२२ वर्षीय तरुणीने १८ कोटींना विकली स्वत:ची Virginity; 'या' प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याने केली खरेदी
हॉलिवूड इंडस्ट्रीतून एक विचित्र बातमी समोर येत आहे, ब्रिटनमधील मँचेस्टर शहरातील २२ वर्षीय तरुणीने तिचे कौमार्य (Virginity) विकल्याचे वृत्त आहे. या वृत्ताने अवघ्या जगभरात चांगलीच खळबळ उडाली आहे. स्वत:चे कौमार्य (Virginity) विकणाऱ्या तरुणीचे नाव, लॉरा असं आहे. तिने स्वत:चे कौमार्य (Virginity) ऑनलाईन विकली आहे. लॉराचे कौमार्य एका हॉलिवूड अभिनेत्याने १८ कोटींना घेतलेय. पण हा निर्णय घेण्यामागे तिने काय कारण सांगितलं आहे ते अधिक थक्क करणारं आहे. जाणून घेऊयात सविस्तर…
Deb Mukherjee: ‘ब्रह्मास्त्र’चे दिग्दर्शक अयान मुखर्जी यांच्या वडिलांचे निधन, काजोलशी होते खास नाते!
लॉराच्या कौमार्याचा सौदा एका एस्कॉर्ट एजन्सीच्या वेबसाइटवर आयोजित करण्यात आला होता. या सौद्यासाठी अनेक बडे राजकारणी नेते, व्यावसायिक आणि प्रसिद्ध सेलिब्रिटींनी सहभाग नोंदवला होता. शेवटी एका हॉलिवूड स्टारने सर्वात जास्त बोहोली लावत त्याने सर्वांचेच लक्ष वेधलेय. २२ वर्षीय लॉराने तिचं कौमार्य १८ कोटींना विकल्यामुळे जगभरातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आपण आपलं कौमार्य विकण्याचा निर्णय लक्झरी लाईफस्टाइल आणि आर्थिक सुरक्षेचा विचार करुन घेतल्याचं लॉराने स्पष्ट केलं आहे. “अनेक मुली काहीच न मिळवता आपलं कौमार्य गमावतात,” असं म्हणत लॉराने आपल्याला ही चूक करायची नसल्याचं म्हटलं आहे. कौमार्य विक्री हा एक फायद्याचा सौदा ठरु शकतो असा विचार करुनच लॉराने हा निर्णय घेतल्याचे समजते.
लॉरा पुढे म्हणाली की, “माझ्या या निर्णयावरुन लोकांना काहीही विचार करु द्या. मात्र मी जो निर्णय घेतला आहे, तो माझा खासगी प्रश्न आहे. जगात लोक अनेक गोष्टी विकतात. घर, गाड्या, उद्योग अगदी आई-वडिलांचाही सौदा केला जातो. मग मी माझं कौमार्य का विकू शकत नाही?” असा सवाल लॉराने टीकाकांरांना केला आहे. लॉराने कौमार्य ही एक मौल्यवान संपत्ती मानली, तिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यास मदत करू शकते. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मी एक धोरणात्मक पर्याय निवडला आहे. असं लॉरा म्हणाली. हा लिलाव एका प्रसिद्ध एस्कॉर्ट एजन्सीच्या वेबसाइटद्वारे गुप्तपणे करण्यात आला. सौद्यासाठी अनेक बडे राजकारणी नेते, व्यावसायिक आणि प्रसिद्ध सेलिब्रिटींनी सहभाग नोंदवला होता.
भारत-बांगलादेश संबंधांमध्ये पुन्हा तणाव; अल्पसंख्याकांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून वादंग
लॉरा म्हणाली की, “हॉलिवूड सेलिब्रिटीसोबत करार करण्यापूर्वी तिला टॉप बिझनेसमन आणि राजकारण्यांकडून ऑफर आल्या होत्या. करार पूर्ण करण्यासाठी, लॉराने खरेदीदारासमोर तिच्या कौमार्यची पुष्टी करण्यासाठी वैद्यकीय चाचणी देखील केली. दोन्ही पक्षांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण प्रक्रिया गोपनीय ठेवण्यात आली होती.” दरम्यान, लॉराचे कौमार्य नेमके कोणी विकत घेतलेय ? हे अद्यापही गुलदस्त्यातही आहे. कलाकाराने अद्यापही आपली ओळख जाहीर केलेली नाही.