Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Veen Doghatli Hi Tutena: समरच्या आरोग्यासाठी स्वानंदीने घेतला योग आणि प्राणायाम शिकवण्याचा निर्णय

‘वीण दोघातली ही तुटेना’ ही मालिका सध्या प्रेक्षकांना खूपच आवडतेय आणि समर-स्वानंदीची जोडी कमाल करताना दिसतेय. आता लग्न झाल्यानंतर स्वानंदी समरला आरोग्यासाठी योग शिकवताना दिसणार आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Dec 04, 2025 | 02:48 PM
समर स्वानंदीचं नातं कसं बहरणार

समर स्वानंदीचं नातं कसं बहरणार

Follow Us
Close
Follow Us:
  • वीण दोघातली ही तुटेना मालिकेत नवा ट्विस्ट
  • समर स्वानंदीची केमिस्ट्री
  • आरोग्यासाठी स्वानंदी लागणार समरच्या मागे 
‘वीण दोघांतली ही तुटेना‘ मालिकेत समर–स्वानंदीच्या कुटुंबात घडलेल्या अलीकडील घटनांनी घरातील वातावरणाला नवे वळण दिले आहे. स्वानंदीच्या वडिलांनी राजवाडे घरातील दागिन्यांवर घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ही रक्कम राजवाडे यांच्या घरी परत देण्यासाठी जात असताना अंशुमनने गुंडांकरवी ती रक्कम चोरी केली, ज्यामुळे स्वानंदीची बाबा अत्यंत दुःखी झाले. ही परिस्थिती हाताळताना स्वानंदीने पोलिसांची मदत घेऊन चोरी गेलेली रक्कम शोधून काढली आणि ती त्वरित राजवाडे कुटुंबाकडे परत दिली. तिच्या या प्रामाणिक आणि निर्णायक कृतीमुळे बाबा आणि समरमधील तणाव कमी झाला. समरला प्रथमच जाणवलं की या घरातील सर्वजण वाईट नाहीत आणि गैरसमजांवर पडदा टाकण्याची वेळ आली आहे. 

‘वीण दोघातली ही तुटेना’ मध्ये स्वानंदी–समरचा नवा संघर्ष! रोहन-अधिराच्या नात्याचं काय होणार

समर-स्वानंदीचं नातं सुधारणार 

याचदरम्यान, समरच्या सतत नाक बंद राहण्याच्या त्रासामुळे आणि औषधांमुळे स्वानंदीने त्याच्या आरोग्याकडे पाहून त्याला योग आणि प्राणायाम शिकवण्याचा निर्णय घेतलाय. तिच्या मार्गदर्शनामुळे समरला शारीरिक व मानसिक आरामाची नव्याने ओळख होते यामुळे दोघांमधील संबंध अधिक दृढ होताना दिसणार आहेत. 

अधिराला आला थकवा  

दुसरीकडे, अधिराला सततच्या कौटुंबिक दडपणामुळे मानसिक थकवा जाणवत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी तिने डंबेल्स आणि मोठा स्पीकर अशा जिम साधनांची व्यवस्था करून घरातच जोरदार झुम्बा सुरू करायचा निर्णय घेतलाय. या मोठ्या आवाजामुळे घरातील मोठ्यांना तसेच शेजाऱ्यांना त्रास होऊ लागतो. शेवटी, शेजारी वर येऊन आवाजाबाबत नाराजी व्यक्त करतात  आणि अधिरावर समाजातील शांतता भंग केल्याचा आरोप करतात. या संपूर्ण घटनेने कुटुंबातील बदलते समीकरण आणि प्रत्येकाच्या संघर्षांचे नवे पैलू समोर येतात. 

आता पुढे अधिरा आणि स्वानंदीच्या नव्या आयुष्यात काय बदल बघायला मिळणार? अधिरा मध्यमवर्गीय घरात कशी रुळणार आणि आपल्या सवयी बदलणार का? समर आपल्या तब्बेतीकडे लक्ष देणार का? स्वानंदीसह त्याची वागणूक बदलणार का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना नक्कीच पडले असतील आणि याच प्रश्नांची उत्तरं मिळविण्यासाठी ही मालिका पहावी लागणार आहे. 

सहज अभिनय

या मालिकेतील प्रमुख भूमिका साकारणारे सुबोध भावे, तेजश्री प्रधान आणि अन्य सहकलाकार यांनी आपल्या सहज अभिनयाने सर्व प्रेक्षकांचे मन जिंकत आहेत. स्वानंदी आणि समरची भूमिका साकार करणाऱ्या तेजश्री आणि सुबोधची केमिस्ट्री कमाल असून प्रेक्षकांना फारच आवडत आहे. या मालिकेतील सतत येणारे ट्विस्ट आणि टर्न, गांभीर्य, मस्करी आणि सहजता याचा उत्तम मेळ ही मालिका असल्याचे दिसून येत आहे. 

वीण ही दोघांतली.. मालिका स्वानंदी सोडणार?, तेजश्री प्रधानची नवी सुरूवात, Video शेअर करत दिली आनंदाची बातमी

Web Title: Veen doghatli hi tutena marathi serial update about samar swanandi chemistry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2025 | 02:48 PM

Topics:  

  • marathi serial news
  • marathi serial update
  • zee marathi

संबंधित बातम्या

“सावज हाती लागलं, कामिनीच्या सापळ्यात अडकली सरोज” ; ‘कमळी’ मालिकेत नवा ट्विस्ट
1

“सावज हाती लागलं, कामिनीच्या सापळ्यात अडकली सरोज” ; ‘कमळी’ मालिकेत नवा ट्विस्ट

‘शुभ श्रावणी’चा नवा प्रवास; शिक्षणमंत्र्यांनी फेटाळल्या सर्व अफवा, केली मोठी घोषणा
2

‘शुभ श्रावणी’चा नवा प्रवास; शिक्षणमंत्र्यांनी फेटाळल्या सर्व अफवा, केली मोठी घोषणा

लहान सावित्रीने जिंकली प्रेक्षकांची मने! ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेला संपूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा
3

लहान सावित्रीने जिंकली प्रेक्षकांची मने! ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेला संपूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा

पहिली केस, मोठी जबाबदारी,  उज्ज्वल निकम यांच्या मदतीने अॅड ऊर्जा करणार पहिल्या केसची तयारी
4

पहिली केस, मोठी जबाबदारी, उज्ज्वल निकम यांच्या मदतीने अॅड ऊर्जा करणार पहिल्या केसची तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.