Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संजय कपूर यांच्या निधनानंतर १०,३०० कोटींच्या संपत्तीचा वारसदार कोण? करिष्माच्या मुलांना काय मिळणार ?

करिष्मा कपूरचे पूर्वाश्रमीचे पती संजय कपूर हे लोकप्रिय व्यक्तिमत्वांपैकी एक होते. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर त्यांच्या संपत्तीबद्दल आणि कंपनीच्या ३१,००० कोटी रुपयांचे व्यावसायिक साम्राज्य चर्चेत आले आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jun 16, 2025 | 07:45 AM
संजय कपूर यांच्या निधनानंतर १०,३०० कोटींच्या संपत्तीचा वारसदार कोण? करिष्माच्या मुलांना काय मिळणार ?

संजय कपूर यांच्या निधनानंतर १०,३०० कोटींच्या संपत्तीचा वारसदार कोण? करिष्माच्या मुलांना काय मिळणार ?

Follow Us
Close
Follow Us:

उद्योगपती संजय कपूर यांच्या अकाली निधनाने मनोरंजन विश्वातून आणि उद्योग जगतातून हळहळ व्यक्त केली जाते आहे. जगातील आघाडीच्या ऑटो पार्ट्सची निर्मिती करणाऱ्या कंपनीचे ते मालक होते. ते ऑटो कंपोनंटची निर्मिती करणाऱ्या सोना कॉमस्टारचे अध्यक्ष होते. करिष्मा कपूरचे पूर्वाश्रमीचे पती संजय कपूर हे लोकप्रिय व्यक्तिमत्वांपैकी एक होते. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर त्यांच्या संपत्तीबद्दल आणि कंपनीच्या ३१,००० कोटी रुपयांचे व्यावसायिक साम्राज्य चर्चेत आले आहे. 2015 साली त्यांच्या वडिलांचे निधन झाले, त्यानंतर संजय यांनीच सर्व कारभार सांभाळला आणि कंपनी एका वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवली.

अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन फक्त ७०० मीटर दूर; पण…

त्यांच्यामुळेच सोना कॉमस्टार जगातील टॉप ऑटो कंपोनंट कंपन्यांपैकी एक आहे. ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार, संजय यांच्या कंपनीचे बाजार मूल्य सुमारे ३१,००० कोटी रुपये (सुमारे ४ अब्ज डॉलर्स) आहे. परंतु संजय कपूर यांच्या निधनाच्या बातमीनंतर, बिझनेस टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी बाजार उघडताच कंपनीचे शेअर्स 7 टक्यांनी घसरले आहेत. आता त्यांच्या पश्चात या व्यवसायाचे काय होणार, असा सवाल उपस्थित होतो आहे. संजय यांच्या निधनानंतर कंपनीचे गुंतवणूकदार आणि भागीदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. त्यांना शांत करण्यासाठी सोना कॉमस्टारकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे.

सोशल मीडियावर हे निवेदन शेअर करताना असे नमूद करण्यात आले की, ‘आम्ही आमच्या ग्राहकांना, कर्मचाऱ्यांना आणि भागीदारांना खात्री देतो की त्यांच्या वारशाचा सन्मान करत सध्याचे कामकाज तसेच चालू राहील. सोना कॉमस्टारमध्ये त्यांनी नियोजित केलेल्या आमच्या ध्येयाला आणि मूल्यांना पुढे नेऊन त्यांचा वारसा जपण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.’ संजय यांची दुसरी पत्नी करिष्मा होती. संजय यांना करिष्मापासून समायरा (20) आणि कियान (14) अशी दोन मुले आहेत. तर संजय यांची तिसरी आणि सध्याची पत्नी असणाऱ्या प्रिया सचदेवला अझारियस (6) नावाचा मुलगा आहे. यांच्यापैकी कोणीही कंपनीचा भाग नसल्यामुळे, त्यांच्याकडे सध्या कंपनीची जबाबदारी जाईल याची शक्यता कमी आहे.

