Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ठरलं तर मग’ आणि ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेचा महासंगम; एक-दोन नव्हे ३ तासाचा महाएपिसोड, रंगणार धमाकेदार संगीत सोहळा

मनोरंजनाच्या प्रवाहातला असाच एक अनोखा प्रयोग ९ फेब्रुवारीला प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. ठरलं तर मग आणि लग्नानंतर होईलच प्रेम या दोन मालिकांचा महासंगीत सोहळा सलग तीन तास प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Feb 03, 2025 | 03:06 PM
'ठरलं तर मग' आणि 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेचा महासंगम; एक-दोन नव्हे ३ तासाचा महाएपिसोड, रंगणार धमाकेदार संगीत सोहळा

'ठरलं तर मग' आणि 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेचा महासंगम; एक-दोन नव्हे ३ तासाचा महाएपिसोड, रंगणार धमाकेदार संगीत सोहळा

Follow Us
Close
Follow Us:

मालिका आणि त्यातील प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत. म्हणूनच तर मालिकेतले सुख-दु:खाचे प्रसंग प्रेक्षकांना आपलेसे वाटतात. मायबाप रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी स्टार प्रवाह वाहिनी सदैव तत्पर असते. मनोरंजनाच्या प्रवाहातला असाच एक अनोखा प्रयोग ९ फेब्रुवारीला प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. ठरलं तर मग आणि लग्नानंतर होईलच प्रेम या दोन मालिकांचा महासंगीत सोहळा सलग तीन तास प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तीन तासांच्या या महासंगीत सोहळ्यात ३३ कलाकारांची फौज दिसणार आहे.

‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’; पुष्कर जोगच्या आगामी चित्रपटाच्या मोशन पोस्टरने वाढली उत्सुकता…

अर्जुन, सायली, नंदिनी, पार्थ, जीवा आणि काव्यासह दोन्ही मालिकेतील सर्व मुख्य कलाकार या महासंगीत सोहळ्यात दिसणार आहेत. तीन तासांचा हा अभूतपूर्व सोहळा साकारण्यासाठी १५० पेक्षा जास्त तंज्ञत्र मंडळी तीन दिवस मेहनत घेत होते. शूटिंग वेळेत पूर्ण व्हावं यासाठी दोन हुबेहुब दिसणाऱ्या सेटची निर्मिती करण्यात आली. कलादिग्दर्शक तृप्ती ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे एकसारखे दिसणार दोन सेट उभारले गेले. ठरलं तर मग मालिकेचे दिग्दर्शक सचिन गोखले यांनीच हा तीन तासांचा महासंगीत सोहळा शूट केला आहे. याविषयी सांगताना सचिन गोखले म्हणाले, माझ्यासाठी खरंच हे आव्हानात्मक होतं. स्टार प्रवाहने माझ्यावर हा विश्वास दाखवला त्यासाठी आभार. ठरलं तर मगच्या कलाकारांसोबत पहिल्या दिवसापासून शूट करतोय मात्र लग्नानंतर होईलच प्रेमच्या कलाकारांसोबत या महासंगीतच्या निमित्ताने पहिल्यांदा काम केलं. प्रत्येक पात्र समजून घेत शूटिंग करत होतो. तीन तासांचा एपिसोड जवळपास तीन दिवस शूट करत होतो. हा अनुभव नक्कीच अविस्मरणीय आहे.

 

तीन तासांचा हा महासंगीत सोहळा उभा करणं हे सोपं नव्हतं. या आव्हानाविषयी सांगताना स्टार प्रवाहचे बिझनेस हेड सतीश राजवाडे म्हणाले, ‘दोन मालिका ज्यांची स्वतंत्र कथानकं सुरु आहेत त्या एकत्र गुंफून त्याची एक गोष्ट बांधणं आणि त्यात तीन तासांचा भक्कम भाग बनवणं आणि ३३ कलाकार असणं हे आव्हानात्मक होतं. स्टार प्रवाहच्या संपूर्ण टीमने मिळून हे पार पाडलं आहे. रसिकांना मनोरंजनाची मेजवानी मिळेल यात काही शंका नाही. जितकी मेहनत करतो तेवढा रसिकांचा प्रतिसाद मिळतो. त्यामुळे असे नवनवे प्रयोग करताना फार आनंद होतो. मात्री खात्री आहे महासंगीत विशेष भाग उत्तम मनोरंजन करेल.’

