(फोटो सौजन्य - अकाउंट)
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनच्या ‘क्रिश’ फ्रँचायझीचे आतापर्यंत तीन भाग प्रदर्शित झाले आहेत, तर चौथा भाग बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. दरम्यान, राकेश रोशन यांनी ‘क्रिश ४’ बद्दल एक मोठी अपडेट दिली आहे. १२ वर्षांनंतर, भारताचा सुपरहिरो ‘क्रिश’ चित्रपटाचा सिक्वेल परत येणार आहे पण ट्विस्ट असा आहे की यावेळी हृतिक रोशन केवळ अभिनयच करणार नाही तर दिग्दर्शनाची जबाबदारीही सांभाळणार आहे. तसेच, राकेश रोशन यांनी ही बातमी स्वतः दिली आहे.
पहिल्याच दिवशी L2 Empuran टॉलिवूड चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धमाका, केली रेकॉर्ड ब्रेक कमाई
काय म्हणाले राकेश रोशन?
पिंकव्हिलाशी बोलताना राकेश रोशन म्हणाले की, ते आणि आदित्य चोप्रा एकत्रितपणे ‘क्रिश ४’ ची निर्मिती करणार आहे. ते आणि त्यांचा मुलगा हृतिक रोशनकडे दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवत आहे. अभिनेता म्हणाला की या अभिनेत्याकडे खूप स्पष्ट आणि महत्त्वाकांक्षी दृष्टी आहे. यादरम्यान, त्यांनी ‘क्रिश ४’ च्या दिग्दर्शनाची जबाबदारी हृतिक रोशनकडे सोपवण्याच्या घोषणेबद्दलच्या सोशल मीडिया पोस्टवरही उल्लेख केला आहे.
BIGGG NEWS – IT’S OFFICIAL… RAKESH ROSHAN – ADITYA CHOPRA TO JOINTLY PRODUCE ‘KRRISH 4’… HRITHIK ROSHAN TURNS DIRECTOR… #HrithikRoshan turns director for #India‘s biggest superhero franchise #Krrish4.#Krrish4 will be produced by #AdityaChopra [#YashRajFilms] in… pic.twitter.com/HYYsqrXDbF
— taran adarsh (@taran_adarsh) March 28, 2025
राकेश रोशन यांनी सांगितले की, ते त्यांचा मुलगा हृतिक रोशनला म्हणाले, ‘दुग्गु, २५ वर्षांपूर्वी मी तुला अभिनेता म्हणून लाँच केले होते. आता २५ वर्षांनंतर मी तुला दिग्दर्शक म्हणून लाँच करत आहे. जेणेकरून आदित्य चोप्रा आणि आमच्यासारख्या दोन चित्रपट निर्मात्यांसह, तुम्ही आमचा सर्वात महत्त्वाकांक्षी चित्रपट – ‘क्रिश ४’ पुढे घेऊन जाऊ शकाल. या नवीन कामासाठी मी हृतिक रोशनला शुभेच्छा आणि आशीर्वाद देतो.’ असे ते म्हणाले आहे.
सेलिब्रिटी ‘गुढीपाडवा’…, मराठमोळे कलाकार कसे सेलिब्रेट करतात मराठी नववर्ष ?
चित्रपटाचे चित्रीकरण कधी सुरू होणार
पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, ‘क्रिश ४’ ची निर्मिती आदित्य चोप्रा त्यांच्या YRF बॅनरखाली करणार आली आहे. हा चित्रपट २०२६ च्या सुरुवातीला प्रदर्शित होणार असल्याचे समजले आहे. चित्रपटाची कथा लॉक करण्यात आली आहे असेही सांगण्यात आले आहे. या सुपरहिरो फ्रँचायझीच्या प्री-व्हिज्युअलायझेशनचे कामही सुरू झाले आहे. प्री-प्रॉडक्शन, रेकींग, शूटिंग प्लॅनिंग आणि कॅरेक्टर स्केचचे काम सुमारे एक वर्ष केले जाणार आहे. या सर्व गोष्टी हृतिक रोशनच्या दिग्दर्शनाखाली घडणार आहे. हा चित्रपट भारतातील सर्वात मोठा आणि महत्त्वाकांक्षी चित्रपट म्हणून चित्रित केला जाणार आहे.