Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोनू निगमच्या नव्या वर्षाची सुरुवात मराठमोळ्या गाण्याने, ‘संगीत मानापमान’मधील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला…

सोनू निगमने आपल्या गाण्याने देशातील प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सोनू निगमच्या आवाजाची जादू प्रत्येकाच्या मनावर नेहमीच पसरली आहे. २०२५ वर्षाची सुरुवात सोनू निगमने एका मराठमोळ्या गाण्याने केली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jan 06, 2025 | 06:40 PM
सोनू निगमच्या नव्या वर्षाची सुरुवात मराठमोळ्या गाण्याने, ‘संगीत मानापमान’मधील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला...

सोनू निगमच्या नव्या वर्षाची सुरुवात मराठमोळ्या गाण्याने, ‘संगीत मानापमान’मधील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला...

Follow Us
Close
Follow Us:

सोनू निगमने आपल्या गाण्याने देशातील प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.सोनू निगमच्या आवाजाची जादू प्रत्येकाच्या मनावर नेहमीच पसरली आहे. अनेक भाषांमधून सोनू निगमने पार्श्वगायन केलं आहे. ते सर्वात लाडक्या गायकांपैकी एक आहेत ह्यात काहीच शंका नाही. आता पर्यंत त्यांनी भरपूर गाण्यांना आपला आवाज दिला आहे. पण यंदा नवीन वर्षाची सुरुवात सोनू निगमने एका मराठमोळ्या गाण्याने केली आहे. होय सुबोध भावे दिग्दर्शित आणि शंकर एहसान लॉय यांनी संगीतबद्ध केलेलं, आगामी मराठी चित्रपट ‘संगीत मानापमान’ यातलं गाणं ‘चंद्रिका’ सोनू निगम ह्यांनी आपल्या सुमधुर आवाजाने गायलं आहे जे आज प्रेक्षकांच्या भेटीला आलंय.

‘पुष्पा २’ प्रीमियरच्या घटनेची पुनरावृत्ती; ‘गेम चेंजर’ इव्हेंटमध्ये राम चरणच्या २ चाहत्यांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

गायक सोनू निगमने पहिल्यांदाच अशा प्रकारचं गाणं एका मराठी सिनेमासाठी गायलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. “चंद्रिका” या गाण्याविषयी बोलताना सोनू निगम म्हणाले ‘असं गाणं मी कदाचित आतापर्यंत कोणत्याही चित्रपटासाठी गायलं नसेल, हे गाणं खूपच वेगळं आहे, हे गाणं जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा एका मंदिराचे वातावरण तयार झाले, परंतु हे एक डिव्होशनला सोंग नसून प्रेमाचं गीत आहे. प्रेमा मध्ये सुद्धा भक्ती आहे, मी ह्या गाण्यासाठी कुठला हि स्वार्थ ना करता स्वतःला पूर्णपणे समर्पण केलं आहे. देवाचे आभार आहेत कि मला अशा प्रकारचं गाणं गायला मिळाला. ‘

अक्षय कुमारने भाची सिमर भाटीयाचे केले कौतुक, म्हणाला, ‘सिमर पुत्तर तू तेह…’

जितकं सुरेख हे गाणं ऐकायला आहे तितकच सुरेख चित्रीकरण या गाण्याचं झालंय. सुबोध भावे आणि वैदेही परशुरामी ह्या दोघा कलाकारांवर हे गाणं चित्रीत केलं गेलय आणि त्यात सोनू निगमच्या आवाजाची जादू तर जणू काही स्वर्ग.

सोनू निगम ह्यांनी नाट्य संगीत बद्दल माहिती देताना सांगितलं ‘मी संगीताच्या शैलीशी संबंधित आहे, म्हणूनच मी जगात शक्य तितके संगीत शिकण्याचा प्रयत्न करतो, मला माझ्या लहानपणी शास्त्रीय संगीत शिकता आले नाही. त्यामुळे जितकं होईल तितकं शिकून मी प्रेक्षकांसाठी गातो. मी भारतातील अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत, लोकांचा विश्वास आहे की मी गाऊ शकतो, त्यामुळे मला प्रत्येक भाषा समजून घेण्याची संधी मिळाली. स्वर्गीय लता मंगेशकर जी आणि आशा जी हे महान गीतकार आहेत तर अजय-अतुल हे सुद्धा उत्तम संगीतकार आहेत, त्या सर्वांना नाट्यसंगीताची खूप खोलवर माहित आहे. त्यामुळे त्यांच्याकाढून शिकण्यासारखं खूप काही आहे.’

