Mission Grey House चा सस्पेन्स, थ्रिलर, ॲक्शन पॅक्ड ट्रेलर रिलीज, 'त्या' खुणाचा पोलिस कसा लावणार छडा
सुपरस्टार आमिर खानची बहीण ज्येष्ठ अभिनेत्री निखत खान ट्रेलर लाँचच्या वेळी थिएटरमध्ये उपस्थित होती. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेबद्दल सांगताना म्हणाल्या “सस्पेन्स थ्रिलर चित्रपट बनवणे सोपे काम नाही. प्रेक्षकांना संपूर्ण चित्रपटात गूढ रहस्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी क्लायमेक्स पर्यंत वाट पाहावी लागणार, प्रेषकआपली सीट सोडणार नाहीत याची खात्री आहे.
अबीर खानसोबत, रिलायन्स एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि रफत फिल्म्स एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली निर्मित ‘मिशन ग्रे हाऊस’ या चित्रपटातून पूजा शर्मा देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. ॲक्शन आणि थ्रिलर असण्यासोबतच हा एक संगीतमय चित्रपट आहे ज्यामध्ये सुखविंदर आणि शान सारख्या मोठ्या गायकांनी गाणी गायिली आहेत. लोणावळा आणि पुणे या सुंदर लोकेशन्सवर चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. रिलायन्स एंटरटेनमेंटतर्फे हा चित्रपट याच महिन्यात १७ जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.