Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवराज अष्टकातील सहावे तेजस्वी पुष्प १९ फेब्रुवारी २०२६ ला प्रदर्शित होणार!

‘फर्जंद’, 'फत्तेशिकस्त', ‘पावनखिंड’, शेर शिवराज, सुभेदार’ या पाचही चित्रपटांना प्रेक्षकांचं उदंड प्रेम आशीर्वाद लाभले. या संकल्पनेतील सहावे चित्रपटरुपी पुष्प लवकरच भेटीला येणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 03, 2025 | 01:00 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती शिवरायांचा तेजस्वी इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचवण्याच्या उद्देशाने लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ‘श्री शिवराज अष्टक’ ही संकल्पना आणली. महाराजांचा देदिप्यमान इतिहास आणि त्यातील ज्वलंत अध्याय शिवराज अष्टक संकल्पनेअंतर्गत रुपेरी पडद्यावर सादर झाले. यातील ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज, सुभेदार’ ही पाच चित्रपुष्प प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि या पाचही चित्रपटांना प्रेक्षकांचं उदंड प्रेम आणि आशीर्वाद लाभले. या संकल्पनेतील सहावे चित्रपटरुपी पुष्प नवीन वर्षात १९ फेब्रुवारी २०२६ ला रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या महत्त्वाकांक्षी चित्रपटाचे नाव आहे..‘रणपति शिवराय’ – स्वारी आग्रा. लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी सोशल माध्यमातून या भव्य चित्रपटाची घोषणा केली आहे.

संपली नाही ‘कंतारा’ची संपूर्ण कथा, लवकरच येणार तिसरा भाग; काय असेल ऋषभ शेट्टीच्या पुढच्या चित्रपटाचे नाव?

छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मोठमोठ्या शत्रूंना आपल्या गनिमीकाव्याच्या जोरावर धूळ चारली. बुद्धिचातुर्य, धैर्य, गनिमी कावा अशा विविध गुणांनी त्यांनी लढवलेले डावपेच यांनी इतिहासात महत्त्वाचं स्थान मिळवलं आहे. यापैकीच एक घटना म्हणजे शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका. पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी निर्मित ‘रणपति शिवराय’ – स्वारी आग्रा या भव्य चित्रपटातून शिवचरित्रातील हा थरारक अध्याय दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आता आपल्यासमोर घेऊन येणार आहेत. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मुरलीधर छतवानी (पॅनोरमा स्टुडिओज) आणि विपुल अगरवाल, जेनील परमार (मुगाफी) चित्रपटाचे निर्माते आहेत आणि सहनिर्माते रवींद्र औटी (पॅनोरमा स्टुडिओज), तन्शा बत्रा (मुगाफी) आहेत.

Zubeen Garg: जुबीन गर्गच्या मृत्यूचा तपास सुरूच; शेखर ज्योती गोस्वामी आणि अमृतप्रभा महंत यांना केली अटक

असामान्य दूरदृष्टी, असीम धैर्य, प्रबळ इच्छाशक्ती आणि आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वाच्या बळावर सार्वभौम स्वराज्याची निर्मिती करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र कालातीत आहे. आपल्या भावी पिढयांना या चित्रपटांतून आत्मविश्वास व प्रेरणा मिळावी या उद्देशाने ‘शिवराज अष्टका’ची निर्मिती करण्यात आली आहे. ‘शिवराज अष्टका’ तील चित्रपटही आपल्या भावी पिढयांना नक्कीच मार्गदर्शक ठरतील असा विश्वास आहे.

Web Title: The sixth tejaswi pushpa in the shivraj ashtaka will be released on february 19 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2025 | 01:00 PM

Topics:  

  • chatrapati Shivaji Maharaj
  • Entertainemnt News
  • marathi movie

संबंधित बातम्या

‘Body Language, Expression वर विशेष मेहनत आणि…; शिवानी सुर्वेच्या ‘आफ्टर ओएलसी’ चित्रपटातील लुकची चर्चा
1

‘Body Language, Expression वर विशेष मेहनत आणि…; शिवानी सुर्वेच्या ‘आफ्टर ओएलसी’ चित्रपटातील लुकची चर्चा

Harry Potter TV Series: ‘हॅरी पॉटर’ टीव्ही मालिकेचे शूटिंग सुरू, सेटवरून कलाकारांचे फोटो आले समोर!
2

Harry Potter TV Series: ‘हॅरी पॉटर’ टीव्ही मालिकेचे शूटिंग सुरू, सेटवरून कलाकारांचे फोटो आले समोर!

Shubman-Shehnaaz Gill: शुभमन गिल आणि शहनाज गिल भाऊ-बहीण? अभिनेत्रीने दिलं मजेशीर उत्तर!
3

Shubman-Shehnaaz Gill: शुभमन गिल आणि शहनाज गिल भाऊ-बहीण? अभिनेत्रीने दिलं मजेशीर उत्तर!

‘कट्यार काळजात घुसली’ला १० वर्षे पूर्ण, सुबोध भावेने शेअर केल्या आठवणी, म्हणाला, ”कल्पना डोक्यात आली आणि…”
4

‘कट्यार काळजात घुसली’ला १० वर्षे पूर्ण, सुबोध भावेने शेअर केल्या आठवणी, म्हणाला, ”कल्पना डोक्यात आली आणि…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.