२०० कोटींच्या 'सिकंदर'ला १०० कोटी कमावणंही कठीण, सातव्या दिवशीही भारतात केली तुटपुंजी कमाई
ए. आर. मुरुगॉदॉस दिग्दर्शित ‘सिकंदर’ चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षेप्रमाणे कमाई करताना दिसत नाहीये. गेल्या सात दिवसांत या चित्रपटाने १०० कोटींचा टप्पाही गाठलेला नाही. २०० कोटींमध्ये तयार झालेल्या चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल फ्लॉप ठरलेला आहे. दरम्यान, जाणून घेऊया चित्रपटाने सात दिवसांत देशासह परदेशात किती कोटींची कमाई केली आहे.
बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा ‘सिकंदर’ चित्रपट ‘ईद’च्या आदल्या दिवशी अर्थात ३० मार्चला बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला. चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होऊन आता जवळपास आठवडा पूर्ण झाला आहे. परंतु या चित्रपटाची कमाई अत्यंत निराशाजनक आहे. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरेल, सर्वाधिक ओपनिंग करेल.. असे सर्व अंदाज फोल ठरताना दिसत आहेत. सलमान खानच्या ‘सिकंदर’ चित्रपटाने ६ दिवसांत चित्रपटाचं देशांतर्गत कलेक्शन ९३.७५ कोटी रुपये आहे. तसेच ‘सिकंदर’नं जगभरात १७८.१६ कोटी रुपये कमावले आहेत.
ईडीची ‘L2: Empuraan’च्या निर्मात्यांच्या घरावर छापेमारी! कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन जप्त
सॅकल्निक ट्रेड ॲनालिस्टने दिलेल्या वृत्तानुसार, ‘सिकंदर’ चित्रपटाने ७ दिवशी ३. ७५ कोटींची कमाई केलेली आहे. ७ दिवसांत चित्रपटाने ९७. ५० कोटींची कमाई केली. दरम्यान, ‘सिकंदर’ चित्रपट रिलीज होऊन आता एक आठवडा झाला आहे. पण तरीही चित्रपटाने आठवड्याभरात देशांतर्गत १०० कोटींचा टप्पा गाठला नाही. ‘सिकंदर’ने पहिल्या दिवशी २६ कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी २९ कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी १९.५ कोटी रुपये, चौथ्या दिवशी ९.७५ कोटी रुपये, पाचव्या दिवशी ६ कोटी रुपये आणि सातव्या दिवशी ३.५ कोटी रुपये कमावले आहेत. सातव्या दिवसाची कमाईसुद्धा ३. ७५ कोटी रुपयांच्या घरात असल्याचं कळतंय.
‘मला वेड लागलंय’ गाण्यावर रितेशचा मुलांसोबत अफलातून डान्स, Video पाहून जिनिलीया ही झाली अचंबित
ईदच्या दिवशी रिलीज झालेल्या ‘सिकंदर’ चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवालांनी केली आहे. तर दिग्दर्शन ए. आर. मुरुगॉदॉस यांनी केलंय. या चित्रपटात सलमान खान पहिल्यांदाच दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदानासोबत पाहायला मिळणार आहे. ‘सिकंदर’ चित्रपटात सलमान, रश्मिकाव्यतिरिक्त काजल अग्रवाल, शर्मन जोशी, प्रतीक बब्बर झळकणार आहे. तसेच ‘बाहुबली ‘चित्रपटातील कटप्पा म्हणजे अभिनेता सत्यराज खलनायिकेच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.