सौजन्य- सोशल मीडिया
Mandar Chandwadkar quit TMKOC Show : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ गेल्या १६ वर्षांपासून चाहत्यांचे निखळ मनोरंजन करीत आहे. मालिकेच्या टीमने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत खळखळून हसवलेय. या मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखांना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. जेठालाल, बापूजी, टप्पू, मेहता साब आणि भिडे गुरूजीसह अनेक पात्र आज प्रेक्षकांच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनले. अशातच मालिकेतील कलाकार शो सोडून जात असल्याच्या चर्चा होत असताना आणखी एक कलाकार शो सोडून जात असल्याची चर्चा सुरू आहे.
हे देखील वाचा – अली गोनीचे नताशा स्टॅनकोविचसोबत होते गंभीर नाते, लग्नासाठी घातली होती धक्कादायक अट?
अब्दूलनंतर आता गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आत्माराम भिडे शो सोडून जात असल्याची चर्चा सुरू आहे. पण या चर्चांवर आता अभिनेत्याने स्वत: भाष्य केलं आहे. अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत अफवांवर भाष्य केलं आहे. शोमध्ये आत्माराम तुकाराम भिडेचे पात्र अभिनेता मंदार चांदवडकरने साकारले आहे. सध्या युट्यूबवर मंदार चांदवडकरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओच्या थंबनेलला मंदारचा हात जोडलेला फोटो लावण्यात आला आहे. त्यामध्ये ‘निर्मात्यांचा पर्दाफाश करणार…’ असा संवाद फोटोवर दिसत आहे.
तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आत्माराम भिडेही शो सोडणार असं सांगण्यात येत आहे. अशातच या अफवांदरम्यान मंदारने एक व्हिडिओ शेअर करत अफवांवर भाष्य केलं आहे. व्हायरल होणारा फोटो हा दिशाहीन करणारा असून मी शो सोडणार नाही, असा खुलासा अभिनेत्याने केला आहे. व्हिडिओमध्ये अभिनेता म्हणाला की, “गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हायरल होत आहे, त्याबद्दल तुम्हाला मी खरं सांगणार आहे. सोशल मीडियाचा लोकं खूप गैरफायदा करीत आहेत, या गोष्टीचा मला खूप दु:ख वाटत आहे. मी शो सोडत असल्याच्या फक्त आणि फक्त अफवा आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये वापरलेल्या व्हिडिओचा फोटो फार जुना आहे. त्यामुळे मी शो सोडून जात असल्याच्या निव्वळ अफवाच आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मी चाहत्यांचं मनोरंजन करीत आहे. या पुढेही असंच मनोरंजन करेल यात काही शंका नाही.”