Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कंपोजर प्रीतमला बसला धक्का; स्टाफने ऑफिसमधून पळवले ४० लाख रुपये, FIR केली दाखल

कंपोजर प्रीतम यांच्या ऑफिसमधून तब्बल ४० लाखांची चोरी झाली आहे. घडलेल्या प्रकरणासंबंधित FIR स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका स्टाफविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 09, 2025 | 01:49 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध आणि दिग्गज संगीतकार प्रीतम यांच्यासोबत अलीकडेच एक गंभीर घटना घडली आहे. त्यांच्या ऑफिसमधून तब्बल ४० लाख रुपयांची रोख रक्कमेची बॅग चोरीला गेल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, ही बॅग चोरी करण्याचा संशय प्रीतम यांच्या ऑफिसमधीलच एका कर्मचाऱ्यावर व्यक्त करण्यात आला आहे. यासंदर्भात पोलिसांनी गुन्हा नोंदवून चौकशी सुरू केली असून चोरीचा तपास वेगाने सुरू आहे. प्रीतम यांच्या ऑफिसचे व्यवस्थापक विनीत छेडा यांनी या घटनेची तक्रार मालाड पोलीस ठाण्यात नोंदवली असून संबंधित कर्मचाऱ्याविरोधात FIR दाखल करण्यात आली आहे.

विजय देवरकोंडाच्या ‘व्हीडी १२’ सोबत जोडले रणबीर कपूरचे नाव, अभिनेत्याचे चित्रपटासाठी खास योगदान!

पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, चोरी झालेल्या बॅगेत महत्त्वाच्या कामांसाठी जमा केलेली मोठी रक्कम होती. सध्या पोलिस पथक आरोपीचा शोध घेत असून या प्रकरणाच्या पुढील तपासाची प्रतीक्षा आहे. तक्रारीनुसार, काही दिवसांपूर्वी ऑफिसच्या कामासाठी ४० लाख रुपये आणले गेले होते. व्यवस्थापक विनीत यांनी हे पैसे ऑफिसमध्ये ठेवले होते. त्यावेळी कर्मचारी आशिष सयाल तिथे उपस्थित होता. नंतर विनीत काही महत्त्वाच्या कागदपत्रांवर सह्या घेण्यासाठी प्रीतम यांच्या घरी गेले.

विनीत घरी परतल्यानंतर ऑफिसमधून पैशांचा बॅग गायब असल्याचे समोर आले. इतर कर्मचाऱ्यांनी सांगितले की, आशिषने ती बॅग घेतली असून तो ती प्रीतम यांच्या घरी पोहोचवणार असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतर आशिषचा फोन बंद येऊ लागला. व्यवस्थापक विनीत यांनी आशिषच्या घरी जाऊन पाहिले, परंतु तो तिथेही सापडला नाही. आशिषशी कोणताही संपर्क होऊ न शकल्याने प्रीतम यांच्या व्यवस्थापकाने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी एफआयआर दाखल करून तपास सुरू केला आहे. अद्याप या प्रकरणी प्रीतम यांचा कोणताही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

कोकण हार्टेड गर्लच्या लग्नाची तारीख आणि वेळ आली समोर, दोघांच्याही घरी लगीनघाईला सुरुवात

प्रीतम हे भारतीय संगीत उद्योगातील आघाडीचे संगीतकार, गायक आणि म्युझिक डायरेक्टर आहेत. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरवले गेले आहे. ते मागील अडीच दशकांपासून संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी सुप्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ (KK), सोनू निगम, अरिजित सिंग तसेच आतिफ अस्लमसह अनेक सुप्रसिद्ध गायकांसोबत काम केले आहे. त्यांनी चाल तसेच संगीतबद्ध केलेले जवळजवळ सर्वच गाणी सुप्रसिद्ध आहेत.

Web Title: Staff steals rs 40 lakh from office of music composer pritam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2025 | 01:48 PM

Topics:  

  • Bollywood News
  • Indian Music

संबंधित बातम्या

Aditya Sarpotdar दिग्दर्शित ‘Thamma’ चा Trailer प्रदर्शित; हॉरर, थ्रिलर आणि कॉमेडीसह Rashmika-Ayushmann ची अनोखी केमिस्ट्री
1

Aditya Sarpotdar दिग्दर्शित ‘Thamma’ चा Trailer प्रदर्शित; हॉरर, थ्रिलर आणि कॉमेडीसह Rashmika-Ayushmann ची अनोखी केमिस्ट्री

Jacqueline Fernandez: जॅकलिन फर्नांडिसला दिलासा नाही; सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळून लावली, जाणून घ्या नेमकं काय होतं प्रकरण
2

Jacqueline Fernandez: जॅकलिन फर्नांडिसला दिलासा नाही; सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळून लावली, जाणून घ्या नेमकं काय होतं प्रकरण

संजय दत्तचं रेस्टॉरंट लॉन्च, पत्नी सोबत दिसला आपल्या ‘संजू बाबा’ अंदाजात! व्हिडिओ व्हायरल
3

संजय दत्तचं रेस्टॉरंट लॉन्च, पत्नी सोबत दिसला आपल्या ‘संजू बाबा’ अंदाजात! व्हिडिओ व्हायरल

संगीत क्षेत्रात घडवायचे आहे करियर? मग आधी संगीत कसे बनतात हे जाणून घ्या
4

संगीत क्षेत्रात घडवायचे आहे करियर? मग आधी संगीत कसे बनतात हे जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.