Bigg boss ott 4 salman khan replace by rohit shetty or sonu sood
अलीकडेच, सलमान खान होस्ट करत असलेला रिॲलिटी शो ‘बिग बॉस’चा १८ वा सीझन संपला. आता त्यानंतर चाहते त्याच्या ‘बिग बॉस ओटीटी’ची वाट पाहत आहेत. ‘बिग बॉस ओटीटी’चा हा येणारा चौथा सीझन आहे. आता चाहत्यांमध्ये या शोबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली आहे, चाहत्यांना सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, बिग बॉस ओटीटीच्या यंदाच्या सीझनचं कोण होस्ट करणार आहे ? शोचा होस्ट म्हणून प्रेक्षकांना सलमान खान सर्वात जास्त आवडत असला तरी आता त्यासाठी आणखी दोन कलाकारांची नावे समोर येत आहेत.
प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रीने उरकला गुपचूप साखरपुडा, Photos Viral
बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सीझनबद्दल बोलायचे तर, त्या सीझनची होस्टिंग चित्रपट निर्माता करण जोहरने केली होती. तर, सलमान खानने ‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या सीझनची होस्टिंग केली होती. पण, त्यानंतर तिसऱ्या सीझनमध्ये सलमान खान पुन्हा होस्ट म्हणून दिसला नाही, त्याच्या जागी अनिल कपूरने शो होस्ट केला. आता आगामी सीझनच्या म्हणजेच चौथ्या सीझनच्या होस्टबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. त्यामुळे शोच्या होस्टसाठी सलमान खानच्यासोबतच रोहित शेट्टी किंवा सोनू सूद यांची नावे आता पुढे येत आहेत.
बिग बॉस ओटीटीच्या चौथ्या सीझनबद्दल अशी चर्चा सुरु आहे की, निर्मात्यांनी या सीझनची तयारी सुरू केली आहे. इंडिया फोरमने दिलेल्या वृत्तानुसार, बिग बॉस ओटीटीच्या चौथ्या सीझनमध्ये सलमान खान होस्ट म्हणून दिसणार नाही. असे म्हटले जात आहे की, निर्मात्यांनी रोहित शेट्टीला बिग बॉस ओटीटीच्या चौथ्या सीझनमध्ये होस्ट म्हणून बोलावले आहे, याशिवाय सोनू सूदलाही शोचा होस्ट म्हणून ऑफर देण्यात आली आहे, परंतु आतापर्यंत दोघांकडूनही कोणताही प्रतिसाद आलेला नाही.
सई ताम्हणकर लवकरच देणार खास सरप्राईज; पोस्ट करत म्हणाली, ‘३ फेब्रुवारीला…’
रोहित शेट्टी आणि सोनू सूद दोघांनीही टीव्ही शो होस्ट केले आहेत. या चौथ्या सीझनमध्ये शो कोण होस्ट करेल हा लोकांसाठी एक मोठा प्रश्न आहे.. बिग बॉस ओटीटीच्या शेवटच्या सीझनबद्दल बोलायचं तर, शोच्या पहिल्या सीझनची विजेती दिव्या अग्रवाल होती, दुसऱ्या सीझनचा विजेता एल्विश यादव तर, तिसऱ्या सीझनची विजेती सना मकबूल होती. जर आपण बिग बॉस सीझन 18 बद्दल बोललो तर या सीझनचा विजेता करणवीर मेहरा होता. याशिवाय विवियन डिसेना या शोचा फर्स्ट रनर अप ठरला.