स्वरा भास्करचे पुन्हा वादग्रस्त विधान (फोटो सौजन्य - Instagram)
हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक असलेली स्वरा भास्कर नेहमीच तिच्या स्पष्टवक्त्या शैलीसाठी ओळखली जाते. ही अभिनेत्री तिच्या लुकपेक्षा आणि अभिनयापेक्षा तिच्या केलेल्या वक्तव्यांमुळे जास्त चर्चेत राहते, कारण तिच्या शब्दांमध्ये कधीही कोणत्याही प्रकारचा फिल्टर नसतो. गेल्या दिवशी स्वरा भास्कर तिच्या पतीला छपरी म्हणण्यावरून अनेक लोकांशी भांडली होती. तर तिचे लग्न हादेखील चर्चेचा विषय होता.
आता तिने एक पॉडकास्ट केला आहे, ज्यामध्ये तिने ज्या पद्धतीने आपली मतं मांडली आहे त्यावरून तिला खूप ट्रोल केले जात आहे. तिचा पती फहाद अहमद देखील पॉडकास्टमध्ये दिसत आहे. मात्र तिच्या शब्दांमुळे स्वरा पुन्हा एकदा भयानक पद्धतीने ट्रोल होत आहे (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
स्वरा भास्करने ‘स्क्रीन’ला दिलेल्या मुलाखतीत असे काही म्हटले जे ऐकताच सर्वांचे कान टवकारले गेले आहेत. हो! हे खरं आहे, पॉडकास्टदरम्यान अभिनेत्री स्वरा म्हणाली की जर तुम्ही लोकांना त्यांच्या इच्छेनुसार मोकळे सोडले तर सर्वजण बायसेक्शुअल आहेत. या तिच्या विचारानंतर मुलाखतीत स्वराला पुढे विचारण्यात आले की, असे कोणी आहे का ज्याच्यावर तुम्हाला क्रश आहे, तेव्हा अभिनेत्रीने तिचा पती फहादकडे पाहिले आणि म्हणाली की त्याचे करिअर खरं तर उत्तर प्रदेशात जाणार आहे. स्वरा म्हणाली, “मला अखिलेश यादवची पत्नी डिंपल यादववर खूप क्रश आहे”. अभिनेत्री पुढे म्हणाली की, “हजारो वर्षांपासून, समाजात विषमलैंगिकता (पुरुष आणि स्त्रीमधील संबंध) सामान्य मानली जात आहे. ही कल्पना मानवजातीला पुढे नेण्यासाठी निर्माण करण्यात आली आहे आणि म्हणूनच ती आदर्श मानली गेली आहे.”
या विधानानंतर, युजर्समध्ये गोंधळ उडाला आहे. लोक स्वराच्या विधानाची खिल्ली उडवत आहेत. यामुळे, एका वापरकर्त्याने लिहिले की जर मला तिचा मुद्दा समजला असेल, तर ती असे म्हणण्याचा प्रयत्न करत आहे की आपल्याला खाण्यासाठी बनवले जात नाही, तर आपण जिवंत राहण्यासाठी खातो. तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले की दोन दशकांनंतर, मी हे विधान ऐकत आहे की मानव जन्मापासूनच बायसेक्शुअल नाही. नक्की स्वराला काय म्हणायचे आहे?
स्वरा सध्या ‘पती पत्नी और पंगा’ या रियालिटी शो मध्ये आपला नवरा फहाद अहमदसह काम करतेय. तिथेही या दोघांमधली केमिस्ट्री पाहून हे दोघे नक्की एकत्र राहतात तरी कसे असा चाहत्यांना प्रश्न पडला आहे. अनेकदा एकमेकांवरील त्यांचा विश्वास आणि प्रेम पाहून हे परफेक्ट आहेत वाटतं तर बरेचदा हे दोघेही एकमेकांना काहीही बोलताना दिसून येतात. मात्र बरेचसे टास्क हे दोघे जिंकताना दिसतात. स्वरा तिच्या ट्विट्समुळे अधिक प्रसिद्ध आहे आणि आता पुन्हा एकदा तिच्या या विधानामुळे तिला सोशल मीडियावर काय ऐकून घ्यावे लागेल याची कल्पनाच न केलेली बरी!
महाराष्ट्राचे ‘भाऊजी’ बांदेकर आता होणार सासरे, सोहम बांदेकर लवकरच ‘या’ अभिनेत्रीसह करणार लग्न
“Everyone is Bisexual. I have a crush on Dimple Yadav”
Swara Bhaskar 💀
Now I am feeling bad for Akhilesh Yadav and Swara’s husband 🤣pic.twitter.com/JVc1z12w7n
— Sunanda Roy 👑 (@SaffronSunanda) August 18, 2025