Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mangla Trailer- ॲसिड हल्ल्यातून बचावलेल्या सुप्रसिद्ध गायिकेचा कठीण प्रवास ‘मंगला’ चित्रपटातून उलगडणार

बरेच दिवसांपासून 'मंगला' चित्रपटाच्या टिझरची, गाण्यांची, पोस्टरची चर्चा सुरू असलेली पाहायला मिळाली. ॲसिड हल्ल्यातून बचावलेल्या या मंगला सुप्रसिद्ध गायिकेचा प्रवास या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jan 05, 2025 | 04:29 PM
ॲसिड हल्ल्यातून बचावलेल्या सुप्रसिद्ध गायिकेचा कठीण प्रवास 'मंगला' चित्रपटातून उलगडणार

ॲसिड हल्ल्यातून बचावलेल्या सुप्रसिद्ध गायिकेचा कठीण प्रवास 'मंगला' चित्रपटातून उलगडणार

Follow Us
Close
Follow Us:

‘कोणत्याही गोष्टीची सुरुवात कोठून करायची हे कळत नसेल तेव्हा समजायचं की सुरुवात झाली आहे’ या सुंदर, अर्थपूर्ण वाक्यानं ‘मंगला’ चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता वाढवून ठेवली आहे. आपल्यावर ओढवलेल्या संकटाला सामोरे जाण्यासाठी सर्वप्रथम आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात ते म्हणजे आपले आई-वडील. आई-वडिलांची साथच आपल्याला प्रत्येक संकटाला सामोरे जाण्यास मदत करते. त्यांचे आशीर्वाद, त्यांची कर्म ही प्रत्येक लेकराच्या मागे असतात. अशाच मंगलाचा कठीण असा प्रवास सोयीस्कर आणि सुखकर करण्यासाठी तिच्या आई-वडिलांची पुण्याई तिच्या कामी आली असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. बरेच दिवसांपासून ‘मंगला’ चित्रपटाच्या टिझरची, गाण्यांची, पोस्टरची चर्चा सुरू असलेली पाहायला मिळाली. ॲसिड हल्ल्यातून बचावलेल्या या मंगला सुप्रसिद्ध गायिकेचा प्रवास या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.

Mission Grey House चा सस्पेन्स, थ्रिलर, ॲक्शन पॅक्ड ट्रेलर रिलीज, ‘त्या’ खुणाचा पोलिस कसा लावणार छडा

चित्रपटाचा ट्रेलर नुकताच समोर आला असून या ट्रेलरमध्ये आई-वडिलांच्या साथीने मंगला ॲसिड हल्ल्यातून बाहेर पडण्यास कशी सावरते हे पाहायला मिळत आहे. मंगला ही मध्यवर्ती भूमिका अभिनेत्री शिवाली परब हिने साकारली आहे. तर तिच्या आई-वडिलांच्या भूमिकेत अलका कुबल आणि शशांक शेंडे हे दिग्गज कलाकार पाहायला मिळत आहेत. ॲसिड हल्ल्यामुळे समाजात मिळालेल्या रोषाला मंगला कशी सामोरी जाते याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. या चित्रपटात शिवाली परब, शशांक शेंडे, अलका कुबल, विशाल राठोड या कलाकारांचा अभिनय लक्षवेधी ठरत आहे.

‘मंगला’ चित्रपटाच्या ट्रेलरने मंगला या गायिकेच्या प्रवासाचं रहस्य ताणून ठेवले आहे. ॲसिड हल्ल्याने वाईट वेळ आलेल्या एका गायिकेचा खराखुऱ्या प्रवासाची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळतेय. एखाद्याच्या रूपाबरोबर त्यांच्यातील कलेला पुढे जाऊ न देता वाईट सूड घेऊन काही राक्षसी लोकं या चांगल्या कलेला त्रास देतात, हे चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

“हम भी घुसकर मार सकते है…”, १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धाची गोष्ट ‘स्काय फोर्स’ मध्ये दिसणार; दमदार ट्रेलर प्रदर्शित

‘रैश प्रोडक्शन प्रा.लि’ आणि ‘फक्त आणि फक्त एंटरटेनमेंट’ प्रस्तुत ‘मंगला’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अपर्णा हॉशिंग यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे. तर चित्रपटाच्या निर्मितीची बाजू अपर्णा हॉशिंग, यशना मुरली, मोहन पुजारी, मिलिंद फोडकर यांनी सांभाळली आहे. चित्रपटाची कथा आणि पटकथा सौरभ चौधरीची असून संवाद प्रथमेश शिवलकर याचे आहेत. तर संपूर्ण चित्रपटाचे संगीत शंतनु घटक याचे आहे. तर चित्रपटातील गाणी निहार शेंबेकर, रोंकिनी गुप्ता, स्नेहल मालगुंडकर या गायकांनी त्यांच्या सुमधुर स्वरात स्वरबद्ध केली आहेत. एका वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून शिवाली परबला मोठ्या पडद्यावर पाहणं उत्सुकतेचं ठरेल. मंगलाची ही खरीखुरी कथा १७ जानेवारी २०२५ रोजी मोठ्या पडद्यावर पाहणं रंजक ठरेल.

Web Title: The movie of marathi famous singers biopics trailer got released on social media this movie shivali parab in lead actress

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2025 | 04:29 PM

Topics:  

  • marathi film

संबंधित बातम्या

‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटातून उलगडणार माती आणि नाती जोडणारी रंजक गोष्ट, चित्रपटाचा टीझर लाँच!
1

‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटातून उलगडणार माती आणि नाती जोडणारी रंजक गोष्ट, चित्रपटाचा टीझर लाँच!

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन, मोठमोठ्या तारकांची लागणार हजेरी!
2

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन, मोठमोठ्या तारकांची लागणार हजेरी!

साई बाबांचं दर्शन घेत ‘येरे येरे पैसा ३’च्या टीमने ‘आली रे आली गुलाबाची कळी’ गाणं केलं प्रदर्शित
3

साई बाबांचं दर्शन घेत ‘येरे येरे पैसा ३’च्या टीमने ‘आली रे आली गुलाबाची कळी’ गाणं केलं प्रदर्शित

पहिल्यांदाच पथनाट्य सादर करीत अनोख्या पद्धतीने ‘अवकारीका’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच
4

पहिल्यांदाच पथनाट्य सादर करीत अनोख्या पद्धतीने ‘अवकारीका’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.