Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • New Year |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“पाऊलवाटेवर काटे होते, पण डोळ्यांत स्वप्नं होती…”, थाटात पार पडला ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेच्या सेटचा भव्य अनावरण सोहळा

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जिद्दीला, संघर्षाला आणि दूरदृष्टीला वंदन करणारी स्टार प्रवाहची ऐतिहासिक मालिका ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले' च्या सेटचा भव्य दिव्य अनावरण सोहळा नुकताच पार पडला.

  • By अमृता यादव
Updated On: Dec 30, 2025 | 03:51 PM
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

स्टार प्रवाहची ऐतिहासिक मालिका ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ च्या सेटचा भव्य दिव्य अनावरण सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमात मालिकेचे निर्माते, महात्मा जोतीराव फुले यांची भूमिका साकारणारे अभिनेता डॉ. अमोल कोल्हे, सावित्रीबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी गोखले, स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे आणि मालिकेची संपूर्ण टीम उपस्थित होती. सोहळा सावित्रीबाईंच्या जिद्दी, संघर्ष आणि दूरदृष्टीला आदर दाखवण्यासाठी आयोजित केला गेला.

या अनावरण सोहळ्याने केवळ एका सेटचा पडदा उघडला नाही, तर महाराष्ट्राच्या इतिहासातील एका जाज्वल्य विचारक्रांतीचा पुनर्जन्म झाला. स्त्री शिक्षण, समता आणि सामाजिक परिवर्तनासाठी आयुष्य अखंडपणे झिजवणाऱ्या सावित्रीबाई फुलेंच्या संघर्ष, त्याग आणि धैर्याची साक्ष देणारा हा सेट त्या काळातील सामाजिक वास्तव, असह्य वेदना आणि नव्या उद्याची आशा यांचं जिवंत चित्र उभं करतो. प्रत्येक भिंत, प्रत्येक रचना आणि प्रत्येक तपशील त्या काळातील संघर्षकथांना शब्द देतो. या भव्यदिव्य सेटमधून सावित्रीबाईंच्या पावलांखालील काटे, समाजाने उभे केलेले अडथळे आणि तरीही न डगमगता पुढे जाणारी त्यांची जिद्द ठळकपणे जाणवते. प्रेक्षक केवळ एक दृश्य पाहत नाहीत, तर त्या काळात प्रवेश करतात जिथे अज्ञानाच्या अंधारात शिक्षणाचा दिवा पेटवण्याचं धाडस एका स्त्रीने केलं होतं. हा ऐतिहासिक आणि भावस्पर्शी सेट कलादिग्दर्शक नितीन कुलकर्णी यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीतून आणि कल्पकतेतून साकारला गेलाय.

टीव्हीनंतर आता ईशा मालवीयचे मोठ्या पडद्यावर पदार्पण, हाती लागला पंजाबी चित्रपट; दिसणार रोमँटिक अंदाजात

याप्रसंगी मधुराणी गोखले आपली भावना व्यक्त करताना म्हणाल्या, ‘सावित्रीबाई फुले युगस्त्री होत्या. इतकं आभाळा एवढं व्यक्तिमत्त्व साकारायला मिळणं मोठी जबाबदारी आहे. आज आपण मुक्तपणे शिकत आहोत, आपल्याला पाहिजे त्या क्षेत्रात काम करत आहोत, अभिमानाने मिरवत आहोत. पण त्यासाठी दीडशे वर्षांपूर्वी एका स्त्रीने इतका मोठा संघर्ष केला. मला सगळ्यांच्या वतीने सावित्रीबाईंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळतेय याचा आनंद आहे. उत्सुकता, हुरहूर आणि दडपण अश्या संमिश्र भावना आहेत. प्रेक्षकांनी साथ द्यावी हीच अपेक्षा आहे.’

‘काश मैं लड़का होती’, Dhurandharच्या स्क्रिप्टवर यामी गौतम फिदा; आदित्य धरच्या चित्रपटाबाबत मोठा खुलासा, म्हणाली…

डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, ‘कलाकार म्हणून माझं भाग्य आहे की वेगवेगळ्या लार्जर दॅन लाईफ भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली. महात्मा जोतीराव फुले यांची व्यक्तिरेखा साकारणं हे एक वेगळं आव्हान आहे. विचारांची धगधगती मशाल म्हणजे महात्मा जोतीराव फुले. व्यवस्थेला प्रश्न विचारायची सुरुवात महात्मा फुलेंनी केली. अश्या क्रांतीकाराचे विचार पोहोचवणं ही मोठी जबाबदारी आहे. स्टार प्रवाहसोबतचं नातं खूप खास आहे. माझ्या आयुष्याला ज्या भूमिकेने कलाटणी दिली ती राजा शिवछत्रपती मालिका मी स्टार प्रवाहसोबत केली. जवळपास १७ वर्षांनंतर आता स्टार प्रवाहसोबत फक्त अभिनेता म्हणून नाही तर निर्माता म्हणून देखिल काम करणार आहे. मी या मालिकेसाठी प्रचंड उत्सुक आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं समाजाप्रती जे योगदान आहे ते शब्दात वर्णन करणं केवळ अशक्य आहे. आज उंबरठ्याबाहेर पाऊल टाकणाऱ्या प्रत्येक स्त्रीची प्रेरणा जर कुणी असतील तर त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आहेत. त्यामुळे सावित्रीबाईंचा इतिहास मालिकेतून साकारणं माझ्यासाठी अत्यंत भावनिक गोष्ट आहे.’

या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टविषयी सांगताना स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे यांनी सांगितले, ही मालिका केवळ एक कथा नाही, तर समाजाला विचार करायला लावणारा प्रवास आहे. स्टार प्रवाहवरून असा आशयघन इतिहास मांडताना आम्हाला अभिमान वाटतो. सावित्रीबाई संसार सांभाळून समाजपरिवर्तनाची लढाई लढल्या. त्यांच्यामुळेच आज प्रत्येक स्त्री समाजात मानाने जगू शकते. अश्या महान क्रांतिज्योतीची कथा मांडणं क्रमप्राप्त होतं. माझी खात्री आहे की ही मालिका समस्त मालिका विश्वात मैलाचा दगड ठरेल

Web Title: The grand inauguration ceremony of the set of the series mi savitribai jyotirao phule was held in style

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2025 | 03:51 PM

Topics:  

  • amol kolhe
  • New Marathi Serial
  • star pravah serial

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.