सलमान खानच्या वडिलांना 'सिकंदर' चित्रपट कसा वाटला ? सलीम खान यांनी डायलॉगबद्दल केले महत्वाचे विधान
सलमान खानच्या बहुचर्चित ‘सिकंदर’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाला अवघे दोन दिवसच बाकी असून भाईजानच्या चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता पाहायला मिळत आहे. ३० मार्चला बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी ‘सिकंदर’चित्रपट सज्ज झाला आहे. दोन वर्षांनंतर सलमान खानचा ‘सिकंदर’ चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. त्यामुळे सर्वत्र ‘सिकंदर’ची क्रेझ पाहायला मिळत आहे. अशातच नुकताच सलमान खानचे वडील आणि लेखक सलीम खान यांनी ‘सिकंदर’ चित्रपट पाहिला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सलमान खानच्या वडीलांना चित्रपट कसा वाटला? जाणून घेऊया…
सेलिब्रिटी ‘गुढीपाडवा’…, मराठमोळे कलाकार कसे सेलिब्रेट करतात मराठी नववर्ष ?
ए. आर. मुरुगादॉस दिग्दर्शित ‘सिकंदर’ चित्रपटाच्या निमित्ताने सलमान खान आणि आमिर खानने दिग्दर्शक ए. आर. मुरुगादॉस यांच्याशी खास संवाद साधला. मुलाखतीच्या सुरुवातीलाच सलमान आणि आमिरने दिग्दर्शकांना हटके प्रश्न विचारले. त्याच मुलाखतीमध्ये सलीम खान सहभागी झाले. त्यावेळी त्यांनी ‘सिकंदर’चित्रपटाविषयी वक्तव्य केलं. आमिर खानने सलीम खान यांना ‘सिकंदर’ चित्रपट तुम्हाला कसा वाटला? असा प्रश्न विचारला. त्या प्रश्नावर उत्तर देताना सलीम खान म्हणाले, “‘सिकंदर’ चित्रपटातील एक-एक सीननंतर तुम्हाला असं वाटतं की, आता पुढे काय होणार? आता काय करणार? अशाच प्रकारे प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यश मिळालं, तर हा एक विजय आहे.”
बिग बॉस फेम अभिनेत्रीचं लेखन क्षेत्रात पदार्पण, तगडी स्टारकास्ट असणाऱ्या चित्रपटाचं केलं लेखन
मुलाखतीत आमिरने पुढे सलीम खान यांना “सलमानसह इतर कलाकारांनीही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी निराशा, अवस्थपणा (नर्व्हसनेस) कसा हाताळावा?” असा प्रश्न विचारलं. त्यावर सलीम खान म्हणाले की, “तुम्ही कुठलंही काम करा. त्यावेळी आपल्या मनात थोडी थोडी भीती असतेच. असं नाही की, फक्त आपल्यालाच असं होतं. हा एक मानवी स्वभाव आहे. प्रत्येकाच्या बाबतीत असं घडतं आणि माझ्या बाबतीतही असंच घडतं, असा विचार करत जर राहिलो तर तुम्हाला एकटेपणा जाणवणार नाही.” दरम्यान, ईदच्या दिवशी प्रदर्शित होणारा ‘सिकंदर’ चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला जेव्हापासून सुरुवात झालीये तेव्हापासून सोशल मीडियावर पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई करू शकेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
Krrish 4 चित्रपटाबाबत समोर आले मोठे अपडेट, हृतिक रोशन अभिनयासह सांभाळणार दिग्दर्शनाची जबाबदारी!
ईदच्या दिवशी रिलीज होणाऱ्या ‘सिकंदर’ चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवालांनी केली आहे. या चित्रपटात सलमान खान पहिल्यांदाच दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदानासोबत पाहायला मिळणार आहे. ‘सिकंदर’ चित्रपटात सलमान, रश्मिकाव्यतिरिक्त काजल अग्रवाल, शर्मन जोशी, प्रतीक बब्बर झळकणार आहे. तसेच ‘बाहुबली ‘चित्रपटातील कटप्पा म्हणजे अभिनेता सत्यराज खलनायिकेच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.