Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीलाच Thalapathy Vijay च्या अडचणीत वाढ; ‘या’ व्हिडिओमुळे निर्माण झाला वाद

अभिनेता थलापती विजय यांच्या अडचणी वाढल्या आहेत. एका कार्यकर्त्याला स्टेजवरून खाली फेकल्याप्रकरणी त्यांच्यावर आणि त्यांच्या बाउन्सरवर एफआयआर दाखल झाला आहे. हा व्हिडिओ विजयच्या राजकीय रॅलीचा आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 27, 2025 | 06:11 PM
राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीलाच Thalapathy Vijay च्या अडचणीत वाढ; ‘या’ व्हिडिओमुळे निर्माण झाला वाद
Follow Us
Close
Follow Us:
  • राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीलाच ‘थलापथी विजय’च्या अडचणीत वाढ
  • ‘या’ व्हिडिओमुळे निर्माण झाला वाद
  • विजय आणि त्यांच्या बाउन्सरविरुद्ध पोलिसांत FIR दाखल
Thalapathy Vijay and Bouncer FIR: दाक्षिणात्य सुपरस्टार आणि आता राजकारणी बनलेले थलापती विजय (Thalapathy Vijay) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीलाच त्यांना कायदेशीर आव्हानांचा सामना करावा लागत आहे. एका कार्यकर्त्याला स्टेजवरून खाली फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, विजय आणि त्यांच्या बाउन्सरविरुद्ध पोलिसांत FIR दाखल करण्यात आला आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये काय आहे?

हा व्हिडिओ विजयच्या तामिळगा वेत्री कझगम (TVK) या राजकीय पक्षाच्या पेराम्बलूर जिल्ह्यातील एका रॅलीदरम्यानचा आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की, विजयचा एक बाउन्सर स्टेजवर असलेल्या एका व्यक्तीला उचलून थेट रॅम्पवरून खाली फेकून देतो. त्यानंतर लगेचच थलापती विजय त्याच रॅम्पवर येतात. या घटनेनंतर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला.

Seriously this is very very disgusting. Why our fellow human beings become so senseless? This guy Vijay was a film actor hence his face is recognised by every one and many youngsters have gone on to believe the movies and real life has connection. But throwing down and… pic.twitter.com/SL9m0WmOhc — ncsukumar (@ncsukumar1) August 24, 2025

अभिनेता-राजकारणी विजय थलापती विरोधात फतवा जारी; इफ्तार पार्टीत मद्यपी आणि जुगारींना केले आमंत्रित

कार्यकर्त्याची पोलिसांत तक्रार

ज्या व्यक्तीला बाउन्सरने खाली फेकले, त्याचे नाव सरथकुमार असल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर सरथकुमार यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे, कुन्नम पोलिसांनी विजय आणि त्याच्या बाउन्सरविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. सरथकुमार यांचा आरोप आहे की एका घटनेदरम्यान विजयच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना मारहाण केली. कुन्नम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय दंड संहितेच्या तीन कलमांखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना अशा वेळी घडली आहे, जेव्हा विजयने नुकतीच २०२६ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मदुराई पूर्वेतून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात वादाने झाली आहे.

Web Title: Thalapathy vijay fir filed politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2025 | 06:11 PM

Topics:  

  • Politics
  • South Movie
  • Thalapathy Vijay

संबंधित बातम्या

‘मला तुझं शरीर बघायचं आहे’, फोटोग्राफरने केली आक्षेपार्ह मागणी; अभिनेत्रीने स्वत:च केला धक्कादायक खुलासा, म्हणाली…
1

‘मला तुझं शरीर बघायचं आहे’, फोटोग्राफरने केली आक्षेपार्ह मागणी; अभिनेत्रीने स्वत:च केला धक्कादायक खुलासा, म्हणाली…

१८ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर हे दोन सुपरस्टार एकत्र झळकणार, करण जोहरने शेअर केला ‘Patriot’ चा नवा लूक, रिलीज डेट जाहीर
2

१८ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर हे दोन सुपरस्टार एकत्र झळकणार, करण जोहरने शेअर केला ‘Patriot’ चा नवा लूक, रिलीज डेट जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.