Riteish Deshmukh Dance With Two Children Wife Genelia Capture The Moment
बॉलिवूडमधील आदर्श जोडी म्हणून जिनिलीया देशमुख आणि रितेश देशमुख यांच्याकडे पाहिलं जातं. या दोघांकडे पाहून आजची नवीन पिढी त्यांना ‘कपल गोल्स’ म्हणते. १० वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर रितेश आणि जिनिलियाने २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. तेव्हापासून दोघंही सुखाचा संसार करत आहेत. हे कपल सध्या आई- बाबा म्हणून चर्चेत आले आहे. जिनिलीया आणि रितेश यांना दोन मुलं आहेत. त्यांनी आपल्या दोन्हीही मुलांना दिलेल्या संस्कारामुळे ते सध्या चर्चेत आले आहेत.
दरम्यान, सध्या इन्स्टाग्रामवर जिनिलीया आणि रितेश यांच्या दोन्हीही मुलांचा सध्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. तो व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांकडून त्यांच्या दोन्हीही मुलांचं कौतुक केलं जात आहे. त्या व्हायरल व्हिडिओमध्ये रितेश आपल्या दोन्हीही मुलांसोबत आणि त्यांच्या मित्रांसोबत ‘वेड’ चित्रपटातील ‘मला वेड लागलंय’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. सोशल मीडियासह सर्वांनाच या गाण्याची भुरळ पडली आहे. चित्रपट रिलीज होऊन दोन वर्षे उलटले, तरीही देखील काही केल्या चित्रपटाची क्रेझ कमी होईना. व्हायरल व्हिडिओमध्ये, ‘मला वेड लावलंय’ गाण्यावर स्वत: रितेश देशमुखने मुलांसोबत डान्स केल्याचं पाहायला मिळालं आहे.
CID 2 मधील ACP प्रद्युम्न यांचा मृत्यू म्हणजे स्टंट ? शिवाजी साटम यांनी स्पष्टच सांगितलं…
रितेश मुलं रियान आणि राहील यांच्यासोबत डान्स करताना पाहून जिनिलियादेखील कौतुकानं भारावली. तिनं हा सुंदर क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. हा गोड व्हिडीओ ‘madoholic’ या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित, ‘वेड’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर ३० डिसेंबर २०२२ साली रिलीज झाला होता. या चित्रपटाने फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात आणि जगभरातही दमदार कमाई केली होती. सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये ह्या चित्रपटाचा टॉप ५ मध्ये समावेश झाला आहे. चित्रपटाप्रमाणेच चित्रपटातील गाणीही कमालीचे चर्चेत राहिले आहेत.
‘कुमकुम भाग्य’ फेम प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतला विभक्त होण्याचा निर्णय, ९ वर्षांचा मोडणार संसार!
रितेश देशमुखच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सध्या तो ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन रितेश स्वत: करतोय आणि या चित्रपटाची निर्मिती जिनिलिया देशमुख करत आहे. याशिवाय, रितेश ‘रेड २’ आणि ‘हाऊसफुल ५’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर जिनिलिया ही आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’मध्ये झळकणार आहे.