अक्षर कोठारीने उरकले लग्न, पहा सुंदर फोटोज (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सध्या स्टार प्रवाह मालिका ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ ही गाजतेय ती प्रमुख भूमिका असणाऱ्या अक्षर कोठारी आणि ईशा केसकर यांच्या केमिस्ट्रीमुळे. अक्षर कोठारीने आपल्या सोशल मीडियावर अचानक लग्नाचे फोटो पोस्ट करून सर्वांनाच सुखद धक्का दिलाय. यावर्षी अनेक मराठी सेलिब्रिटींनी लग्नाच्या गाठी बांधलेल्या दिसून आल्या आहेत आणि आता या यादीमध्ये अक्षरचेही नाव जोडले गेले आहे. ‘Then, now and always.#BachpanKaPyar #SaAkshar’ अशी कॅप्शन आणि हॅशटॅग देत त्याने आपल्या चाहत्यांबरोबर आपला आनंद शेअर केलाय.
अक्षरने फोटो पोस्ट करतानाच त्याचे चाहते आणि मनोरंजन क्षेत्रातील त्याच्या मित्रमैत्रिणींनी अभिनंदनाचा अक्षरशः वर्षाव केल्याचे दिसून आले आहेत आणि काही वेळातच अक्षर आणि त्याच्या बायकोचे फोटो व्हायरल झालेले दिसून येत आहेत. अक्षर आणि त्याच्या बायकोचा लुकही तितकेच लक्ष वेधून घेतोय. पाहूया कसा आहे त्यांचा लग्नातील लुक (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
अबोली साडी आणि ऑफव्हाईट सूट
अक्षर-सारिकाचा लुक
अक्षर आणि त्याची पत्नी सारिका हे अत्यंत सुंदर आणि लक्षवेधी रूपात दिसत असून अक्षरने आपल्या लग्नासाठी ऑफव्हाईट रंगाचा शेरवानी सूट घातलेला दिसून येत आहे तर पत्नी सारिकाने अबोली रंगाची सिल्क साडी नेसल्याचे दिसून येत आहे. सारिका आणि अक्षर दोघांनीही आपल्या लग्नाचा लुक अत्यंत क्लासी आणि रॉयल असा केल्याचे दिसून येत आहे.
“एका वयानंतर फिजिकल…” रोमान्सबद्दल काय बोलून गेली ६६ वर्षीय नीना गुप्ता; फुटणार का नवा वाद?
टेम्पल ज्वेलरी
मंगळसूत्राचे नाजूक डिझाईन
अक्षरच्या बायकोने क्लासी आणि रॉयल लुक केला असून तिने टेम्पल ज्वेलरीचा आधार घेतला आहे. वेलासह टेम्पल ज्वेलरी कानातले घातले असून गळ्यात संपूर्ण मोठा नेकलेसदेखील टेम्पल ज्वेलरीचा घातला आहे आणि तिच्या मंगळसूत्राने लक्ष वेधले आहे. अत्यंत नाजूक असे काळे मणी, सोनं आणि मध्ये हिरा असलेले हे मंगळसूत्र कोणत्याही नव्या नवरीसाठी आकर्षक डिझाईन असणारेच आहे.
साधी हेअरस्टाईल
साधी पण लक्षवेधी हेअरस्टाईल
केसांना मध्ये भांग पाडत तिने अर्धवट केस मोकळे सोडले आहेत आणि साडीसह तिचा हा लुक आकर्षक आणि तितकाच मनमोहकही दिसतोय. याशिवाय तिने हातावर साधी पण आकर्षक मेहंदी काढली आहे आणि हातात बांगड्या घालत आपला नवरीचा लुक पूर्ण केला आहे. नवरी असल्यावर अगदी भरभरून काही घालायलच हवं या संकल्पनेलाच तिने तडा दिलाय.
बचपन का प्यार
लहानपणीच्या मैत्रिणीशी केलं लग्न
अक्षरने सारिकाला आपले लहानपणीचे प्रेम असल्याचे म्हटले आहे. मात्र आतापर्यंत कधीही अक्षरच्या बाबतीत कोणतीही बातमी बाहेर आली नव्हती. त्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी हा नक्कीच सुखद धक्का आहे. तसंच अक्षरची बायको सारिका ही शास्त्रज्ञ असल्याची प्राथमिक माहिती एका साईटवरून देण्यात आली आहे. मात्र याबाबत अजूनही पुष्टी मिळालेली नाही.
आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त ‘देवमाणूस’ फेम अभिनेत्री अस्मिता देशमुख शेअर केला खास अनुभव!
मिनिमल मेकअप
सुंदर आणि आकर्षक मेकअप
अक्षर आणि सारिकाने अत्यंत मिनिमल मेकअप केला आहे. मात्र दोघेही अत्यंत सुंदर आणि लोभसवाणे दिसत आहेत. सारिकाने फाऊंडेशन, बेसिक मेकअप, हायलायटर, लायनर, मस्कारा, आयलॅशेस, काजळ आणि लाईट लिपस्टिक लावत आपला लुक पूर्ण केलाय. तर दोघांची जोडी ही पहातच रहावी अशी सुंदर दिसतेय.