Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कैलास खेर यांच्या पहाडी आवाजातलं प्रेरणादायी गाणं, ‘वामा लढाई सन्मानाची’ चित्रपटातील टायटल साँग प्रदर्शित

‘वामा - लढाई सन्मानाची’ चित्रपटातील टायटल साँग नुकतेच प्रदर्शित झाले. रसिकांमध्ये आता या चित्रपटाविषयी विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रसिद्ध गायक कैलास खेर आणि मंजिरा गांगुली यांच्या जोशपूर्ण आवाजात सादर करण्यात आले.

  • By चेतन बोडके
Updated On: May 12, 2025 | 06:20 PM
कैलास खेर यांच्या पहाडी आवाजातलं प्रेरणादायी गाणं, ‘वामा लढाई सन्मानाची’ चित्रपटातील टायटल साँग प्रदर्शित

कैलास खेर यांच्या पहाडी आवाजातलं प्रेरणादायी गाणं, ‘वामा लढाई सन्मानाची’ चित्रपटातील टायटल साँग प्रदर्शित

Follow Us
Close
Follow Us:

‘वामा – लढाई सन्मानाची’ या चित्रपटातील टायटल साँग नुकतेच प्रदर्शित झाले असून, रसिकांमध्ये आता या चित्रपटाविषयी विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रसिद्ध गायक कैलास खेर आणि मंजिरा गांगुली यांच्या जोशपूर्ण आवाजात सादर करण्यात आलेले हे गीत मंदार चोळकर यांनी शब्दबद्ध केले असून रिजू रॉय यांचे जबरदस्त संगीत लाभले आहे. हे गाणे म्हणजे सन्मानासाठी लढणाऱ्या स्त्रीशक्तीचं प्रतीक आहे.

‘तो माझ्याबद्दल चांगले, वाईट बोलू देत…’, गोविंदाचा पुतण्या कृष्णा अभिषेकबद्दल काय म्हणाली सुनीता आहुजा ?

या गाण्यातून केवळ संघर्षच नाही तर एक सामाजिक संदेशही उमटतो. ‘वामा लढाई सन्मानाची’चे बोल अतिशय शक्तिशाली असून ते संघर्ष, आत्मगौरव आणि नारीशक्तीच्या उभारणीचे दर्शन घडवतात. चित्रपटाच्या आशयाला साजेसे असे हे टायटल साँग स्त्रीच्या संघर्षाची आणि सन्मानासाठीच्या लढाईची तीव्रता प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते.

गाण्याबद्दल गायक कैलास खेर म्हणतात, “हे टायटल साँग इतके ऊर्जेने भरलेले आहे, की ते ऐकताना आपसूकच एक बळ मिळते. या गाण्याचे बोल प्रत्येक स्त्रीला बुद्धिमान, निर्भय आणि जिंकण्यासाठी सज्ज करणारे आहेत. हे गाणे खरंतर महिलांच्या सक्षमीकरणाचे ब्रीदगीत आहे, असे म्हटले तरी चालेल.”

एल्विश यादवच्या अडचणी वाढ; उच्च न्यायालयाने दिला पहिला धक्का, आता नोएडा पोलिस युट्यूबरचा फास आवळणार!

दिग्दर्शक अशोक कोंडके म्हणतात, “कैलास खेर, मंजिरी गांगुली यांचा दमदार आवाज, संगीताची लयबद्धता आणि शब्दांतील स्फूर्ती एकत्र येऊन बनलेले हे टायटल साँग एक संस्मरणीय अनुभव देणारे आहे. या प्रेरणादायी गाण्यात लढ्याचा, आत्मसन्मानाचा आणि स्त्रीशक्तीच्या गौरवाचा झणझणीत संदेशही आहे. मला खात्री आहे, हे गाणे प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल.”

ओंकारेश्वरा प्रस्तुत व सुब्रमण्यम के. निर्मित ‘वामा- लढाई सन्मानाची’ चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन अशोक आर. कोंडके यांनी केले असून कश्मीरा कुलकर्णी, डॉ. महेश कुमार, गणेश दिवेकर, जुई बी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Web Title: Vaama ladhai sanmanachi film title song has been released sing by kailash kher

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2025 | 06:20 PM

Topics:  

  • marathi movie
  • News Song
  • viral Song

संबंधित बातम्या

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास
1

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ सिनेमात महेश मांजरेकर साकारणार कधीही न साकारलेली भूमिका… जोरदार चर्चा!
2

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ सिनेमात महेश मांजरेकर साकारणार कधीही न साकारलेली भूमिका… जोरदार चर्चा!

‘म्हणून व्हेंटिलेटर लिहायला मला ४८ वर्ष लागली’, वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हलमध्ये राजेश मापुस्करांचा खुलासा
3

‘म्हणून व्हेंटिलेटर लिहायला मला ४८ वर्ष लागली’, वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हलमध्ये राजेश मापुस्करांचा खुलासा

भाडिपाचा सारंग, फुलपाखरू ऋता एकत्र! ‘आली मोठी शहाणी’ सिनेमाची घोषणा…
4

भाडिपाचा सारंग, फुलपाखरू ऋता एकत्र! ‘आली मोठी शहाणी’ सिनेमाची घोषणा…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.