(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर गेली चार वर्षे लोकप्रियता मिळवणाऱ्या ‘अबोली’ मालिकेत आता एका नवीन खलनायिकेची एन्ट्री झाली आहे. या भूमिकेचं नाव शीतल सरपोतदार असून, ही भूमिका साकारणार आहे प्रसिद्ध अभिनेत्री अदिती द्रविड.जवळपास तीन वर्षांच्या विश्रांतीनंतर अदिती द्रविडने टेलिव्हिजनवर पुनरागमन केलं आहे. तीच्या चाहत्यांमध्ये यामुळे मोठा उत्साह आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.
सोनाली खरे, अजय पुरकर, आदिनाथ कोठारे, कृतिका देव यांसारखे अनेक कलाकार सध्या टेलिव्हिजनच्या विश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत आहेत. त्यांच्या यशस्वी प्रवासानंतर आता लोकप्रिय अभिनेत्रीनी अदिती द्रविड छोट्या पडद्यावर जोरदार कमबॅक केले आहे.अदिती द्रविड, जिने जवळपास तीन वर्षांच्या विश्रांतीनंतर ‘अबोली’ मालिकेत खलनायिकेची भूमिका स्वीकारून चाहत्यांच्या मनावर आपले अभिनय कौशल्य दाखवायला सुरुवात केली आहे.
‘मुंज्या’नंतर आता ‘थामा’! मॅडॉक युनिव्हर्सचा पाचवा भाग प्रेक्षकांच्या भेटीला
अभिनेत्री अदिती द्रविडने याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. अदिती लिहिते, ”मी 3 वर्षांनी पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर काम करते आहे. ‘स्टार’ प्रवाहवरील ‘अबोली’ या मालिकेत छान, छोटीशी अशी भूमिका घेऊन पुन्हा एकदा मी तुमच्या भेटीला आली आहे. गंमत म्हणजे, ही व्हिलनची भूमिका आहे. त्यामुळे मलाही खूप मजा येत आहे. यानिमित्ताने मी बऱ्याच काळानंतर मालिकेत पुन्हा एकदा काम करतेय. तर असंच प्रेम माझ्यावर करत राहा आणि ही मालिका स्टार प्रवाहवर रोज रात्री नक्की बघा.”अदितीने शेअर केलेल्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी आणि कलाकारांनी तीचं कौतुक केलं आहे.
Bigg Boss 19 : अभिषेक बजाजनंतर कोण झाला घराचा नवा कॅप्टन? गौरव खन्ना की फरहाना भट्ट
अदिती द्रविडने अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. तिने तिच्या अभिनय कौशल्यामुळे चाहत्यांचा आणि समीक्षकांचा भरपूर मन जिंकले आहे. अदितीच्या कामाला प्रेक्षकांकडून आणि सहकाऱ्यांकडून भरपूर सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. तिच्या‘अबोली’मधील पात्राने मालिकेच्या कथानकाला नवा ट्विस्ट दिला आहे. अदिती ही “सुंदरा मनामध्ये भरली”, “माझ्या नवऱ्याची बायको” अशा गाजलेल्या मालिकांमध्ये तीने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. अभिनेत्री एक उत्तम गीतकार सुद्धा आहे.