फोटो सौजन्य: सोशल मीडिया
१४ वर्षांपूर्वी, म्हणजेच २०११ मध्ये, प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईने अभिनेता नंदीश संधूशी लग्न केले. पण रश्मीचा पहिला संसार अवघ्या ५ वर्षातच मोडला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, घटस्फोटाच्या वेळी रश्मी आणि नंदीशने एकमेकांवर अनेक आरोप केले होते. रश्मीने असा दावा केला होता की, नंदीशची अनेक मुलींसोबत मैत्री आहे. याशिवाय रश्मीने तिच्या पतीवर घरगुती हिंसाचाराचाही आरोप केला होता. तर, नंदीशने सांगितले होते की रश्मीच्या अतिसंवेदनशील स्वभावामुळे आम्ही एकमेकांपासून वेगळे होत आहोत.
रश्मीला तिच्या लव्ह लाईफमध्ये खूपच फसवणुकीचा सामना करावा लागला आहे. लग्न तुटल्यानंतर काही वर्षांनी रश्मीने अरहान खानला डेट करायला सुरुवात केली. पण अरहानसोबतचे तिचे रिलेशन फार काळ टिकले नाही. सलमान खानने रश्मीच्या लव्हस्टोरीचा उलगडा बिग बॉसच्या घरात केला होता. याशिवाय सलमानने स्वत: अरहानच्या खोट्या गोष्टी उघड केल्या होत्या. तो म्हटला होता की तो आधीच विवाहित आहे आणि त्याला एक मुलगाही आहे. रश्मीच्या कुटुंबीयांनी असेही म्हटले आहे की, अरहान रश्मीचा फायदा घेत आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर रश्मीने अरहानसोबतचे नाते तोडले. अरहान खान शोमध्ये आला होते. रश्मीचे त्याच्याशी प्रेमसंबंध होते. पण शोमध्ये हे उघड झालं की, अरहान रश्मीला फसवत होता. लग्न आणि प्रेमाच्या बाबतीत रश्मीचं नशीब चांगलं राहिलं नाही.
Ranveer Allahbadia चा सुप्रीम कोर्टाकडून पासपोर्ट जप्त, FIR बद्दल केले महत्वपूर्ण विधान
अरहान नंतर, रश्मी देसाईचं नाव आता नेटकऱ्यांकडून असीम रियाजचा मोठा भाऊ उमरसोबत जोडले जात आहे, परंतु दोघांनी कधीही त्यांच्या नात्याची पुष्टी केली नाही. रश्मी आणि उमर नेहमीच म्हणत असत की ते फक्त एकमेकांचे चांगले मित्र आहेत. रश्मी देसाईचे नाव सिद्धार्थ शुक्लाशीही जोडले गेले होते. खरंतर, त्यांनी कलर्स टीव्हीवरील ‘दिल से दिल तक’ मालिकेत ऑन-स्क्रीन पती-पत्नीची भूमिका साकारली होती. या दोघांमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली होती. पण जेव्हा ते दोघेही ‘बिग बॉस १३’ च्या सीझनमध्ये एकत्र दिसले तेव्हा त्यांनी सांगितले की त्यांच्या लिंकअपच्या बातम्या फक्त एक अफवा होत्या. प्रत्यक्षात, दोघांचे अजिबात पटत नव्हते. दरम्यान, रश्मी आता तिच्या दुसऱ्या लग्नाबद्दल म्हणाली आहे.
दुसऱ्या लग्नाबद्दल बोलताना रश्मी देसाई म्हणाली की, तिच्या पालकांना वाटते की तिने एका चांगल्या व्यक्तीशी लग्न करावे आणि स्थायिक व्हावे. दरम्यान, रश्मीने असेही सांगितले की तिचे पालक तिच्यासाठी चांगल्या जोडीदाराचा शोध घेत आहेत. तथापि, रश्मीला पूर्ण विश्वास आहे की, जेव्हा देवाची इच्छा असेल तेव्हा तिला तिचं प्रेम आणि योग्य व्यक्ती मिळेल.
रश्मी पुढे म्हणाली की, माझ्या घरी माझे आईवडील माझ्यासाठी जोडीदार शोधण्यासाठी खूप मेहनत घेत आहेत. पण प्रामाणिकपणे सांगायचे तर, मला पूर्ण विश्वास आहे की योग्य वेळी योग्य व्यक्ती माझ्या आयुष्यात येईल. प्रेमाबद्दल बोलताना रश्मी देसाई म्हणाली की, चुकीच्या नात्यांमुळे ती अनेक वेळा खूप वाईट पद्धतीने रिलेशनमध्ये अडकली आहे. म्हणूनच कधीकधी तिला असे वाटते की देवाने तिच्यासाठी कोणताही माणूस निर्माण केलेला नाही. पण तरीही जर तिला चांगला मुलगा मिळाला तर ती लग्न करू शकते.