'पुष्पा २' प्रीमियरच्या घटनेची पुनरावृत्ती; 'गेम चेंजर' इव्हेंटमध्ये राम चरणच्या २ चाहत्यांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
सध्या टॉलिवूड चित्रपट कमालीचे चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ चित्रपट रिलीज झाला होता. त्यानंतर आता लवकरच रामचरणचा ‘गेम चेंजर’ चित्रपट रिलीज होणार आहे. अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ चित्रपट कमालीचा चर्चेत राहिला. जितका कमाईमुळे चर्चेत राहिला त्यापेक्षा जास्त प्रीमियरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या प्रकरणामुळे चित्रपट जबरदस्त चर्चेत राहिला आहे. दरम्यान, ‘पुष्पा २’च्या प्रीमियरदरम्यान चेंगराचेंगरी प्रकरणात एका महिलेचा मृत्यूही झाला. याप्रकरणी अल्लू अर्जुनला अटकही करण्यात आली होती. आता असाच काहीसा प्रकार रामचरणच्या ‘गेम चेंजर’ चित्रपटासोबतही घडला आहे.
जुनैद खानचा खुलासा; ‘तारे जमीन पर’ची स्क्रिप्ट वाचताना आमिर खानला मिळाली मुलाच्या आजाराची माहिती!
शनिवारी रात्री झालेल्या ‘गेम चेंजर’ चित्रपटाच्या प्री-रिलीज इव्हेंटमध्ये सहभागी झालेल्या राम चरणच्या दोन चाहत्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. या इव्हेंटमध्ये राम चरण आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याणही उपस्थित होते. येत्या १० जानेवारीला रामचरणचा ‘गेम चेंजर’ चित्रपट भारतासह संपूर्ण जगभरात रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या प्री- रिलीज इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतरच मोठी दुर्घटना घडली आहे. अभिनेता रामचरणच्या दोन चाहत्यांचा मृत्यू झाला असून चित्रपटाचे निर्माते दिल राजू यांनी मृत्यू झालेल्या चाहत्यांच्या कुटुबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली आहे.
‘ही फक्त सुरुवात आहे’; अभिषेक बच्चन बनला युरोपियन T20 प्रीमियर लीगमधील संघाचा सहमालक!
कार्यक्रमानंतर नेमकं काय घडलं?
आंध्रप्रदेशातील राजमहेंद्रवरम (राजमुंदरी)मध्ये चित्रपटाच्या प्री- रिलीज इव्हेंटचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याणही उपस्थित होते. आंध्र प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांनी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थिती लावली होती. त्यामुळे राज्यातील अनेक नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली होती. प्री- रिलीजच्या कार्यक्रमानंतर झालेल्या दुर्घटनेत काकिंडाच्या गायगोलुपडू येथील २३ वर्षीय अरवा मणिकांत आणि २२ वर्षीय ठोकडा चरण अशी या दोन मृत्यू झालेल्या चाहत्यांची नावे आहेत. शनिवारी रात्री प्री- रिलीजचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते दोघंही दुचाकीवरून घरी परतत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या व्हॅनने त्यांना धडक दिली. दोघांनाही तात्काळ पेद्दापुरम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र जास्त गंभीर जखमेमुळे त्यांचा जीव वाचू शकला नाही. याप्रकरणी रंगमपेटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Producer #DilRaju garu announced ₹10 lakhs and assured support to the families of the two individuals Aarava Manikanta & Thokaada Charan who tragically lost their lives in the accident following the #GameChanger event. Our deepest condolences to their loved ones in this…
— Sri Venkateswara Creations (@SVC_official) January 6, 2025
‘गेम चेंजर’चे निर्माते दिल राजू यांनी मृत पावलेल्या चाहत्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देऊ केली आहे. श्री वेंकटेश्वरा क्रिएशन्स या प्रोडक्शन हाऊसच्या अधिकृत X अकाऊंटवर पोस्ट करत सांगितलं की, “निर्माते दिल राजू गरु यांनी मृत पावलेल्या चाहत्यांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची घोषणा केली आहे. अपघातात दुःखदपणे आपला जीव गमावलेल्या दोन व्यक्तींच्या कुटुंबीयांना मदत जाहीर केली आहे. #GameChanger इव्हेंट. या कठीण काळात त्यांच्या प्रियजनांप्रती आम्ही मनापासून शोक व्यक्त करतो.” दरम्यान, चित्रपटाच्या निर्मात्यांनी मृतांच्या परिवाराला मदत जाहीर केल्यानंतर पवन कल्याण यांनीही पीडित कुटुंबाला प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
Ram Kapoor: खरंच राम कपूरने सर्जरीद्वारे घटवले वजन? ट्रान्सफॉर्मेशनबाबत अभिनेत्याने सोडले मौन!