Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठी सिनेसृष्टीत परिवर्तन घडवण्यासाठी तेजस्विनी पंडित सज्ज! साजिद नाडियाडवालासोबत करणार चित्रपटाची निर्मिती

विविधांगी भुमिका करणारी अभिनेत्री तेजस्विनी पंडित आता निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवण्यास सज्ज आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 05, 2024 | 12:52 PM
मराठी सिनेसृष्टीत परिवर्तन घडवण्यासाठी तेजस्विनी पंडित सज्ज! साजिद नाडियाडवालासोबत करणार चित्रपटाची निर्मिती
Follow Us
Close
Follow Us:

मराठी सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या तेजस्विनी पंडित (Tejswini Pandit) हिने आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना आपलेसे केले. विविधांगी भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रीने अभिनयासोबतच निर्मित क्षेत्रातही प्रवेश केला आणि आता तेजस्विनी लवकरच आपल्यासमोर भव्यदिव्य कलाकृती घेऊन येणार आहेत. यासाठी तिने बॉलिवूडला अनेक दर्जेदार चित्रपट देणाऱ्या साजिद नाडियाडवाला एंटरटेनमेंटसोबत (sajid nadiadwal) हातमिळवणी केली आहे. नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेंनमेंट, जोफिएल एंटरप्राईज प्रस्तुत, वर्धा नाडियाडवाला, सह्याद्री फिल्म्स यांच्या नेतृत्वाखाली हे चित्रपट प्रदर्शित होणार असून या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत एक परिवर्तन घडवून आणण्याचा हा प्रयत्न असणार आहे.

[read_also content=”‘ए वतन मेरे वतन’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, अभिनेत्री सारा अली खान दिसतेय दमदार भुमिकेत; ‘या’ दिवशी चित्रपट ओटीटीवर होणार रिलीज! https://www.navarashtra.com/movies/ae-watan-mere-watan-trailer-released-actress-sara-ali-khan-in-role-of-radio-jocky-nrps-512851.html”]

मराठी चित्रपटातील काही निकष बाजूला ठेवून, मराठी कथानकाच्या कक्षा रुंदावण्याचा प्रयत्न यातून करण्यात येणार आहे. या भागीदारीचा मुख्य हेतू म्हणजे पडद्यावर आपल्या भव्य संस्कृतीचे आणि ऐतिहासिक साहित्याचे प्रतिबिंब दाखवणे हा आहे. हृदयाचा ठाव घेणाऱ्या कथा, श्वास रोखून ठेवणारी दृश्ये आणि इतरांपेक्षा वेगळा आशय दाखवण्यासाठी ही टीम सज्ज झाली असून प्रेक्षकांना एक अविस्मरणीय अनुभव या चित्रपटांच्या माध्यमातून मिळणार आहे, हे नक्की!

[read_also content=”मराठा आंदोलनाचा संघर्ष मोठ्या पडद्यावर, मनोज जरांगे पाटलांच्या आयुष्यावरील ‘संघर्ष योद्धा’चा टीझर लाँच! https://www.navarashtra.com/movies/manoj-jarange-patil-life-based-movie-sangharsh-yodhha-teaser-released-nrps-512780.html”]

आपला आनंद व्यक्त करताना निर्मात्या वर्धा नाडियाडवाला म्हणाले, ” मराठी चित्रपटांसाठी सह्याद्री फिल्मसोबत भागीदारी करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. माझे या भूमीशी, संस्कृतीशी आणि भाषेशी विशेष नाते आहे. हे आमचे घर आहे. त्यामुळे हे चित्रपट माझ्यासाठी खूप खास असतील. यात आम्हाला तेजस्विनीची साथ लाभली आहे. तेजस्विनी एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे तिचा दृष्टिकोन खूपच वेगळा असणार, याची आम्हाला जाणीव असून मराठी चित्रपटाबद्दलच्या अंतर्दृष्टीवर आमचा विश्वास आहे. म्हणूनच तिच्या सहकार्याने प्रभावी कथा सादर करण्याचे उद्दिष्ट आहे. तेजस्विनीसोबत आम्ही आमच्या या नवीन प्रवासाला सुरुवात करत आहोत. तिच्यासोबत आम्ही प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकतो आणि यासाठी आम्हाला प्रेक्षकांचे प्रेम आणि सहकार्य गरजेचे आहे.”

या भागीदारीबद्दल तेजस्विनी पंडित म्हणते, ” ही भागीदारी खरोखरच अपवादात्मक आहे. माझ्यासाठी आणि माझ्या संपूर्ण टीमसाठी हा एक सन्मान आहे. ऐतिहासिकदृष्ट्या मराठी चित्रपट हे प्रतिभावान कलाकार आणि निर्मितीसाठी ओळखले जातात. ज्यांनी आजवर प्रेक्षकांना अनेक अविस्मरणीय आशय दिले आहेत. परंतु मराठी चित्रपटांमध्ये भव्यतेचा आणि वितरणाचा अभाव अनेकदा दिसतो. आता प्रतिष्ठित निर्माते साजिद नाडियाडवाला आणि वर्धा नाडियाडवाला यांच्यासोबत एकत्र येऊन आम्ही हे चित्र बदलण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही भागीदारी ‘गेम चेन्जर’ ठरणारी असेल. जी प्रेक्षकांना मोठ्या सिनेमॅटिक प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी एक विशाल कॅनव्हास देईल. या सहकार्याबद्दल आम्हाला अत्यंत आनंद आहे आणि आमची ही असाधारण कलाकृती प्रेक्षकांसमोर सादर करण्यासाठी आम्हीही खूप उत्सुक आहोत. ”

Web Title: Tejswini pandit will work with sajid nadiadwala amid production of marathi movies nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2024 | 12:52 PM

Topics:  

  • entertainment
  • Tejswini Pandit

संबंधित बातम्या

Khatron Ke Khiladi 15 च्या प्रीमियरबाबत समोर आली मोठी अपडेट, कोण कोणते स्पर्धक होणार सामील?
1

Khatron Ke Khiladi 15 च्या प्रीमियरबाबत समोर आली मोठी अपडेट, कोण कोणते स्पर्धक होणार सामील?

मनोज तिवारी यांच्या राहत्या घरी चोरी; लाखोंची रक्कम लंपास, ‘या’ जवळच्या व्यक्तीवर पोलिसांची कारवाई
2

मनोज तिवारी यांच्या राहत्या घरी चोरी; लाखोंची रक्कम लंपास, ‘या’ जवळच्या व्यक्तीवर पोलिसांची कारवाई

‘कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता…’, अखेर एआर रहमान यांनी ‘जातीयवाद’ टिप्पणीवर दिले स्पष्टीकरण; म्हणाले…
3

‘कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता…’, अखेर एआर रहमान यांनी ‘जातीयवाद’ टिप्पणीवर दिले स्पष्टीकरण; म्हणाले…

‘चित्रपटइंडस्ट्री एकजूट नाहीत…’, इमरान हाश्मीने बॉलीवूडबद्दल केला मोठा खुलासा; ट्रोलिंगवरही मांडले मत
4

‘चित्रपटइंडस्ट्री एकजूट नाहीत…’, इमरान हाश्मीने बॉलीवूडबद्दल केला मोठा खुलासा; ट्रोलिंगवरही मांडले मत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.