Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘उर्मिलायन’ पौराणिक नाटकातून उलगडणार रामायणातील लक्ष्मणच्या पत्नीचं कथाख्यान, नाटकाचा शुभारंभ केव्हा होणार ?

'सुमुख चित्र' निर्मित आणि 'अनामिका' प्रकाशित एक संगीत, नृत्यनाट्य आणि मनाच्या गाभाऱ्यात खोल शिरकाव करणारं ‘उर्मिलायन’ हे नवं कोरं पौराणिक नाटक लवकरच रंगभूमीवर येत आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Dec 10, 2024 | 05:22 PM
‘उर्मिलायन’ पौराणिक नाटकातून उलगडणार रामायणातील लक्ष्मणच्या पत्नीचं कथाख्यान, नाटकाचा शुभारंभ केव्हा होणार ?

‘उर्मिलायन’ पौराणिक नाटकातून उलगडणार रामायणातील लक्ष्मणच्या पत्नीचं कथाख्यान, नाटकाचा शुभारंभ केव्हा होणार ?

Follow Us
Close
Follow Us:

मराठी रंगभूमीवर सध्या विविध विषयांवरील नाटकं सुरू आहेत. सगळ्याच प्रकारच्या नाटकांना विशेष पसंती मिळतेय. अशातच एक वेगळा विषय घेऊन ‘सुमुख चित्र’ निर्मित व ‘अनामिका’ प्रकाशित एक संगीत, नृत्यनाट्य आणि मनाच्या गाभाऱ्यात खोल शिरकाव करणारं ‘उर्मिलायन’ हे नवं कोरं पौराणिक नाटक १५ डिसेंबरला रंगभूमीवर येत आहे. पुण्यात अण्णाभाऊ साठे नाट्यगृह दुपारी १२.३० वाजता या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रंगणार आहे. नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा लेखक दिग्दर्शक सुनिल हरिश्चंद्र यांनी सांभाळली आहे. सुमुख चित्र नाट्य क्षेत्रात वेगवेगळ्या नाटकांची निर्मिती करत असून, सुमुख चित्र नाट्यसंस्थेची ही दुसरी नाट्य कलाकृती आहे. या नाटकाची निर्मिती सुमुख चित्रचे कार्यकारी निर्माता निखिल जाधव यांनी केली आहे.

प्रेम असावं तर असं… ‘# लय आवडतेस तू मला’ मालिकेत सरकारने थापल्या सानिकासाठी ‘इतक्या’ भाकऱ्या

उर्मिला…वाल्मीकींच्या रामायणातली एक उपेक्षित व्यक्तिरेखा. रामायणातील राम, सीता आणि रावण या तीन व्यक्तिरेखांच्या भाऊगर्दीत उर्मिला ही व्यक्तिरेखा काहीशी अबोलच राहिली. या व्यक्तिरेखेला बोलतं करणार आणि उर्मिलेच्या बाबतीतील असंख्य प्रश्नांच्या उत्तरांचा शोध ‘उर्मिलायन’ या नाटकातून घेण्यात येणार आहे. १६ कलाकारांच्या संचाने हे नाटक सजलं आहे. नाटकाचे नेपथ्य अरुण राधायण तर संगीत निनाद म्हैसाळकर यांचे आहे.

वरुण धवनच्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर शाहरुख खानला कसा वाटला? म्हणाला- “चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक…”

देवत्वाच्या स्पर्शापासून वंचित राहिलेली आणि कदाचित त्यामुळेच माणूसपणाच्या सगळ्या भावभावना आसक्तीने जगणारी एक हाडामांसाची जिवंत व्यक्ती म्हणून तिचा अभ्यास केला, तर ही अनन्यसाधारण व्यक्तिरेखा हृदयात अगदी खोलवर घाव करू लागते, जिची काहीही चूक नसतानासुद्धा जिला पती असतानाही विनाकारण वनवास भोगावा लागला, या चौदा वर्षांच्या खडतर जीवनप्रवासात जगण्याचा आणि स्वतःला जागवण्याचा संघर्ष कसा केला असेल ? काय घडलं असेल तिच्या शापित कथायुष्यात? काय असतील तिचे प्रश्न जे मानवी जीवनाला दर्शनस्वरूप मूल्य देणारे असतील, काय असेल तिच्या या जीवन प्रवासाचं आयन ? मानवी अस्तित्वाच्या मुळापर्यंत भिडू पहाणार्‍या या अनादी अनंत प्रश्नांचा भेदक चेहरा म्हणजे ‘उर्मिलायन’

पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी कपूर कुटुंब दिल्लीला रवाना, राज कपूर यांची 100 वी जयंती होणार साजरी!

कल्पिता राणे, पुजा साधना, श्रावणी गावित, मृणाल शिखरे,निकिता रजक, सुप्रिया जाधव, प्रियांका अहिरे, अमोल भारती, शिवानी मोहिते, अजय पाटील, शुभम बडगुजर, पराग सुतार, दिवेश मोहिते सोहम पवार,प्रणव चव्हाण आणि उर्मिलेच्या भूमिकेत निहारिका राजदत्त हे कलाकार दिसणार आहे. ‘उर्मिलायन’ प्रेक्षकांना एक सुंदर नाट्यानुभव देईल अशी खात्री निर्माता दिग्दर्शकांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Urmilayan marathi play will reveal the story of lakshman wife from the ramayana entertainment marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2024 | 05:22 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.