'सितारे जमीन पर' चित्रपटातून आमिर खानचं जबरदस्त कमबॅक, पहिल्या दिवसाच्या कमाईचा आकडा आला समोर
आर एस प्रसन्ना दिग्दर्शित ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आमिर खान आणि जेनेलिया देशमुख स्टारर चित्रपटाची सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे दोघंही प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. अखेर हा बहुप्रतिक्षित चित्रपट २० जून रोजी अर्थात काल बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. प्रदर्शनाच्या दिवशी या चित्रपटाने त्याच्या अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडत जबरदस्त कमाई केली आहे. जाणून घेऊया चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली आहे.
बॉलिवूडची ‘कूल आई’! रीमा लागूंचा अभिनय पाहून श्रीदेवीलाही वाटायची भीती! जाणून घ्या अभिनेत्रीविषयी…
सेलिब्रिटींसह समीक्षकांकडून आणि चाहत्यांकडून ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाचे कौतुक केले जात आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने दिलासादायक कमाई केली आहे. सॅकल्निक ट्रेड ॲनालिस्टने दिलेल्या माहितीनुसार, आमिर खान आणि जेनेलिया देशमुख स्टारर ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाने पहिल्या दिवशी ११. ७० कोटींची कमाई केलेली आहे. हिंदी, तामिळ आणि तेलुगू या तीन भाषेमध्ये हा चित्रपट रिलीज झालेला आहे. अद्याप निर्मात्यांकडून चित्रपटाच्या कमाईचा अधिकृत आकडा समोर आलेला नाही. अधिकृत आकडेवरीमध्ये थोडा फरक असू शकेल.
‘बचपन का प्यार’ म्हणत अक्षर कोठारीने बांधली लग्नगाठ, फोटो व्हायरल
८० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाने सनी देओलच्या ‘जाट’ चित्रपटाला ही मागे टाकले आहे. सनी देओलचा ॲक्शन- थ्रिलर चित्रपट ‘जाट’ या वर्षी १० एप्रिल रोजी बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. त्या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ९.५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाने सनी देओलच्या ‘जाट’ चित्रपटाला मागे टाकत आपल्या नावावर विक्रम केला आहे. आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यामध्ये येत्या विकेंडला वाढ होण्याची शक्यता आहे. आहेत, ‘तारे जमीन पर’ने ‘सितारे जमीन पर’च्या तुलनेत २००७ मध्ये प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी २.६२ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यावेळी तो चित्रपट हिट झाला होता.
प्रसिद्ध अभिनेत्रीचा राहत्या घरी मृत्यू, दुर्गंधीमुळे शेजाऱ्यांना आढळला मृतदेह; काय आहे गूढ ?
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपट रिलीज झाल्यानंतर अभिनयात ब्रेक घेतला होता. तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा आमिर खानने रुपेरी पडद्यावर दमदार कमबॅक केले आहे. २००७ साली रिलीज झालेल्या ‘तारे जमीन पर’ चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. दरम्यान, ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट आमिर खानच्या करियरमधला पहिला वहिला सिक्वेल चित्रपट आहे. आरएस प्रसन्ना दिग्दर्शित आणि आमिर खान प्रॉडक्शन निर्मित, ‘सितारे जमीन पर’ चित्रपटांत आमिर आणि जेनेलिया व्यतिरिक्त इतर १० नवोदित कलाकार देखील आहेत. आरुष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, संवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भन्साळी, आशिष पेंडसे, ऋषी शहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर, अशी त्या कलाकारांची नावं आहेत.