अभिनेता विकी कौशल (Vicky Kausha) सध्या चांगलाच चर्चेत आहे. तो आगामीा (Chhava) छाव चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात तो छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. विकी साकारत असलेल्या दमदार भूमिकेमुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता आहे. सध्या चित्रपटाचं शूटींग सुरू झाली असून चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो लीक झाले आहेत. या फोटोमधील विकीचा लूक चाहत्यांच्या पंसतीस उतरला असून त्याच्या फोटोवर कमे्टसचा वर्षाव होत आहे.
[read_also content=”‘दिल तो पागल है’मधील ‘या’ प्रसिद्ध म्युझिकवर थिरकल्या करिश्मा कपूर आणि माधुरी दीक्षित, ‘निशा’ आणि ‘पूजा’चा धमाकेदार डान्स ! https://www.navarashtra.com/movies/karishma-kapoor-madhuri-dikshit-danced-on-dil-to-pagal-hai-musis-track-nrps-526748.html”]
लीक झालेल्या फोटोंमध्ये विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहे. त्याचा लूक इतका चांगला आहे की त्याला ओळखणे कठीण आहे. ट्विटरवर (आता एक्स) एका फॅन पेजने हे फोटो शेअर केली आहेत. लांब दाढी, मिशा आणि लांब केस, कानात जड झुमके, गळ्यात रुद्राक्षाचा हार आणि लहान शंख, चेहऱ्यावर रुबाब अशा अवतारात विकी जबरदस्त दिसत आहे. त्याने आपले अर्धे केस भगवान शिवाप्रमाणे बनमध्ये बांधले आहेत आणि बाकीचे मोकळे सोडले आहेत. त्याच्या केसातही रुद्राक्ष दिसत आहे. त्याच्या हा लूक पाहिल्यावर विक्की कौशलच्या लूकवर खूप मेहनत घेण्यात आल्याचं स्पष्ट होत आहे. विकीचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे.
Getting into the skin of any character..he is a true chameleon ??#VickyKaushal as Chhatrapati Sambhaji Maharaj ??#Chhaava in cinemas on 6th Dec pic.twitter.com/5VL1IOms1e
— VK? (@VickySupremacy) April 23, 2024
दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा ‘छावा’ हा ऐतिहासिक चित्रपट आहे. त्याची कथा छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदान्ना छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येशुबाई भोसले यांची भूमिका साकारत आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. यापूर्वी दोघेही एका जाहिरातीत एकत्र दिसले होते.
नुकतेच रश्मिकाने ‘छावा’ चित्रपटातील तिच्या भागाचे शूटिंग पूर्ण केले होती तेव्हा तिने विकी कौशलचे कौतुक करणारी पोस्ट शेअर केली होती. तसेच दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनेही आभार मानले होते. निर्माता दिनेश विजन त्यांच्या मॅडॉक्स फिल्म्स बॅनरखाली ‘छावा’ बनवत आहेत. हा 6 डिसेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय विकीकडे ‘बॅड न्यूज’ आणि भन्साळीचा ‘लव्ह अँड वॉर’ आहे.