Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कलकी २८९८ एडी’च्या सिक्वेलमध्ये नाही दिसणार दीपिका पदुकोण? अभिनेत्रीचा मोठा निर्णय

संदीप रेड्डी वांगा यांच्या "स्पिरिट" नंतर, दीपिका पदुकोणने आता आणखी एक मोठा प्रकल्प गमावला आहे. तिने 'कल्की २' मधून माघार घातली आहे. तसेच ती या चित्रपटाचा भाग नसणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 18, 2025 | 02:54 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • दीपिका पदुकोणने आणखी एका चित्रपटाला दिला नकार
  • निर्मात्यांनी शेअर केली ही बातमी
  • कोणता आहे हा चित्रपट?

अ‍ॅटली आणि अल्लू अर्जुन यांच्या ‘ए२२ एक्स ए६’ या चित्रपटामुळे चर्चेत असलेली दीपिका पदुकोण आता एका महत्त्वाच्या बातमीमुळे आणखी एकदा चर्चेत आली आहे. कामाच्या वेळा आणि मानधनावरून संदीप रेड्डी वांगाच्या ‘स्पिरिट’ चित्रपटातून बाहेर पडलेल्या दीपिकाने आता आणखी एका मोठ्या चित्रपटातूनही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे, जो ‘कल्की २८९८ एडी’ चा सिक्वेल आहे. निर्मात्यांनी स्वतः ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली. ही बातमी ऐकून चाहते चकीत झाले आहेत.

निर्मात्यांनी शेअर केली ही बातमी
आज वैजयंती मूव्हीजने त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर एका निवेदनाद्वारे घोषण करण्यात आली की दीपिका पदुकोण आता ‘कल्की २८९८ एडी’ च्या आगामी सिक्वेलचा भाग राहणार नाही. पोस्टमध्ये लिहिले होते की, “अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे की दीपिका पदुकोण ‘कल्की २८९८ एडी’ च्या आगामी सिक्वेलचा भाग असणार नाही आहे. बराच विचारविनिमय केल्यानंतर, आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. पहिला चित्रपट बनवण्याचा लांब प्रवास असूनही, आम्ही आमची भागीदारी सुरू ठेवू शकलो नाही. ‘कल्की २८९८ एडी’ सारखा चित्रपट त्या वचनबद्धतेला आणि त्याहूनही बरेच काही पात्र आहे. त्याच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी आम्ही त्याला शुभेच्छा देतो.” असे लिहून निर्मात्यांनी ही बातमी शेअर केली आहे.

‘आदल्याच दिवशी आम्ही बोललो…’, अभिजीत खांडकेकर पुन्हा एकदा प्रियाच्या आठवणीत भावुक, म्हणाला…

“कलकी” मध्ये दीपिकाने सुमतीची भूमिका
नाग अश्विन दिग्दर्शित “कलकी २८९८ एडी” हा चित्रपट २०२४ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात दीपिका पदुकोणने गर्भवती महिला सुमतीची भूमिका केली होती. चित्रपटात तिच्या न जन्मलेल्या मुलाला कल्की अवतार म्हणून साकारले जाते. चाहत्यांना दीपिकाची भूमिका खूप आवडली आणि त्यांनी तिच्या अभिनयाचे कौतुक केले. आता, कल्कीच्या सिक्वेलमधून दीपिका पदुकोणला अचानक वगळण्यात आल्याने तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

 

This is to officially announce that @deepikapadukone will not be a part of the upcoming sequel of #Kalki2898AD.

After careful consideration, We have decided to part ways. Despite the long journey of making the first film, we were unable to find a partnership.

And a film like…

— Vyjayanthi Movies (@VyjayanthiFilms) September 18, 2025

अद्याप नवीन नाव जाहीर झालेले नाही
कल्की अवतारावर आधारित “कलकी २८९८ एडी” या चित्रपटात दीपिका पदुकोण, “बाहुबली” स्टार प्रभास, अमिताभ बच्चन आणि कमल हासन यांच्याही मुख्य भूमिका आहेत. चाहते या चित्रपटाच्या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत आहेत, जो पहिल्या भागातून कथा पुढे नेईल. परंतु, दीपिकाच्या बाहेर पडल्यानंतर दुसऱ्या भागात एका नवीन अभिनेत्रीची निवड होण्याची अपेक्षा आहे. तसेच, निर्मात्यांनी अद्याप कोणतेही नवीन नाव जाहीर केलेले नाही. आणि या भूमिकेबद्दल कोणतीही माहिती सांगितलेली नाही.

फहाद अहमदने कंगनाला म्हटले वाईट राजकारणी, पत्नी स्वरा भास्कर लगेच फटकारले; म्हणाली ‘तिचा प्रवास कौतुकास्पद…’

“स्पिरिट” नंतर, दीपिकाला “कलकी” मधूनही बाहेर पडली
यापूर्वी, दीपिकाने संदीप रेड्डी वांगाचा चित्रपट “स्पिरिट” चित्रपट देखील सोडला होता. कामाचे तास आणि फीमुळे तिने यापूर्वी “स्पिरिट” सोडला होता. या चित्रपटात प्रभास देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दीपिकाच्या बाहेर पडल्यानंतर, निर्मात्यांनी तृप्ती डिमरीला कास्ट केले आहे, तिने संदीप रेड्डी वांगासोबत “अ‍ॅनिमल” मध्ये देखील काम केले होते. मुलगी दुआला जन्म दिल्यापासून दीपिका कोणत्याही चित्रपटात दिसलेली नाही. ती शेवटची “सिंघम अगेन” मध्ये दिसली होती. अलीकडेच, ती अ‍ॅटली आणि अल्लू अर्जुनच्या आगामी मोठ्या बजेट चित्रपट, A22 x A6 मध्ये सामील झाली. या चित्रपटाचे चित्रीकरण आधीच सुरू झाले आहे.

Web Title: Deepika padukone dropped from prabhas starrer kalki 2898 ad sequel makers officially announce

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2025 | 02:54 PM

Topics:  

  • Deepika Padukone
  • Entertainment News
  • Hollywood

संबंधित बातम्या

Robert Redford: हॉलिवूडचा ‘गोल्डन बॉय’ रॉबर्ट रेडफोर्ड यांचे निधन, वयाच्या ८९ व्या घेतला अखेरचा श्वास!
1

Robert Redford: हॉलिवूडचा ‘गोल्डन बॉय’ रॉबर्ट रेडफोर्ड यांचे निधन, वयाच्या ८९ व्या घेतला अखेरचा श्वास!

Bobby Hart: प्रसिद्ध गीतकार बॉबी हार्ट यांचे निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2

Bobby Hart: प्रसिद्ध गीतकार बॉबी हार्ट यांचे निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

९ मुलांच्या जन्मनंतर ५२ वर्षीय गायिकेचा घटस्फोट, २९ व्या Anniversary आधीच पत्नीने धक्कादायक सरप्राईज
3

९ मुलांच्या जन्मनंतर ५२ वर्षीय गायिकेचा घटस्फोट, २९ व्या Anniversary आधीच पत्नीने धक्कादायक सरप्राईज

Exclusive: ‘तिने हात पाहिला आणि…’ विवेक सांगळेचा Acting क्षेत्रात येण्याचा मजेशीर किस्सा
4

Exclusive: ‘तिने हात पाहिला आणि…’ विवेक सांगळेचा Acting क्षेत्रात येण्याचा मजेशीर किस्सा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.