गायिका उषा मंगेशकर गायिका नसत्या तर काय झाल्या असत्या ? एका गाण्याने रातोरात चमकलेलं नशीब
स्वरसम्राज्ञी आणि गानकोकिळा लता मंगेशकर यांची धाकटी बहीण उषा मंगेशकर यांचा आज ९० वा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म १५ डिसेंबर १९३५ रोजी मध्य प्रदेशात झाला. आपल्या गायन कारकिर्दीत उषा यांनी हिंदी, मराठी, बंगाली, भोजपुरी, नेपाळी, आसामी आणि कन्नड अशा सर्व भाषांमध्ये गाणी गायली आहेत. उषा मंगेशकर यांनी ‘मेरी बडी भाभी आयी’ या चित्रपटातून ‘सुबाह का तारा’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त खास त्यांच्यासंबंधित गोष्टी जाणून घेऊया…
मलायका अरोराच्या फिटनेसने नेटकरी घायाळ, सौंदर्यपाहून केला कमेंट्सचा वर्षाव
उषा मंगेशकर यांनी आपल्या लहान वयातच वडील गमावले. दीनानाथ मंगेशकर यांचे निधन झाले तेव्हा उषा अवघ्या ६ वर्षांच्याच होत्या. वडिलांच्या अकाली निधनानंतर उषा आणि त्यांच्या भावंडांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. अशा परिस्थितीत कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर घेण्यासाठी घरातील मोठी मुलगी म्हणून लता मंगेशकर यांनी गायला सुरुवात केली. त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या बहिणी आशा आणि उषा यांनीही हळूहळू गायला सुरुवात केली. उषा मंगेशकर यांनी १९५४ साली आलेल्या ‘सुबाह का तारा’ चित्रपटातील ‘बडी धूम धम से मेरी भाभी आयी’ या गाण्याच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटाला २३ वर्षे, काजोलने शेअर केली खास पोस्ट
खरंतर, उषा यांनी १९३५ पासूनच पार्श्वगायिका म्हणून आपल्या गायन करियरला सुरुवात केली होती. उषा यांनी आपल्या करियरच्या सुरूवातीच्या काळात अनेक कमी बजेट चित्रपटात गाणी गायली. पण त्यांच्या कामाला ओळख मिळाली ती १९७५ मध्ये आलेल्या ‘जय संतोषी माँ’ या चित्रपटातून. या चित्रपटात त्यांनी ‘मैं तो तेरी आरती उतारू’ हे गाणे गायले. या गाण्याने उषा मंगेशकर रातोरात स्टार झाल्या. नवरात्रीच्या दिवसांमध्ये किंवा देवीच्या इतरत्र कोणत्याही उत्सवाला हे गाणे हमखास लावले जाते. ‘मैं तो आरती’ या गाण्याने उषा यांना घराघरात प्रसिद्धी मिळाली. त्या गाण्याने उषा यांना अनेक सन्मानही मिळाले. त्या चित्रपटातील गाण्यासाठी उषा मंगेशकर यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून नामांकनही मिळाले होते.
उषा मंगेशकर यांना लोकसंगीताची आवड आहे. त्यांनी ६० वर्षांहून अधिक काळ गायन केले. १९९२ मध्ये दूरदर्शनवर टेलिकास्ट केल्या जाणाऱ्या ‘फुलवतीं’ या संगीत नाटकाची निर्मिती केली होती. या नाटकाची कथा बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘फुलवंती’ या कादंबरीवर आधारित होती. उषा मंगेशकर यांना गायनासोबतच चित्रकलेचीही खूप आवड आहे. एकदा एका संवादादरम्यान त्या म्हणाल्या होत्या की, जर मी गायिका नसते तर मी आता चित्रकार असते. उषा मंगेशकर यांनी अनेकवेळा मुंबईत त्यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. उषा मंगेशकर यांना महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही पदवी प्रदान करण्यात आली. उषा यांनी राज एन सिप्पी यांच्या ‘इंकार’ या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटात ‘मुंगडा’ हे गाणे गायले आहे. जे आजच्या काळातही सुपरहिट आहे.
परिकथेतील परी हीच का? मुनमुन दत्ताचे निखळ सौंदर्य पाहून ‘मून’ ही लाजेल
२०१७ मध्ये, २७ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर, उषा मंगेशकर आणि लता मंगेशकर यांनी ‘मैं खुदीराम बोस हूं’ चित्रपटातील ‘एक बार बढाई दे दो मन’ हे गाणे एकत्र गायले होते. हा चित्रपट एका बंगाली स्वातंत्र्यसैनिकाच्या जीवनावर आधारित होता. याआधी दोघांनी ‘आया मौसम दोस्ती का’ आणि ‘मैने प्यार किया’ या चित्रपटात एकत्र गाणे गायले होते.