‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटाला २३ वर्षे, काजोलने शेअर केली खास पोस्ट
करण जोहर दिग्दर्शित ‘कभी खुशी कभी गम’चित्रपट २००१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. कौटुंबिक कथानक असलेल्या या चित्रपटात बॉलिवूड इंडस्ट्रीतील दमदार कलाकारांची फौज होती. अमिताभ बच्चन, जया बच्चन, शाहरुख खान, राणी मुखर्जी, हृतिक रोशन, काजोल, करीना कपूर यांसारख्या कलाकारांनी चित्रपटात विविध भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटातील सर्वच कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली होती. चित्रपटाला रिलीज होऊन आज २३ वर्षे झाली आहेत. या निमित्त अभिनेत्री काजोलने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.
चित्रपटातले काही सीन्सचे फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शन दिले की, “जीवन, प्रेम आणि हास्य. ते आता त्यांना पूर्वीसारखे बनवत नाहीत. २३ वर्षांआधीच्या काही विलक्षण आठवणी…” ‘कभी खुशी कभी गम’चित्रपटाबद्दल अभिनेत्री काजोल देवगण हिने एका मुलाखतीत शुटिंग दरम्यानचा किस्सा शेअर करताना सांगितले की, “चित्रपटाच्या शुटिंगवेळी यशराज काकांनी फिल्मीस्तान स्टुडिओमध्ये एक परमनंट मेकअप रुम बनवली होती. कारण, इतक्या सेलिब्रिटींना एक व्हॅनिटी व्हॅन कमी पडत होती. चित्रपटाच्या सेटवर सुरुवातीच्या दिवसांमध्ये डिहायड्रेशनमुळे अनेक जणं बेशुद्ध व्हायचे. कारण त्या सेटवर मोठ्या प्रमाणावर गरम व्हायचं.”
‘कभी खुशी कभी गम’ हा बॉलिवूडमधील आयकॉनिक चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटातील शाहरूख खान आणि काजोलची जोडी प्रेक्षकांना फार भावली. आर्यन खानने चित्रपटात त्याचे वडील शाहरूखच्या बालपणीची भूमिका साकारली होती. दरम्यान, हा चित्रपट २००१ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता.
“बॉलिवूडवाले अनाथ म्हणूनच…”, कंगनाने रनौतची बॉलिवूड विरोधात पुन्हा वादग्रस्त विधान