रद्युम्न यांची भूमिका शिवाजी साटम यांनी साकारली आहे. आता यापुढे प्रेक्षकांना एसीपी प्रद्युम्न यांची व्यक्तिरेखा पुन्हा कधी पाहायला मिळणार नाही. कारण, मालिकेमध्ये त्यांच्या पात्राचा आता ट्रॅक संपणार आहे. दरम्यान, ‘CID 2’मध्ये एसीपी प्रद्युम्न यांचा मृत्यू झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. सोनी टीव्हीने त्यांच्या सोशल मीडिया हँडलला पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्या शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये अधिकृतपणे जाहीरही केलं आहे. “एसीपी प्रद्युम्न यांच्या कायमच आठवणींत… केव्हाही न भरून निघणारे नुकसान” असं त्यांनी फोटोला कॅप्शन वापरलेय.
‘मी चकित झालो…’, ‘बुर्का सिटी’च्या निर्मात्याने ‘लापता लेडीज’वर सोडले मौन, किती सीन केले कॉपी?
पण, दुसरीकडे अशीही चर्चा सुरू आहे की ‘सीआयडी’ला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी निर्मात्यांनी एसीपी प्रद्युम्नच्या ‘मृत्यू’चा ट्रॅक प्लॅन केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, “एसीपी प्रद्युम्न यांचा मृत्यू खरा नाही. हा फक्त सस्पेन्स निर्माण करण्याचा एक मार्ग आहे.” टीआरपीच्या आकडेवारीत वाढ करण्यासाठी ACP प्रद्युम्न यांच्या ‘मृत्यू’चा स्टंट वापरल्याचं बोललं जातं आहे. एसीपी प्रद्युम्न यांची भूमिका साकारणाऱ्या शिवाजी साटम यांनी बॉम्बे टाईम्सला मुलाखत दिली.
या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, “खरंतर, मला मृत्यूच्या ट्रॅकबद्दल काहीही माहिती नाही. मी माझ्या मुलाकडे परदेशात चाललो आहे, तो तिकडे राहतो. मी त्याकडे आपला वेळ घालवण्यासाठी चाललोय, म्हणून मी सुट्टी घेतलीये. मालिकेत आता पुढे काय होणार ? हे निर्मात्यांना ठाऊक आहे. माझी भूमिका संपली असेल तर माझे काहीही म्हणणे नाही. पण मलाच माझी भूमिका संपली आहे की नाही, हे सांगण्यात आलेले नाही. सध्या मी मालिकेची शुटिंग करत नाही.” जेव्हापासून मालिका सुरु झाली आहे, तेव्हापासून अभिनेते शिवाजी साटम मुख्य भूमिकेत आहेत.
जॅकलिन फर्नांडिसवर कोसळला दुःखाचा डोंगर, आई किम फर्नांडिस यांनी घेतला अखेरचा श्वास!
मिळालेल्या माहितीनुसार, ‘कसौटी जिंदगी की २’ फेम पार्थ समथान लवकरच ‘सीआयडी २’ टीमचा भाग होऊ शकतो अशी चर्चा आहे. याविषयीची, अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. पहिला सीझन बीपी सिंग यांनी तयार केला होता आणि प्रदीप उप्पूर यांनी त्याची निर्मिती केली होती. आता नवीन सीझन बनिजय एशिया बनवत आहे.