Bigg Boss OTT 4 Host Replacement: ना करण जोहर, ना फराह खान…; Bigg Boss OTT 4 मध्ये सलमान खानची जागा कोण घेणार ?

सलग तीन दिवस महासंगीत सोहळ्याचं शूटिंग सुरु होतं. सेटवर सगळ्या गोष्टी सुरळीत पार पडाव्यात यासाठी निर्माते सोहम आणि सुचित्रा आदेश बांदेकर आवर्जून उपस्थित होते. मालिकेचं कथानक हा मालिकेचा आत्मा असतो. त्यामुळे लेखकाच्या खांद्यावर विशेष जबाबदारी असते. त्यात दोन्ही मालिकांच्या कथेला योग्य न्याय देत कथा बांधणं ही अत्यंत जबाबदारीची गोष्ट. लेखिका शिल्पा नवलकर आणि अश्विनी अंगाळ यांनी या महासंगीत सोहळ्याची कथा अतिशय सुबकतेने गुंफली आहे.

महासंगीत सोहळ्यात प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ता-सागर, थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेतील तेजस आणि सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील सर्वांची लाडकी जोडी अर्थात जयदीप-गौरीचा देखिल खास परफॉर्मन्स असणार आहे. तेव्हा ९ फेब्रुवारीला नक्की पाहा ठरलं तर मग आणि लग्नानंतर होईल प्रेम मालिकेचा महासंगीत सोहळा सायंकाळी ७ वाजल्यापासून फक्त स्टार प्रवाहवर.

Web Title: Tharala tar mag 3 hour episode with lagnanantar hoilch prem mahasangeet special episode

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2025 | 03:06 PM

Topics:  

  • star pravah
  • star pravah serial

संबंधित बातम्या

‘हाथी घोडा पालकी, बर्थडे कन्हैया लाल की’ स्टार प्लसचा जन्माष्टमी विशेष सोहळा आणि समृद्धी शुक्लाची भावनिक आठवण
1

‘हाथी घोडा पालकी, बर्थडे कन्हैया लाल की’ स्टार प्लसचा जन्माष्टमी विशेष सोहळा आणि समृद्धी शुक्लाची भावनिक आठवण

“आई बापाला जिवंत गाडलं तिथं मुलीचं काय ?”अजय पूरकर दिसणार नव्या भूमिकेत ; स्टार प्रवाहवर येतेय नवी मालिका, पाहा प्रोमो
2

“आई बापाला जिवंत गाडलं तिथं मुलीचं काय ?”अजय पूरकर दिसणार नव्या भूमिकेत ; स्टार प्रवाहवर येतेय नवी मालिका, पाहा प्रोमो

साक्षी-प्रियाला अखेर शिक्षा पण सुभेदार कुटुंबावर नव्या संकाटाची चाहूल; ‘ठरलं तर मग’ मालिकेत येणार नवा ट्विस्ट
3

साक्षी-प्रियाला अखेर शिक्षा पण सुभेदार कुटुंबावर नव्या संकाटाची चाहूल; ‘ठरलं तर मग’ मालिकेत येणार नवा ट्विस्ट

‘ठरलं तर मग’ मालिका महत्वाच्या वळणावर! प्रिया ठरली दोषी, मालिकेत येणार सात वर्षांचे लीप?
4

‘ठरलं तर मग’ मालिका महत्वाच्या वळणावर! प्रिया ठरली दोषी, मालिकेत येणार सात वर्षांचे लीप?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.