गोविंद नामदेव यांनी शिवांगी वर्माच्या ‘त्या’ कमेंटवर दिले प्रत्युत्तर; म्हणाले, “एखाद्या व्यक्तीचे संस्कार…”

India.com च्या वृत्तानुसार, संजयच्या बहिणी कंपनीचे व्यवस्थापन करण्यासाठी पुढे येऊ शकतात, तर सध्याचे बोर्ड कामकाजाकडे लक्ष देईल. संजय यांच्या निधनानंतर फोर्ब्सने दिलेल्या वृत्तानुसार, संजय यांची एकूण संपत्ती 1.2 बिलियन डॉलर (10,300 कोटी रुपये) होती. त्यांची संपत्ती 2022 आणि 2024 या वर्षांमध्ये सर्वाधिक होती. जो आकडा 1.6 बिलियन डॉलर (13,000 कोटी रुपये) पर्यंत पोहोचला होता. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मालमत्तेचे व्यवस्थापन आता त्यांची पत्नी प्रिया सचदेव यांच्याकडे सोपवले जाईल.

मीडिया रिपोर्ट्समध्ये असेही नमुद करण्यात आले की, संजय यांनी त्यांच्या सर्व मुलांसाठी आधीच योजना आखून ठेवली होती. करिष्णा आणि संजय यांची मुलं- समायरा आणि कियान यांना संजय यांनी आधीच 14 कोटी रुपयांचे बाँड भेट दिले आहेत. याशिवाय, दोघांनाही प्रत्येकी दरमहा 10 लाख रुपये दिले जातील असे वृत्त आहे. मात्र, हेही लक्षात घेतले पाहिले की, संजय-करिष्माच्या मुलांना मिळणाऱ्या या आर्थिक सहाय्याबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

शालू- जब्यानं खरंच लग्न केलं का? राजेश्वरी खरातने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाली, “लवकरच मी सर्वांना गुड न्यूज…”

संजय यांनी 1996 मध्ये पहिले लग्न डिझायनर नंदिता महतानीशी केले होते. पण लग्नाच्या चार वर्षांनंतर २००० साली त्यांनी एकमेकांकडून घटस्फोट घेतला. त्यानंतर संजय यांनी 2003 साली बॉलिवूड अभिनेत्री करिष्मा कपूरसोबत लग्नगाठ केले. त्यांना समायरा आणि कियान नावाची दोन मुलेही आहेत  2016 साली त्यांचा घटस्फोट झाला, या घटस्फोटाची मोठी चर्चा झाली होती. 2017 साली संजयने मॉडेल आणि अभिनेत्री प्रिया सचदेवशी लग्न केले आणि दोघांना अझारियस नावाचा मुलगा आहे.

Web Title: Sunjay kapur 10300 crore net worth how much karisma kapoor kids will get

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2025 | 07:45 AM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood News

संबंधित बातम्या

४००० कोटींच्या Ramayana चित्रपटात Amitabh Bachchan यांच्याकडे दुहेरी भूमिका? जटायूनंतर आता ‘ही’ मोठी जबाबदारी!
1

४००० कोटींच्या Ramayana चित्रपटात Amitabh Bachchan यांच्याकडे दुहेरी भूमिका? जटायूनंतर आता ‘ही’ मोठी जबाबदारी!

ज्युनियर एनटीआरवर कोसळला दुःखाचा  डोंगर; घरातील मोठ्या व्यक्तीचे झाले निधन
2

ज्युनियर एनटीआरवर कोसळला दुःखाचा डोंगर; घरातील मोठ्या व्यक्तीचे झाले निधन

‘प्रेमानंद महाराज पाप धुण्याचे मशीन…’, सुपरस्टारच्या पोस्टमुळे उडाली खळबळ; भक्त संतापले!
3

‘प्रेमानंद महाराज पाप धुण्याचे मशीन…’, सुपरस्टारच्या पोस्टमुळे उडाली खळबळ; भक्त संतापले!

‘चिरंजीवी हनुमान’ चे पहिले पोस्टर रिलीज, जाणून घ्या AI जनरेटेड चित्रपट कधी होणार प्रदर्शित
4

‘चिरंजीवी हनुमान’ चे पहिले पोस्टर रिलीज, जाणून घ्या AI जनरेटेड चित्रपट कधी होणार प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.