Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्न आणि ‘तारिणी’ने २०२५ बनवले शिवानीसाठी खास! म्हणते “आरोग्यसंकल्पांसह २०२६ चे स्वागत…”

झी मराठीवरील ‘तारिणी’ मालिकेमुळे २०२५ हे वर्ष अभिनेत्री शिवानी सोनारसाठी अविस्मरणीय ठरले. याच वर्षी लग्न आणि नव्या मालिकेची संधी मिळाल्याने वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्याला नवी दिशा मिळाली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 18, 2025 | 09:20 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
    • “याच वर्षी मला ‘तारिणी’ ही नवी मालिका मिळाली
    • संपूर्ण टीमसोबत काम करण्याचा अनुभव खूपच सकारात्मक
    • “माझं लग्न आणि ‘तारिणी’ मालिकेसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर लागलेली भलीमोठी होर्डिंग्स
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘तारिणी’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री शिवानी सोनार हिच्यासाठी २०२५ हे वर्ष आयुष्याला नवी दिशा देणारे आणि अनेक आठवणींनी भरलेले ठरले. वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही आघाड्यांवर हे वर्ष तिच्यासाठी खास असल्याची भावना शिवानीने व्यक्त केली.

आमिर खान प्रोडक्शन्सच्या व्हिडिओमुळे सस्पेन्स वाढला, ‘हॅपी पटेल’चा ट्रेलर उद्या रिलीज

शिवानी म्हणाली, “२०२५ माझ्यासाठी अत्यंत खास आहे. याच वर्षी, जानेवारी महिन्यात माझं लग्न झालं आणि माझ्या आवडत्या व्यक्तीसोबत आयुष्याची नवी इनिंग सुरू झाली. लग्नानंतर आयुष्यात अनेक बदल होतात. माझ्या बाबतीत हे सगळे बदल सकारात्मक ठरले.”
तिने पुढे सांगितले की, कुटुंबापासून दूर राहण्याची सवय नसल्याने सुरुवातीला थोडी भावनिक ओढ जाणवते. “मी कुटुंबाला खूप मिस करते. याच वर्षी माझा धाकटा भाऊही कामासाठी बंगळुरूला गेला. पहिल्यांदाच तो माझ्यापासून दूर आहे. मात्र तो त्याचं करिअर घडवत आहे, आयुष्यात पुढे जात आहे, हे पाहून मनाला समाधानही वाटतं,” असे शिवानीने भावुकपणे सांगितले.

व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलताना शिवानीने २०२५ हे वर्ष तिच्या करिअरसाठीही महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. “याच वर्षी मला ‘तारिणी’ ही नवी मालिका मिळाली. मी साकारत असलेलं पात्र माझ्यासाठी खूप खास आहे. झी मराठी आणि निर्मिती संस्थेसोबतचं हे माझं पहिलंच असोसिएशन आहे. संपूर्ण टीमसोबत काम करण्याचा अनुभव खूपच सकारात्मक आणि समाधानकारक आहे,” असे ती म्हणाली.

२०२५ मधील अविस्मरणीय क्षणांविषयी सांगताना शिवानी म्हणाली, “माझं लग्न आणि ‘तारिणी’ मालिकेसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर लागलेली भलीमोठी होर्डिंग्स हे क्षण मी कधीच विसरू शकत नाही. स्वतःला इतक्या मोठ्या स्वरूपात पाहणं हा अनुभव शब्दात सांगता येणार नाही. ते पाहून मी प्रचंड आनंदी झाले होते.” मात्र या यशस्वी वर्षाबरोबरच एक खंतही असल्याचे शिवानीने प्रामाणिकपणे कबूल केले. “या वर्षी आरोग्याकडे पाहिजे तेवढं लक्ष देता आलं नाही. त्यामुळे २०२६ मध्ये व्यायाम, पुरेशी झोप आणि एकूणच दिनचर्या सुधारण्याचा ठाम संकल्प केला आहे. हे सध्या ‘वर्क इन प्रोग्रेस’ आहे, पण मी नक्कीच याकडे गंभीरपणे पाहणार आहे,” असे ती म्हणाली.

Saali Mohabbat: राधिकाने शेअर केला मनीष मल्होत्रासोबत काम करण्याचा अनुभव, म्हणाली “मी खूप भारावून…”

नववर्ष साजरे करण्याबाबत बोलताना शिवानी म्हणाली, “दरवर्षी मी कुटुंब आणि मित्रपरिवारासोबत नववर्ष साजरे करते. मात्र यंदा कदाचित ‘तारिणी’च्या शूटिंगमध्ये व्यस्त असेन. तरीही शूट सांभाळून माझ्या प्रियजनांसोबतच नवीन वर्षाचे स्वागत करणार आहे.” शेवटी ती म्हणाली, “२०२५ तू माझं आयुष्य सकारात्मक केलंस. आता २०२६ कडूनही नवीन आशा, आरोग्य आणि आनंदाची अपेक्षा आहे.”

Web Title: Tarini fame shivani sonar on why 2025 was special for her

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 09:19 PM

Topics:  

  • zee cinema
  • zee marathi

संबंधित बातम्या

Zee Marathi: छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात साजरा झाला कमळीचा अविस्मरणीय वाढदिवस, तारिणीने दिलं खास सरप्राईझ
1

Zee Marathi: छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात साजरा झाला कमळीचा अविस्मरणीय वाढदिवस, तारिणीने दिलं खास सरप्राईझ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.