Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोनू सूद करणार स्टार प्लसच्या नवीन शो ‘संपूर्णा’चा ट्रेलर लॉन्च!

स्टार प्लसचा नवा शो ‘संपूर्णा’ सोनू सूदच्या हातून ट्रेलर लाँच होत असून, हा केवळ मनोरंजन नव्हे तर समाजातील स्त्रियांच्या संघर्षांचे वास्तव दाखवणारा प्रभावी प्रवास आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 30, 2025 | 08:59 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

स्टार प्लस नेहमीच सामाजिक आणि भावनिक विषयांना स्पर्श करणाऱ्या मालिकांमुळे चर्चेत राहिला आहे. आता या वाहिनीवर आणखी एक प्रभावी फिक्शन ड्रामा ‘संपूर्णा’ प्रेक्षकांसमोर येत आहे. खास बाब म्हणजे या शोचा ट्रेलर कोणताही साधा सेलिब्रिटी नव्हे, तर प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणारे बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते सोनू सूद लाँच करणार आहेत.

ऐन गणेशोत्सवात Allu Arjun ला बसला धक्का, अत्यंत जवळच्या व्यक्तीला गमावलं

सोशल मीडियावर ट्रेलर शेअर करताना सोनू सूद म्हणाले “गणेश चतुर्थीच्या उत्सवात आपण आनंदात रंगतो, पण आपल्या आजूबाजूला अनेक स्त्रिया आहेत ज्या अशा संघर्षांना सामोरं जातात, ज्यांची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती. हा ट्रेलर पाहताना मी भावूक झालो, कारण ही केवळ एक कथा नाही तर आपल्या समाजाचं वास्तव आहे. या वर्षी माझी एकच प्रार्थना आहे की बाप्पा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील अडथळे दूर करो.” ते पुढे म्हणाले की, #Sampoorna हा फक्त मनोरंजनासाठीचा शो नसून, एक शक्तिशाली संदेश देणारा प्रवास आहे. ही कथा अनुभवणं आणि समजून घेणं प्रत्येकासाठी आवश्यक आहे. हा नवा शो ८ सप्टेंबरपासून दररोज संध्याकाळी ७:३० वाजता स्टार प्लसवर प्रसारित होणार आहे.

शोच्या कथानकाचा केंद्रबिंदू आहे मिट्टी, जी सात वर्षांपासून विवाहित असून चार वर्षांच्या मुलाची आई आहे. वरकरणी तिचं आयुष्य परिपूर्ण दिसतं, परंतु अचानक सर्व काही बदलतं जेव्हा तिच्या नवऱ्याला, प्रतिष्ठित डॉक्टर डॉ. आकाश याला गंभीर प्रकरणात अटक होते. आकाश स्वतःला निर्दोष सांगतो आणि त्याला अडकवलं गेलं असल्याचा दावा करतो. या घटनेमुळे मिट्टीच्या आयुष्याला अनपेक्षित वळण मिळतं.

‘बिन लग्नाची गोष्ट’साठी प्रिया-उमेशची निवड कशी झाली? दिग्दर्शक आदित्य इंगळेंनी सांगितली इनसाईड स्टोरी!

कथेत आणखी एक महत्त्वाची व्यक्तिरेखा म्हणजे नयना स्वाभिमानी, बेधडक आणि प्रेमाच्या शोधात असलेली तरुणी. तिच्या आयुष्यातील घडामोडींमुळे कथानक अधिक नाट्यमय होतं. प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो. एका आदरणीय डॉक्टरवर इतका गंभीर आरोप का करण्यात आला? त्यामागे दडलंय तरी काय सत्य? सोनू सूद यांच्या उपस्थितीमुळे या शोच्या संदेशाला अधिक वजन प्राप्त होतं. समाजाशी निगडित मुद्द्यांवर ठाम भूमिका घेणारा हा अभिनेता ‘संपूर्णा’सारख्या शोसाठी अगदी योग्य चेहरा ठरतो. ‘संपूर्णा’ हा फक्त एक टेलिव्हिजन शो नसून, अनेक स्त्रियांच्या दैनंदिन जीवनातील संघर्ष, वेदना आणि त्यांच्या जिद्दीचं वास्तव दर्शन घडवतो.

Web Title: Sonu sood to launch the trailer of star plus new show sampoonna

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2025 | 08:59 PM

Topics:  

  • New Marathi Serial

संबंधित बातम्या

“पाऊलवाटेवर काटे होते, पण डोळ्यांत स्वप्नं होती…”, थाटात पार पडला ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेच्या सेटचा भव्य अनावरण सोहळा
1

“पाऊलवाटेवर काटे होते, पण डोळ्यांत स्वप्नं होती…”, थाटात पार पडला ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेच्या सेटचा भव्य अनावरण सोहळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.