Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Veer Murarbaji Movie : ‘वीर मुरारबाजी’ची रिलीज डेट ठरली, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार ‘हा’ अभिनेता

स्वराज्याच्या इतिहासात पुरंदरचे ‘काळभैरव’ म्हणून ओळख असणारे मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा फेब्रुवारी २०२५ ला ‘वीर मुरारबाजी...पुरंदरकी युद्धगाथा’ या चित्रपटातून रुपेरी पडदयावर येण्यासाठी सज्ज होत आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Aug 28, 2024 | 03:49 PM
छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार 'हा' अभिनेता

छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार 'हा' अभिनेता

Follow Us
Close
Follow Us:

Veer Murarbaji Released Date : छत्रपती शिवाजी महाराज यांना मराठमोळ्या साम्राज्याचे आराध्यदैवत म्हणून मानले जाते. शिवरायांनी विजापूरच्या ढासळत्या आदिलशाहीमधून स्वतःचे स्वतंत्र्य राज्य निर्माण करून मराठा साम्राज्याची स्थापना केली. महाराजांच्या अनेक शूर मावळ्यांनी जीवाची आहूती देत इतिहास घडवला आहे. शिवकाळातील नररत्नांपैकी एक आणि रणझुंजार मावळा म्हणजे मुरारबाजी देशपांडे.

पुरंदरच्या वेढ्याप्रसंगी झालेल्या धुमश्चक्रीत पराक्रम गाजवून शेकडों गनिमांना यमसदनी धाडणाऱ्या स्वामीनिष्ठ मुरारबाजी देशपांडे यांचा पराक्रमी इतिहास आजही प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. स्वराज्याच्या इतिहासात पुरंदरचे ‘काळभैरव’ म्हणून ओळख असणारे मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा १४ फेब्रुवारी २०२५ला ‘वीर मुरारबाजी…पुरंदरकी युद्धगाथा’ या चित्रपटातून रुपेरी पडदयावर येण्यासाठी सज्ज होत आहे. हा चित्रपट हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हे देखील वाचा – सेक्रेटरी आत्माराम भिडे गोकुळधाम सोसायटी सोडणार ? स्वत: अभिनेत्याने केला खुलासा

मालिका विश्वात ‘श्रीकृष्ण’, ‘महादेव’ शिवाय ‘ओम नमो व्यंकटेशाय’ या दाक्षिणात्य चित्रपटात ‘तिरुपती बालाजी’ यांची भूमिका साकारत लोकप्रियता मिळवणारा अभिनेता सौरभ राज जैन ह्याने चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचे लक्षवेधी पोस्टर आज प्रदर्शित झाले असून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ‘फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड’ चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आलमंड्स क्रिएशन्स व ए.ए.फिल्म्स यांनी ‘वीर मुरारबाजी… पुरंदरकी युद्धगाथा’चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाची निर्मिती अजय आरेकर, अनिरूद्ध आरेकर, भाऊसाहेब आरेकर यांची आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन अजय आरेकर आणि अनिरूद्ध आरेकर यांनी केले आहे.

 

सगळ्या देवतांच्या भूमिका तसेच आपलं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका करायला मिळणे हे मी भाग्यचं समजतो.‘छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका पडद्यावर साकारण्याची संधी मिळणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. माझ्या आजवरच्या पौराणिक भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. आपलं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मी साकारत असलेल्या भूमिकेला ही प्रेक्षकांचं हेच प्रेम मिळेल, अशी प्रतिक्रिया सौरभ राज जैन यांनी दिली आहे.

हे देखील वाचा – अली गोनीचे नताशा स्टॅनकोविचसोबत होते गंभीर नाते, लग्नासाठी घातली होती धक्कादायक अट?

१६६५ च्या आषाढात मिर्झाराजे जयसिंग आणि सरदार दिलेरखान यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. त्यावेळी पुरंदरचे किल्लेदार मुरारबाजी देशपांडे निवडक सातशे मावळ्यांसह दिलेरखानाच्या फौजेवर चालून गेले. आणि ‘न भूतो न भविष्यती’ असा पराक्रम केला. पुरंदरच्या लढाईतल्या पराक्रमाने मुघलांना भयभीत करुन सोडणाऱ्या मुरारबाजी देशपांडे यांची ही यशोगाथा आजच्या पिढीला चित्रपटाच्या माध्यमातून समजावी यासाठी ‘वीर मुरारबाजी…पुरंदरकी युद्धगाथा’ हा चित्रपट आम्ही घेऊन येत असल्याचे निर्माते अजय आरेकर यांनी सांगितले. अधिकाधिक तरुणांपर्यंत स्वराज्याचा प्रेरणादायी इतिहास पोहचवायचा आहे’ त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

Web Title: Television actor saurabh jain will play chhatrapati shivaji maharaj roll in veer murarbaji movie

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2024 | 03:44 PM

Topics:  

  • bollywod news
  • Chhatrapati Shivaj Maharaj

संबंधित बातम्या

Force 3 मध्ये दिसणार साउथ फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री, बॉलीवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री!
1

Force 3 मध्ये दिसणार साउथ फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री, बॉलीवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री!

”१००० रूपये देते, मला १० वेळा किस कर…”सैफ अली खानने सांगितला विचित्र अनुभव
2

”१००० रूपये देते, मला १० वेळा किस कर…”सैफ अली खानने सांगितला विचित्र अनुभव

‘ती पुरूषांना सिग्नल देते…’ संजय दत्तची आई नर्गिसने केली होती रेखाची पोलखोल, सर्वांसमोर म्हटले होते, ‘चुडैल’
3

‘ती पुरूषांना सिग्नल देते…’ संजय दत्तची आई नर्गिसने केली होती रेखाची पोलखोल, सर्वांसमोर म्हटले होते, ‘चुडैल’

‘आता सलमान गुडघ्यावर येईल, तळवेही…’ दबंग सिनेमाच्या दिग्दर्शकाच्या निशाण्यावर भाईजान!
4

‘आता सलमान गुडघ्यावर येईल, तळवेही…’ दबंग सिनेमाच्या दिग्दर्शकाच्या निशाण्यावर भाईजान!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.