Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिद्धू मूसेवालानंतर आता B Praak? गायक बी-प्राकला लॉरेन्स बिश्नोई गँग कडून धमकी; १० कोटीं द्या नाहीतर

सिद्धू मूसेवालानंतर आता गायक बी-प्राक लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर असल्याचा दावा समोर आला आहे. बी-प्राकच्या मित्राला धमकीचा फोन व १० कोटींच्या खंडणीची मागणी झाल्याने खळबळ उडाली असून पोलिस तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 17, 2026 | 10:52 AM
entertainment (फोटो सौजन्य: social media)

entertainment (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • बी-प्राकच्या मित्र दिलनूरला परदेशी नंबरवरून धमकीचा कॉल
  • एका आठवड्यात १० कोटी न दिल्यास नुकसान करण्याची धमकी
  • दिलनूरची तक्रार; पोलिसांकडून तपास सुरू
लॉरेन्स बिश्नोई गँग हे नेहमी चर्चेत राहणारे गॅंग आहे. त्यांनी एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांना लक्ष्य केले आहे. लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) गँग यांनी सलमान खानला अनेक वेळेस जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारली. प्रामुख्याने या टोळीच्या निशाण्यावर पंजाबी गायक हे राहिले आहेत. सिद्धू मूसेवाला नंतर या टोळीने हनी सिंह, एपी ढिल्लों आणि मनकीरत औलख यांच्यासह अनेक मोठ्या कलाकारांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत.

RSS ने गाठले शताब्दी! लाँच केला नवा चित्रपट ‘शतक : संघ के १०० वर्ष’; मुंबईत ट्रेलर अनावरण सोहळा आयोजित

आता लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर पंजाबचे प्रसिद्ध गायक बी-प्राक (B Praak)असल्याची माहिती समोर येत आहे. बी-प्राक यांचा जवळचा मित्र आणि गायक दिलनूर (Dilnoor) याला धमकीचा फोन आला आहे. एवढेच नाही तर १० कोटींची खंडणी देखील मागितली आहे. जर १० कोटी दिले नाही तर बी-प्राकला नुकसान पोहोचवण्याची धमकी दिली आहे.

काय नेमकं प्रकरण?

पंजाबी गायक दिलनूर यांना ५ जानेवारी रोजी परदेशी नंबरवरून धमकीचा फोन आला होता. मात्र त्यांनी फोन उचलला नाही. ६ जानेवारी रोजी एका वेगळ्या परदेशी नंबरवरून फोन आला. तो फोन उचलल्यानंतर समोरच्या व्यक्तीचा आवाज संशयास्पद वाटल्याने दिलनूर यांनी तात्काळ कॉल कट केला.फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे नाव आरजू बिश्नोई असल्याचे सांगितले.

फोन कट करताच त्यांना एक व्हॉइस मेसेज आला. हा मेसेज धमकीचा होता. या ऑडिओ मेसेजमध्ये कॉल करणाऱ्याने एका आठवड्यात १० कोटी रुपयांची मागणी केली असून, अन्यथा बी-प्राक यांना नुकसान पोहोचवण्याची धमकी दिली. हा सगळा प्रकार घडताच दिलनूर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आता या प्रकरणात काय महत्वाचे उपडेट समोर येतात, पोलीस कारवाई काय करणार? हे सगळं पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

बी-प्राक हे अनेक प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित

बी-प्राक हे प्रसिद्ध गायक, संगीत दिग्दर्शक आणि संगीतकार असून त्यांनी पंजाबी सिनेसृष्टीसोबतच हिंदी संगीतसृष्टीतही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘मन भरया’ हे त्यांचे पहिले गाणे आजही चाहत्यांचे आवडते आहे. आपल्या उत्कृष्ट गायन कारकिर्दीसाठी बी-प्राक यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत.

Movie Collection: ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ बॉक्स ऑफिसवर सुस्साट, दोन आठवड्यात केली एवढ्या कोटींची कमाई!

💡

Frequently Asked Questions

  • Que: धमकी कोणाला देण्यात आली?

    Ans: बी-प्राकचे जवळचे मित्र व गायक दिलनूर यांना.

  • Que: किती खंडणीची मागणी करण्यात आली?

    Ans: १० कोटी रुपयांची.

  • Que: सध्या पोलीस काय करत आहेत?

    Ans: तक्रारीनंतर प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Web Title: Singer b praak receives threats from the lawrence bishnoi gang

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 10:52 AM

Topics:  

  • Lawrence bishnoi Gang
  • Punjabi Singer

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.