इतकच नव्हे तर मराठी संगीत आणि मराठी गायक या विषयी सुद्धा सोनू निगम ह्यांनी आपला मत मांडत त्यांचा आवडता मराठी गायक कोण ह्याची माहिती दिली ते म्हणाले “मराठी गाण्यांमध्ये खूप शोध आहे, जो कोणी संगीतकार किंवा गायक सुराला शोधून काढतो फक्त तोच एक लेजेंड बनू शकतो. मराठी संगीत तर आहेच पण त्याबरोबर मराठी लेखन हे ही एक वेगळं विश्व आहे. मराठी गायकांबद्दल सांगितलं तर बेला शेंडे, स्वप्नील बांदोडकर हे सगळे उत्तम गायक आहेत. पण तरुणांमध्ये मला आर्या आंबेकरचा आवाज खूप आवडतो, तिने चंद्रमुखी मध्ये खूप सुरेख गायलं आहे. इतर सुद्धा अनेक मराठी गायक आहेत ज्यांचा आवाज मला खूप आवडतो.’

या वेळी बोलताना सोनू निगम ह्यांनी “संगीत मानापमान” या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेता सुबोध भावे यांची तारीफ केली आणि त्यांच्या कामाचं कौतुक केलं. जिओ स्टुडिओज ह्यांचे सुद्धा सोनू निगम ह्यांनी आभार मानत सांगितलं कि “जिओ स्टुडिओज मराठी नेहमीच काहीतरी नवीन कन्टेन्ट प्रेक्षकांसमोर आणण्याच्या प्रयत्नात असतं जे खरोखरच प्रशंसनीय आहे.

जुनैद खानचा खुलासा; ‘तारे जमीन पर’ची स्क्रिप्ट वाचताना आमिर खानला मिळाली मुलाच्या आजाराची माहिती!

सुंदर आवाज, सुंदर कंपोझिशन, सुंदर चित्रीकरण असल्यामुळे रसिक प्रेक्षकांकडून ह्या गाण्याला चांगलीच पसंती मिळाली आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत ‘संगीत मानापमान’ या चित्रपटात सूबोध भावे आणि वैदेही परशुरामी सोबत सुमित राघवन, उपेंद्र लिमये, नीना कुलकर्णी, निवेदिता सराफ, शैलेश दातार, अर्चना निपाणकर आदी कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. पटकथा आणि कथाविस्तार शिरीष गोपाळ देशपांडे आणि ऊर्जा देशपांडे यांचे आहे तर अतिरिक्त पटकथा आणि संवाद पटकथा प्राजक्त देशमुख यांनी केले आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे आणि श्री गणेश मार्केटिंग निर्मित, सुबोध भावे दिग्दर्शित “संगीत मानापमान” चे म्युझिक लेबल सारेगामा आहे. ‘संगीत मानापमान’ हा संगीतमय चित्रपट १० जानेवारी २०२५ पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज आहे.

Web Title: Sonu nigam new marathi song chandrika sangeet manapmaan subodh bhave film released on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2025 | 06:40 PM

Topics:  

  • marathi film

संबंधित बातम्या

तो देवाचा माणूस आहे ! मर्डर, थ्रिल आणि सस्पेन्सने भरलेल्या ‘दशावतार’ चित्रपटचा ट्रेलर अंगावर आणेल काटा
1

तो देवाचा माणूस आहे ! मर्डर, थ्रिल आणि सस्पेन्सने भरलेल्या ‘दशावतार’ चित्रपटचा ट्रेलर अंगावर आणेल काटा

‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटातून उलगडणार माती आणि नाती जोडणारी रंजक गोष्ट, चित्रपटाचा टीझर लाँच!
2

‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटातून उलगडणार माती आणि नाती जोडणारी रंजक गोष्ट, चित्रपटाचा टीझर लाँच!

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन, मोठमोठ्या तारकांची लागणार हजेरी!
3

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन, मोठमोठ्या तारकांची लागणार हजेरी!

साई बाबांचं दर्शन घेत ‘येरे येरे पैसा ३’च्या टीमने ‘आली रे आली गुलाबाची कळी’ गाणं केलं प्रदर्शित
4

साई बाबांचं दर्शन घेत ‘येरे येरे पैसा ३’च्या टीमने ‘आली रे आली गुलाबाची कळी’ गाणं केलं प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.