Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे निधन; वयाच्या ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

  • By चेतन बोडके
Updated On: Dec 23, 2024 | 08:58 PM
भारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे निधन; वयाच्या ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

भारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे निधन; वयाच्या ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Follow Us
Follow Us:

बॉलिवूड इंडस्ट्रीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे आज सायंकाळी ६ वाजून ३८ मिनिटांनी निधन झाले. बेनेगल किडनीच्या आजाराने त्रस्त होते. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक गेल्या अनेक वर्षांपासून आजारी होते. त्यांची मुलगी पिया बेनेगल यांनी दिग्दर्शकांच्या निधनाची माहिती एबीपी न्यूजला दिली आहे. श्याम बेनेगल यांच्या निधनाचे वृत्त खरे आहे, असं पियाने सांगितलं.

‘आई कुठे…’ फेम अभिनेत्रीने दिली कुलाबा किल्ल्याला भेट, पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या भावना

मुंबई सेंट्रल येथील व्होकार्ट हॉस्पिटलमध्ये (Wockhardt Hospital) आज (२३ डिसेंबर) सायंकाळी ६.३८ वाजता त्यांचे निधन झाल्याचे सांगितले. पिया बेनेगल यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्याम बेनेगल गेल्या अनेक दिवसांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते. ते या आजाराच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचले होते. आज उपचारादरम्यान रुग्णालयात त्यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्काराबद्दल लवकरच निर्णय घेतला जाईल. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या असून त्यांचे दररोज घरी डायलिसिस केले जायचे, अशी माहिती एका मुलाखतीत स्वत: श्याम बेनेगल यांनी दिली होती.

सासरे असावेत तर असे! ‘कन्यादान’फेम अभिनेत्रीची सासरेबुवांसाठी खास पोस्ट…

श्याम बेनेगल यांच्या चित्रपटांना ८ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. ‘झुबैदा’, ‘द मेकिंग ऑफ द महात्मा’, ‘नेताजी सुभाषचंद्र बोस: द फॉरगॉटन हिरो’, ‘मंडी’, ‘आरोहण’, ‘वेलकम टू सज्जनपूर’, ‘अंकुर’, ‘निशांत’, ‘मंथन’, ‘भूमिका’, ‘जुनून’ यांसारखे डझनभर उत्तम चित्रपट त्यांनी केले आहेत. शायन बगेनल यांना दादासाहेब फाळके पुरस्कारही मिळाला आहे. श्याम बेनेगल यांनी त्यांच्या फिल्मी करियरमध्ये २४ चित्रपट, ४५ डॉक्यूमेंट्री आणि १५०० ॲड फिल्म्सही बनवले आहेत. १९७६ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर १९९१ मध्ये श्याम बेनेगल यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

श्याम बेनेगल यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी वेगवेगळ्या क्षेत्रातही अभ्यास केला आहे. त्यांनी सर्वात आधी अर्थशास्त्राचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांना फोटोग्राफीची खूप आवड होती. जेव्हा ते 12 वर्षांचे होते, तेव्हा त्यांनी त्यांचे वडील श्रीधर बी. बेनेगल यांच्यासाठी कॅमेरावर पहिला चित्रपट बनवला.

Web Title: Shyam benegal death famous director of bollywood demise

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2024 | 08:34 PM

Topics:  

  • Bollywood News

संबंधित बातम्या

Pehla Pyaar Doosri Baar: नवे चेहरे, नवी प्रेमकहाणी अन् लव रंजन; ‘पहला प्यार दूसरी बार’ची रिलीजआधीच चर्चा
1

Pehla Pyaar Doosri Baar: नवे चेहरे, नवी प्रेमकहाणी अन् लव रंजन; ‘पहला प्यार दूसरी बार’ची रिलीजआधीच चर्चा

Arun Govil Ramayana:  प्रभू रामानंतर आता राजा दशरथ! अरुण गोविल यांचा ‘रामायण’मधील नवा लूक समोर
2

Arun Govil Ramayana: प्रभू रामानंतर आता राजा दशरथ! अरुण गोविल यांचा ‘रामायण’मधील नवा लूक समोर

Tiger Shroff Transformation: टायगर श्रॉफचा शर्टलेस लूक चर्चेत; ६ सेकंदांच्या ट्रान्सफॉर्मेशन व्हिडीओने सोशल मीडियावर उडवली खळबळ
3

Tiger Shroff Transformation: टायगर श्रॉफचा शर्टलेस लूक चर्चेत; ६ सेकंदांच्या ट्रान्सफॉर्मेशन व्हिडीओने सोशल मीडियावर उडवली खळबळ

Vidyut Jammwal: १५ मिनिटं श्वास रोखला, २० मिनिटं पापणीही लवली नाही; विद्युत जामवालचा धक्कादायक स्टंट, व्हिडीओ चर्चेत
4

Vidyut Jammwal: १५ मिनिटं श्वास रोखला, २० मिनिटं पापणीही लवली नाही; विद्युत जामवालचा धक्कादायक स्टंट, व्हिडीओ चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.