Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Meena Prabhu Passed Away : प्रसिद्ध लेखिका डॉ. मीना प्रभू यांच्या आयुष्याचा ‘प्रवास’ विसावला

मराठी साहित्यविश्वातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध लेखिका डॉ. मीना प्रभू यांची प्राणज्योत मालवली आहे, त्या ८५ वर्षांच्या होत्या.

  • By चेतन बोडके
Updated On: Mar 01, 2025 | 05:29 PM
प्रसिद्ध लेखिका डॉ. मीना प्रभू यांच्या आयुष्याचा ‘प्रवास’ विसावला

प्रसिद्ध लेखिका डॉ. मीना प्रभू यांच्या आयुष्याचा ‘प्रवास’ विसावला

Follow Us
Close
Follow Us:

मराठी साहित्यविश्वातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध लेखिका डॉ. मीना प्रभू यांची प्राणज्योत मालवली आहे, त्या ८५ वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. उपचारादरम्यानच डॉ. मीना प्रभू यांचे निधन झाले आहे. प्रसिद्ध मराठी प्रवासवर्णनकार, कादंबरीकार आणि कवयित्री म्हणून अवघ्या महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख आहे. खरंतर अवघ्या महाराष्ट्रामध्ये मीना यांना प्रसिद्धी ‘प्रवास वर्णन’ पुस्तकातील त्यांच्या लेखनामुळे मिळालेली आहे.

आता चाहत्यांना आपल्या आवडत्या सेलिब्रिटींसोबत करायला मिळणार जगाची सैर, ‘हे’ ॲप घडवणार सफर

डॉ. मीना प्रभू यांच्या जाण्याने मराठी साहित्यविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मुळच्या पुण्याच्या असलेल्या डॉ. मीना प्रभू त्यांच्या लग्नानंतर लंडनमध्ये स्थायिक झाल्या होत्या. पेशाने भुलतज्ञ असलेल्या प्रभू यांनी आपल्या लेखनाने प्रवासवर्णनाला एक वेगळेच वलय प्राप्त करून दिले होते. मीना प्रभू यांनी ‘प्रवास वर्णन’वर अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. मीना प्रभू यांनी अनेक देशांमध्ये प्रवास केला असून त्यावर त्यांनी प्रवासवर्णने लिहिली आहेत. शिवाय, त्यासंबंधित अनेक पुस्तकंही प्रकाशित झाली आहेत. मीना प्रभूंनी १२ पेक्षा जास्त प्रवासवर्णने लिहिली होती. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमध्ये जगातील निरनिराळ्या ठिकाणांचे ज्ञान देणारे आणि रंजक माहिती आहे. त्यांची ‘माझं लंडन’, ‘इजिप्तायन,’ ‘तुर्कनामा,’ ‘ग्रीकांजली,’ ‘चिनी माती’ अशी अनेक पुस्तके लोकप्रिय झाली.

ठरलं तर मग! स्वप्नील जोशीचा पहिला वहिला गुजराती चित्रपट केव्हा रिलीज होणार ?

दरम्यान, मीना प्रभू यांच्याबद्दल सांगायचं तर, त्यांनी गोव्यामध्ये झालेल्या महिला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषविले होते. शिवाय, मीना प्रभू यांना २०१० सालाचं दि.बा.मोकाशी पारितोषिक, २०११ साली गो. नी. दांडेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मृण्मयी पुरस्कार, २०१२ साली न. चिं. केळकर पुरस्कार आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अशा मानाच्या पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे. त्यांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र राज्य पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी पुण्यात 2017 मध्ये ‘प्रभू ज्ञानमंदिर’ हा अत्याधुनिक किंडल लायब्ररीचा प्रकल्प सुरू केला होता.

Web Title: Veteran writer dr meena prabhu passes away her books are famous as travelogues

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2025 | 05:08 PM

Topics:  

  • Entertainment News
  • Marathi Film Industry

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.