Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जिया खान प्रकरणावर सूरज पांचोलीची पहिल्यांदाच प्रतिक्रिया, थेट आरोपांचाच पाढा वाचला

बॉलिवूड अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलीये. प्रकरणामध्ये अभिनेता सूरज पांचोलीवर जियाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप केला जात आहे. सूरजवर अभिनेत्रीवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे

  • By चेतन बोडके
Updated On: May 18, 2025 | 03:25 PM
जिया खान प्रकरणावर सूरज पांचोलीची पहिल्यांदाच प्रतिक्रिया, थेट आरोपांचाच पाढा वाचला

जिया खान प्रकरणावर सूरज पांचोलीची पहिल्यांदाच प्रतिक्रिया, थेट आरोपांचाच पाढा वाचला

Follow Us
Close
Follow Us:

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या प्रकरणामध्ये अभिनेता सूरज पांचोलीवर जियाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप केला जात आहे. याशिवाय सूरजवर अभिनेत्रीवर हल्ला केल्याचाही आरोप केला जात आहे. ज्यावेळी जियाने आत्महत्या केली त्यावेळी ती सूरजसोबत रिलेशनशिपमध्ये होती. अशा परिस्थितीत जियाच्या आत्महत्येनंतर या प्रकरणात सूरजचे नाव येत राहिले, तो त्यात अडकू लागला. या प्रकरणात त्याला जवळजवळ एक दशक मीडिया ट्रायलचा सामना करावा लागला. दरम्यान, आता तो याबद्दल उघडपणे बोलला आहे. त्याने असेही म्हटले की, वयाच्या २० व्या वर्षी त्याला दहशतवाद्यासारखे वागवले गेले.

अखेर बहीण – भावाचे वाद संपले? Neha Kakkar च्या पोस्टवरून मिळाली मोठी हिंट; नेटकरी म्हणाले – ‘नाटकी लोकं…’

नुकतंच सूरज चव्हाणने वरिंदर चावलाच्या टीमसोबत संवाद साधला होता. त्यावेळी संवाद साधताना त्याने सांगितले की, “जेव्हा मला मीडियाने खलनायक बनवलं होतं, तेव्हा मी जेमतेम २० वर्षांचाच होतो. आमच्यातल्या अयशस्वी नात्यामुळे मला मीडियाने ‘दहशतवाद्यासारखे वागवले गेले.’ सूरज पांचोलीने या एकतर्फी कथेवर टीका केली आणि असा दावा केला की, कोणीही कथेची दुसरी बाजू पाहिली नाही किंवा घटनेचे नेमके कारण काय आहे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही. त्याने असेही म्हटले की, त्याच्याविरुद्ध फक्त ‘घाणेरडे आरोप’ करण्यात आले.

मुलाखतीदरम्यान, सूरज पांचोली पुढे म्हणाला की, “सततच्या आरोपांमुळे मला फार वाईट वाटत होतं. माझ्यावरील डाग पुसण्याचा एकमेव मार्ग म्हणजे खटल्याच्या संपूर्ण सुनावणी प्रक्रियेतून जाणे. मला याची मोठी किमत मोजावी लागली असं मला वाटतं. कारण केस चालवणे सोपे नसते, विशेषतः जे मीडियाशी संबंधित आहेत त्यांच्यासाठी.” सूरजने पुढे सांगितले की, मी गेल्या अनेक वर्षांपासून कोर्टात जातोय. कधी कधी तर आठवड्यातून दोनदा तिनदा मी तिथे जायचो. तर, कधीकधी संपूर्ण आठवडाही जायचो.”

स्वत: ला WhatsApp ला पाठवला मेसेज अन् संपवलं जीवन, प्रसिद्ध मराठमोळ्या दिग्दर्शकानं केली आत्महत्या

याबरोबरच सूरज पांचोलीने असेही सांगितले की, “जिया खानच्या घरी सापडलेल्या पत्रांच्या आधारे मला अटक करण्यात आली. पण, नंतर न्यायालयाने ते बनावट घोषित केले. मग मला या प्रकरणी सुरुवातीलाच का अटक करण्यात आली ? असा मला प्रश्न पडला. मी आता बोलण्याची आणि सांगण्याची हीच योग्य वेळ मानतो, कारण आता लोकं माझं ऐकण्यास तयार आहेत. मला अजूनही धक्का बसला आहे की, या प्रकरणात मला कोणी फसवलं तर नाही ना?” मुलाखती दरम्यान सूरजने, वडिलांचे द्वेष करणारे लोकंही मला फसवू शकतात, अशी शक्यता वर्तवली. यादरम्यान सूरजने कोणाचेही नाव घेतले नाही.

सूरज पांचोली सध्या त्याच्या बॉलिवूडमधील पुनरागमनामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून तो ‘केसरी वीर’ चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे चर्चेत आहे. त्याच्याबरोबर सुनील शेट्टीही महत्त्वाची भूमिका बजावत आहे. हा चित्रपट २३ मे २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Sooraj pancholi on jiah khan suicide case was treated like a terrorist burdened with dirty allegations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2025 | 03:25 PM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood News
  • Jiah Khan case
  • Jiah Khan Suicide Case
  • Sooraj Pancholi

संबंधित बातम्या

४००० कोटींच्या Ramayana चित्रपटात Amitabh Bachchan यांच्याकडे दुहेरी भूमिका? जटायूनंतर आता ‘ही’ मोठी जबाबदारी!
1

४००० कोटींच्या Ramayana चित्रपटात Amitabh Bachchan यांच्याकडे दुहेरी भूमिका? जटायूनंतर आता ‘ही’ मोठी जबाबदारी!

ज्युनियर एनटीआरवर कोसळला दुःखाचा  डोंगर; घरातील मोठ्या व्यक्तीचे झाले निधन
2

ज्युनियर एनटीआरवर कोसळला दुःखाचा डोंगर; घरातील मोठ्या व्यक्तीचे झाले निधन

‘प्रेमानंद महाराज पाप धुण्याचे मशीन…’, सुपरस्टारच्या पोस्टमुळे उडाली खळबळ; भक्त संतापले!
3

‘प्रेमानंद महाराज पाप धुण्याचे मशीन…’, सुपरस्टारच्या पोस्टमुळे उडाली खळबळ; भक्त संतापले!

‘चिरंजीवी हनुमान’ चे पहिले पोस्टर रिलीज, जाणून घ्या AI जनरेटेड चित्रपट कधी होणार प्रदर्शित
4

‘चिरंजीवी हनुमान’ चे पहिले पोस्टर रिलीज, जाणून घ्या AI जनरेटेड चित्रपट कधी होणार प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.