Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ata Thambaycha Naay: सिद्धू आणि भरत जाधवची भन्नाट जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; ‘आता थांबायचं नाय!’चा प्रेरणादायी टीझर चर्चेत

Ata Thambaycha Naay Teaser out: महाराष्ट्राच्या मातीतल्या एका प्रेरणादायी सत्यकथेवर आधारित 'आता थांबायचं नाय!' ह्या महत्त्वाकांक्षी चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Feb 19, 2025 | 03:00 PM
सिद्धू आणि भरत जाधवची भन्नाट जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; 'आता थांबायचं नाय!'चा प्रेरणादायी टीझर चर्चेत

सिद्धू आणि भरत जाधवची भन्नाट जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; 'आता थांबायचं नाय!'चा प्रेरणादायी टीझर चर्चेत

Follow Us
Close
Follow Us:

झी स्टुडिओजने मराठी सिनेसृष्टीला आणि प्रेक्षकांना आजवर अनेक दर्जेदार आणि मनोरंजनात्मक चित्रपट दिले आहेत. असाच एक जबरदस्त चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी झी स्टुडिओज पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. ‘आता थांबायचं नाय’ असे या चित्रपटाचे नाव असून झी स्टुडिओज, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ निर्मित हा चित्रपट येत्या महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

शिवराज वायचळ दिग्दर्शित या चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, प्राजक्ता हनमगर, किरण खोजे, प्रवीण डाळिंबकर, ओम भुतकर, पर्ण पेठे आणि आशुतोष गोवारीकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर, निधी हिरानंदानी आणि धरम वालिया निर्माते आहेत. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक ‘झी गौरव पुरस्कार’ सोहळ्यात लाँच करण्यात आला.

एकंदरच पहिली झलक पाहाता आणि चित्रपटाच्या नावातही लेखणी दिसत असल्याने हा चित्रपट शिक्षणावर आधारित आहे, हे नक्की ! या टिझरमध्ये एक स्फूर्तीदायी गाणेही ऐकू येत असून या गाण्याला अजय गोगावले यांचा आवाज लाभला आहे. तर गुलराज सिंग या गाण्याचे संगीतकार आहेत आणि मनोज यादव गीतकार आहेत.

बेळगाव सीमा वादावर प्रकाश टाकणारी तीन मित्रांची रंजक कथा “फॉलोअर” सांगणार, चित्रपट केव्हा रिलीज होणार ?

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक शिवराज वायचळ म्हणातात, ” सत्यघटनेवर आधारित असलेला हा चित्रपट आयुष्यातील संघर्ष आणि पुढील वाटचालीसाठी एक प्रेरणादायी संदेश देण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. या प्रवासात आम्हाला झी स्टुडिओजची साथ लाभली. त्यांच्याशिवाय हे शक्यच नव्हते आणि यासाठी मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. १ मे हा दिवस महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारसा आणि आत्मविश्वासाचा दिवस म्हणून साजरा केला जातो आणि ‘आता थांबायचं नाय’ हा चित्रपट याच भावनेला उजाळा देणार आहे.”

झी स्टुडिओजचे चीफ बिझनेस ऑफिसर उमेश कुमार बन्सल म्हणतात, “आजवर झी स्टुडिओजने नेहमीच प्रेक्षकांना वैविध्यपूर्ण चित्रपट दिले आहेत. ‘आता थांबायचं नाय’ हा देखील असाच चित्रपट आहे. ‘आता थांबायचं नाय’ हा चित्रपट केवळ एक मनोरंजक अनुभव नाही तर तो जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याची शिकवण देणारा एक प्रेरणादायी प्रवास आहे.”

प्रेमात विश्वासघात, घटस्फोट; आता दुसऱ्यांदा रश्मी देसाई चढणार बोहल्यावर?

झी स्टुडिओजचे बिझनेस हेड बवेश जानवेलकर म्हणतात, “झी स्टुडिओजने प्रेक्षकांसाठी काहीतरी वेगळं आणि आकर्षक आणण्याचा प्रयत्न केला आहे. ‘आता थांबायचं नाय’मध्ये प्रेरणा आणि मनोरंजनाचा सुंदर संगम आहे. या चित्रपटात हास्य, भावना आणि प्रोत्साहनाच्या घटकांचा समावेश आहे. ज्यामुळे हा चित्रपट सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आवडेल. चित्रपटाची टीमही अत्यंत कमाल आहे. अनेक नामवंत कलाकार यात आहेत. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांचे प्रेम मिळवण्यात नक्कीच यशस्वी होईल.”

Web Title: Siddharth jadhav and bharat jadhav movie ata thambaycha naay teaser out

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2025 | 03:00 PM

Topics:  

  • Bharat Jadhav
  • Entertainment News
  • marathi film
  • sidharth jadhav

संबंधित बातम्या

‘आम्ही कमी टॅलेंटेड आहोत का?’…’परम सुंदरी’मधील जान्हवी कपूरचे मल्याळी ऐकून भडकली अभिनेत्री, प्रश्नांची केली सरबत्ती
1

‘आम्ही कमी टॅलेंटेड आहोत का?’…’परम सुंदरी’मधील जान्हवी कपूरचे मल्याळी ऐकून भडकली अभिनेत्री, प्रश्नांची केली सरबत्ती

War 2 चा ऐतिहासिक रेकॉर्ड, Hrithik आणि NTR च्या चित्रपटाने स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी 100 कोटीचा आकडा केला पार
2

War 2 चा ऐतिहासिक रेकॉर्ड, Hrithik आणि NTR च्या चित्रपटाने स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी 100 कोटीचा आकडा केला पार

Armaan Malik 5 व्या वेळी होणार बाबा? युट्युबरच्या पत्नीने केली पोस्ट शेअर; दिली Good News
3

Armaan Malik 5 व्या वेळी होणार बाबा? युट्युबरच्या पत्नीने केली पोस्ट शेअर; दिली Good News

‘इतकं प्रेम आहे तर घरी घेऊन जा..’ भटक्या कुत्र्यांवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला राहुल वैद्यचे समर्थन
4

‘इतकं प्रेम आहे तर घरी घेऊन जा..’ भटक्या कुत्र्यांवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला राहुल वैद्यचे समर्थन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.