(फोटो सौजन्य-Social Media)
नताशा स्टॅनकोविच आणि हार्दिक पांड्या विभक्त झाल्याच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. पतीपासून वेगळे झाल्यानंतर नताशाने प्रेमाविषयी काही पोस्ट शेअर केल्या आहेत. नुकतेच तिने हार्दिकपासून वेगळे होण्याचे कारण सांगितले होते. दरम्यान, अली गोनीने त्याची एक्स गर्लफ्रेंड नताशाबद्दल खुलासा केला आहे. हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड होण्यापूर्वी नताशा अलीला डेट करत होती. दोघांनीही नच बलिए शोच्या 9व्या सीझनमध्ये भाग घेतला होता. पण हा शो संपल्यानंतरच दोघे वेगळे झाले. नताशा किंवा अली दोघांनीही कधीही त्यांच्या ब्रेकअपबद्दल सांगितले नाही. परंतु आता अलीने यावर मौन सोडले आहे.
अलीने भूतकाळातील नातेसंबंधांवर केले भाष्य
अली गोनीने अलीकडेच भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये भाग घेतला. त्याने सांगितले की त्याचे नताशासोबतचे नाते चांगले होते, परंतु नंतर सर्वकाही बदलले. अभिनेता म्हणाला, “यापूर्वी माझे नाते खूप गंभीर होते. परंतु हे टिकले नाही याचे कारण म्हणजे तिने मला सांगितले की जेव्हा आपण लग्न करू तेव्हा आपण वेगळे राहू. ती गोष्ट मला पटली नाही.” असे त्याने या शो मध्ये सांगितले. अलीने येथे कुठेही नताशाचे नाव घेतले नाही, मात्र तो तिच्याबद्दलच बोलत असल्याचे मानले जात आहे. अली आणि नताशाचे नाते आणि ब्रेकअप चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे.
हे देखील वाचा- कंगना राणौतने केला खुलासा, “बॉलीवूडमधील टॅलेंटेड लोकांची काय अवस्था होते” याबाबत सोडले मौन!
‘कुटुंब सोडू शकत नाही’
अली म्हणाला की तो कुठेही जाईल, माझ्या कुटुंबाला सोबत घेईल. अभिनेता म्हणाला, “मी कुटुंब वेगळे करू शकत नाही. जगात कोणतीही शक्ती आली तरी मी सोडू शकत नाही.” असे त्याने सांगितले.