Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“स्मार्ट सुनबाई” सिनेमा या तारखेला होणार प्रदर्शित! प्रेक्षकांसाठी नवा अनुभव

रहस्य, हास्य आणि कौटुंबिक नातेसंबंधांचा मेळ साधणारा “स्मार्ट सुनबाई” हा सिनेमा २१ नोव्हेंबर २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. शिवाजी दोलताडे दिग्दर्शित हा चित्रपट प्रेक्षकांसाठी नवा अनुभव ठरणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 19, 2025 | 04:15 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

रहस्य, हास्य आणि भावबंधांचा मेळ साधणारा नवा मराठी सिनेमा “स्मार्ट सुनबाई” प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. शिवाजी दोलताडे दिग्दर्शित आणि गोवर्धन दोलताडे व गार्गी निर्मित हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात २१ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. कार्तिक दोलताडे पाटील सह-निर्माता असलेल्या या सिनेमाचे नुकतेच पोस्टर प्रदर्शित झाले असून, त्यानेच प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे.

प्रत्येकाला ताल धरायला लावणारं “छबी”मधील “होय महाराजा” गाणं लाँच, चित्रपट कधी होणार रिलीज?

पोस्टरवर काही कलाकार शहरी लुकमध्ये तर काही ग्रामीण पार्श्वभूमीत दिसत आहेत. या वैविध्यामुळेच कथेतील गूढतेला अधोरेखित केले गेले असून, चाहत्यांच्या मनात “ही स्मार्ट सुनबाई कोण आणि तिच्या आयुष्यात काय घडणार आहे?” असा प्रश्न निर्माण झाला आहे. या चित्रपटात रोहन पाटील, संतोष जुवेकर, भाऊ कदम, मोहन जोशी, दीपक शिर्के, अंशुमन विचारे, विनम्र बाबल, सायली देवधर, प्राजक्ता गायकवाड, किशोरी शहाणे, उषा नाईक आदींसह दिग्गज आणि लोकप्रिय कलाकार झळकणार आहेत. कलाकारांची दमदार केमिस्ट्री हा या सिनेमाचा मोठा आकर्षणबिंदू ठरणार आहे.

चित्रपटाची कथा व लेखन योगेश शिरसाट यांनी केले असून, संगीतकार विजय नारायण गवंडे आणि साई–पियुष यांनी बहारदार संगीत दिले आहे. गीतकार वैभव देशमुख आणि अदिती द्रविड यांनी गाणी लिहिली आहेत, तर अजय गोगावले, वैशाली माढे, आनंदी जोशी, सावनी रवींद्र आणि उर्मिला धनगर यांनी या गाण्यांना आपले स्वर दिले आहेत. संगीत, अभिनय आणि कथानक यांचा अनोखा संगम प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे.

सारंगची अटक आणि सावलीची झुंज! ‘सावळ्याची जणू सावली’ एका नव्या वळणावर 

दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांच्या मते, प्रत्येक सुनेला “स्मार्ट सुनबाई” होण्यासाठी हा चित्रपट प्रेरणादायी ठरेल. रहस्य, थरार, हास्य आणि कौटुंबिक नातेसंबंधांचा सुंदर मेळ साधणारा “स्मार्ट सुनबाई” हा नवा चित्रपट २१ नोव्हेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होत आहे.

Web Title: Smart sunbai movie to be released on this date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2025 | 04:15 AM

Topics:  

  • Entertainment News

संबंधित बातम्या

संजू राठोडने “सुंदरी” गाण्याने यूट्यूब फॅनफेस्ट 2025 मध्ये आणली रंगत, प्रेक्षकांसमोर प्रीमियर!
1

संजू राठोडने “सुंदरी” गाण्याने यूट्यूब फॅनफेस्ट 2025 मध्ये आणली रंगत, प्रेक्षकांसमोर प्रीमियर!

‘कलकी २८९८ एडी’च्या सिक्वेलमध्ये नाही दिसणार दीपिका पदुकोण? अभिनेत्रीचा मोठा निर्णय
2

‘कलकी २८९८ एडी’च्या सिक्वेलमध्ये नाही दिसणार दीपिका पदुकोण? अभिनेत्रीचा मोठा निर्णय

Exclusive: ‘तिने हात पाहिला आणि…’ विवेक सांगळेचा Acting क्षेत्रात येण्याचा मजेशीर किस्सा
3

Exclusive: ‘तिने हात पाहिला आणि…’ विवेक सांगळेचा Acting क्षेत्रात येण्याचा मजेशीर किस्सा

Rise And Fall: ‘इज्जत राखणं हे आपल्या हातात आहे…त्याने मात्र’, धनश्री वर्माने केली युझवेंद्रच्या वागणुकीची पोलखोल
4

Rise And Fall: ‘इज्जत राखणं हे आपल्या हातात आहे…त्याने मात्र’, धनश्री वर्माने केली युझवेंद्रच्या वागणुकीची पोलखोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.