फोटो सौजन्य - Social Media
बिग बॉस मराठी ५ ने अगदी दुसऱ्याच आठवड्यात महाराष्ट्रभर कहर केला आहे. महाराष्ट्राच्या जनतेचा या शोला भरपूर प्रेम आणि प्रतिसाद मिळत आहे. बिग बॉस मराठी ५ चे कॉन्टेन्सटन्ट सुरज चव्हाणला महाराष्ट्राची जनता भरभरून प्रेम देत आहे. तर काही कॉन्टेन्सटन्ट जनतेच्या मनात खटकत आहेत. १० ऑगस्टच्या रात्री या आठवडयातील दुसरा भाऊचा धक्का एपिसोड पार पडला. या दरम्यान शोचे होस्ट रितेश देशमुख यांनी अनेकांना सुनावले तर काहींचे कौतुकही केले.
शोच्या पहिल्याच आठवड्यात कॉन्टेन्सटन्ट निकी तांबोळीने आठवडा गाजवल्याचे होस्ट रितेश देशमुख यांचे म्हणणे होते. पण या आठवड्यात निक्की कुठेतरी मागे पडली आहे असे रितेश यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे या आठवड्यातील शो गाजवण्याचा मान कॉन्टेन्सटन्ट जान्हवी किल्लेकर यांना मिळाला आहे. जान्हवीने वर्षा उसगांवकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर रितेश भाऊंनी चांगलेच सुनावले आहे. तसेच रितेश यांचे म्हणणे होते कि अभिनेत्री वर्षा उसगांवकर विषयांना वाढवण्याचा प्रयत्न करत असतात.
कालच्या भागात कॉन्टेस्टन्ट वैभव चव्हाण यांना सुनावले असून त्यांनी कॅप्टन निवडीच्या गेममध्ये सुरजला दिलेल्या धमकीबद्दल त्यांची कानउघडणी केली आहे, तर सुरजने स्वतःची उंची, ताकद वगैरे न पाहता वैभवला खुले चॅलेंज दिल्याने त्याच्या हिमतीची दाद देण्यात आली आहे. तसेच सुरज बिग बॉसच्या घराला स्वतःचे घर मानून त्याला मिळालेली सगळी कामं अगदी मनापासून करतो म्हणून त्याचे कौतुक करण्यात आले आहे.
यादरम्यान दुसऱ्या रविवारच्या भागात म्हणजेच ११ ऑगस्ट रोजी अभिनेता अक्षय कुमार त्याचा नवा चित्रपट ‘खेल खेल में’ च्या प्रमोशनसाठी त्याच्या टीमसह भाऊच्या धक्क्यावर अवतरणार असल्याची बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे यासंबंधित प्रोमोही लाँच करण्यात आला आहे. प्रोमोमध्ये सुरज चव्हाण त्याची ‘झापूक-झुपक’ स्टेप अक्षय कुमारला शिकवत असतानाचे क्षण दिसून येत आहेत. तर दुसऱ्या प्रोमोमध्ये वर्षां उसगाववकरला पाहून अक्षय ‘खूप वर्षांनी भेट झाली’ असे बोलत असल्याचे दिसून येत आहे.