
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
भारतातील अग्रगण्य कंटेंट आणि टेक्नॉलॉजी पॉवरहाउस झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेड यांनी आज ‘दिलफ्लुएन्सर मूमेंट्स’ या नावाने नवीन आणि अभिनव मीडिया सोल्यूशनची घोषणा केली. मल्टी-स्क्रीन एंगेजमेंटच्या माध्यमातून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारे हे ओम्नी-चॅनल पोहोच समाधान असून, ते व्यक्तिरेखेला प्राधान्य देणाऱ्या कथाकथनावर आधारित आहे.
सध्याच्या जाहिरातविश्वात माध्यमांची उपलब्धता वाढली असली तरी, प्रचंड जाहिरातींच्या गर्दीतून ब्रँड्सना उठून दिसणे हे मोठे आव्हान ठरत आहे. यावर उपाय म्हणून ‘दिलफ्लुएन्सर मूमेंट्स’ हा फॉर्मॅट सादर करण्यात आला असून, तो नैसर्गिक कथाकथनाच्या माध्यमातून व्हायरल एंगेजमेंट आणि मोजता येणारी ब्रँड इक्विटी निर्माण करतो.
पारंपरिक जाहिरातींपेक्षा वेगळा असलेला हा फॉर्मॅट प्रेक्षकांच्या आवडीच्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या जुळणाऱ्या कथानकांमध्ये ब्रँड्सना सहजपणे गुंफतो. झीच्या लोकप्रिय टेलिव्हिजन व्यक्तिरेखांचा (दिलफ्लुएन्सर्स) वापर करून ब्रँड इंटिग्रेशन अधिक नैसर्गिक आणि विश्वासार्ह बनवले जाते.
‘दिलफ्लुएन्सर मूमेंट्स’चे चार प्रमुख स्तंभ म्हणजे – व्यक्तिरेखांवर आधारित प्रामाणिकता, टेलिव्हिजनमधून निर्माण होणारा विश्वास, नैसर्गिक व्हायरॅलिटी आणि प्लॅटफॉर्म-अॅग्नॉस्टिक स्केल.
या संकल्पनेची प्रभावीता राष्ट्रीय कन्या दिनी सादर करण्यात आलेल्या ‘तुम हो लव्हली’ कॅम्पेनमधून दिसून आली. हिंदी आणि मराठी शोजमध्ये गुंफलेल्या या मूमेंट्सनी टीव्हीपासून डिजिटल व सोशल मीडियापर्यंत झपाट्याने प्रवास केला. या कॅम्पेनला २५ मिलियनहून अधिक इम्प्रेशन्स, २.५ मिलियन एंगेजमेंट आणि हजारो संभाषणे मिळाली.
झी एंटरटेनमेंटच्या जाहिरात महसूल विभागाच्या प्रमुख लक्ष्मी शेट्टी यांनी सांगितले की, “जसे ग्राहक व्यत्यय आणणाऱ्या कम्युनिकेशनपासून दूर जात आहेत, तसे जाहिरातदारांना अशा मूमेंट्सची गरज आहे जे सांस्कृतिकदृष्ट्या कमावलेले आणि भावनिकदृष्ट्या प्रामाणिक वाटतात.दिलफ्लुएन्सर मूमेंट्स हा मार्केटर्ससाठीचा नवीन मीडिया फॉर्मॅट आहे. व्यक्तिरेखेला प्राधान्य देणारा कंटेंट सिस्टिम्सच्या माध्यमातून हा फॉर्मॅट मोठ्या प्रमाणावर पोहोच देतो आणि विविध प्लॅटफॉर्म्सवर सहजपणे प्रवास करत प्रेक्षकांशी वैयक्तिक स्तरावर जोड निर्माण करतो.दिलफ्लुएन्सर मूमेंट्सच्या माध्यमातून आम्ही जाहिरातदारांना सांस्कृतिक मुळांशी रूजलेल्या कथाकथनाला प्लॅटफॉर्म अॅ ग्नॉस्टिक वितरण आणि ‘झेड’च्या नॅशनल स्केलच्या जोरावरब्रँडबद्दल प्रेमामध्ये रूपांतरित करण्यास सक्षम करत आहोत.”
‘मी माझं दुसरं बाळ गमावलं…’ Rani Mukerjiचा गर्भपातावर धक्कादायक खुलासा, सांगितली वेदनादायक कहाणी
तर झीचे चीफ मार्केटिंग ऑफिसर कार्तिक महादेव म्हणाले, “भारतीय जाहिरात बाजार सातत्याने विस्तारत आहे, केवळ आकारमानात नाही, तर उपलब्धतेतही.आज 100 मिलियनचा ब्रँड आणि 10,000 मिलियनचा ब्रँड, दोघेही समान सहजतेने इम्प्रेशन्स खरेदी करू शकतात.सुमारे अर्ध्या, म्हणजेच 1 लाख कोटींच्या जाहिरात बाजारातील मोठा हिस्सा लिनीअर आणि डिजिटल डिव्हाईसेसवरील व्हिडिओमधून येत असल्यानेफक्त ‘अॅखक्सेस’ ही आता काही आघाडी राहिलेली नाही; खरा फरक ‘अॅयफिनिटी’ (जिव्हाळा) निर्माण करण्यात आहे.कथाकथन, ओळखीच्या व्यक्तिरेखा आणि आपल्याशा वाटणाऱ्या जगातून आणि विविध स्क्रीन्सवर प्रेक्षकांच्या मनात ठसणाऱ्या मूमेंट्समधूनजिव्हाळा निर्माण होतो.याच ठिकाणी ‘झेड’च्या ‘दिलफ्लुएन्सर मूमेंट्स’ बदल घडवू शकतात.माध्यमांची निवड अजूनही प्लॅटफॉर्म आधारित पद्धतीने होते, परंतु एक मूमेंट अनेक प्लॅटफॉर्म्सवर आडव्या पद्धतीने नैसर्गिकपणे (ऑर्गेनिक) आणि एकाच वेळीमोठ्या प्रमाणावर प्रवास करू शकतो.आमच्या पोहोचेच्या जोरावर, आमच्या दिलफ्लुएन्सर्सच्या ताकदीवर आणि आमच्या कथाकथनाच्या भावनिक इक्विटीवर, आम्ही ब्रँड्सना प्रेक्षकांना आधीपासूनच आवडत असलेल्या मूमेंट्समध्ये अर्थपूर्ण सहभाग घेण्यासाठी सक्षम करत आहोत.”
मार्केटर्ससाठी महत्त्वाचा निष्कर्ष
• त्यांच्या ब्रँड्सना सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या मूमेंट्समध्ये नैसर्गिकरीत्या गुंफते.
• खऱ्या व्हायरॅलिटीकडे नेणारी नैसर्गिक एंगेजमेंट प्रदान करते.
• अनेक प्लॅटफॉर्म्सवर मोठ्या प्रमाणात वितरण उपलब्ध करून देते.
• मिळणारे लक्ष टिकाऊ ब्रँड प्रेम आणि भावनिक इक्विटीमध्ये रूपांतरित करते.