मलायका अरोरा कायमच आपल्या फिटनेसमुळे चर्चेत असते. मलायकाला पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणं देखील कठीण होऊन बसतं. मलायकाच्या या फिटनेसमागील राज म्हणजे, योगा... तिला इंडस्ट्रीतच नाही तर, तिचे फॅन्सही फिटनेस फ्रिक मलायका म्हणून म्हणतात. काही तासांपूर्वीच अभिनेत्रीने योगा करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत.
Malaika Arora Yoga Pics
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा गेल्या अनेक वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीपासून दुर आहे. पण तरीही ती कायमच ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतेच. फिटनेस फ्रिक मलायका अरोरा ५० वर्षांची असूनही ती फिटनेसच्या बाबतीत २५ वर्षांच्या तरुणींनाही मागे टाकतेय.
अभिनेत्री कायमच आपलं शरीर स्लिम आणि ट्रीम ठेवण्यासाठी ती नियमितपणे व्यायाम करत असते. कारण म्हणजे वयाच्या ५० व्या वर्षीही लोक तिच्या शरीरयष्टी आणि लवचिक शरीराने प्रभावित होतात. काही तासांपूर्वीच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर योगा करतानाचे फोटो शेअर केले आहेत.
मलायका अरोराने इन्स्टाग्रामवर योगा करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती योगा करताना खूप सुंदर दिसत आहे. शेअर केलेल्या ह्या फोटोंमध्ये मलायकाने जिमचे ड्रेस वेअर करत वेगवेगळ्या अंदाजात योगासनं करताना दिसत आहे.
अभिनेत्रीने योगासनं करतानाचे फोटो शेअर करताना "शाईन बेबी शाईन" असं कॅप्शन देत फोटो शेअर केले आहेत. मलायका अनेकदा योगा करतानाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. त्याचप्रमाणे तिने आताही फोटो शेअर केले आहेत.
अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. तिच्या सौंदर्याचे आणि ग्लॅमरसचे चाहत्यांकडून कौतुक केले जात आहे.