फोटो सौजन्य - Social Media
अमर कौशिकद्वारा दिग्दर्शित स्त्री सिनेमाचा पहिल्या भागाला सिनेचाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. सिनेमातील गाण्यांनीही कहर केले होते. यादरम्यान स्त्री सिनेमाचा दुसरा भाग येत असल्याची चर्चा सुरु झाली होती. यासाठी भारतात तसेच भारताबाहेरसुद्धा अनेक लोक प्रतीक्षा करत होते. परंतु, या प्रतिक्षेला आता पूर्णविराम मिळाला आहे. भारताच्या स्वातंत्र्य दिवसाच्या शुभ मुहूर्तावर ‘स्त्री २’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १५ ऑगस्टला संपूर्ण जगभरात सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे.
प्रेक्षकांची सिनेमा पाहण्याची आतुरता ऍडव्हान्स बुकिंग वरून कळून येत आहे. शुक्रवारी, ९ ऑगस्ट २०२४ रोजी, ‘स्त्री २’ सिनेम्याची ऍडव्हान्स बुकिंग सुरु करण्यात आली होती. साधारणपणे पहिल्या दिवशी सिनेमा जितके कलेक्शन करतात तेवढे कलेक्शन ‘स्त्री २’ ने चित्रपटाच्या ऍडव्हान्स बुकिंग ओपनिंग डेच्या दिवशीच केली. यामुळे चित्रपट भारतात भरपूर कहर करणार असल्याचे चित्र आताच दिसून येत असल्याचे कळून येत आहे.
हे सुद्धा वाचा : भाऊच्या धक्क्यावर अक्षय कुमारची एन्ट्री; खिलाडीने केली सुरजची ‘झापूक-झुपक’ स्टेप
पहिल्या दिवसाची ऍडव्हान्स बुकिंग जबरदस्त झाली असल्याचे दिऊन येत आहे. विशेष म्हणजे १२३८ शोज साठी २००० तिकिटांची बुकिंग झालेली आहे. एकंदरीत, तब्बल १७.३५ लाखांची कमाई झाली असल्याचे अनुमान लावण्यात आले आहे. चित्रपटाला पश्चिम बंगाल, गुजरात तसेच दिल्लीतून जास्त प्रतिसाद मिळत असल्याची बातमी समोर आली आहे.
चित्रपटाची कास्टिंग खूप मजेदार आहे. सिनेम्यात श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत. तर अपारशक्ती खुराणा, पंकज त्रिपाठी तसेच विजय राजसारख्या कलाकारांनी देखील यात काम केले आहे. सिनेमाच्या मुख्य कलाकारांना सिनेमाकडून खूप आशा आहेत. राजकुमार रावचे म्हणणे आहे कि स्त्री २ हा सिनेमा पहिल्या भागापेक्षा जास्त कॉमेडी असणार आहे तसेच जास्त अडव्हेंचर्स आणि थ्रिलींगने भरलेला आहे. तसेच श्रद्धा कपूरने या फिल्ममध्ये जास्त मनोरंजन असल्याची हमी दिली आहे तसेच चित्रपटाला भरभरून प्रेम देण्याचे आवाहन प्रेक्षकांना दिले आहे.